गुन्हेगारी विश्वातील रंजक केसेस छोट्या पडद्यावर.
क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची, गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.
आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात.
अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम 'क्रिमिनल्स - चाहूल
गुन्हेगारांची' सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध
राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण ती नजरअंदाज करतो. या
मालिकेतून प्रेक्षकांच गुन्हेगारी विश्वापासून कसं सावध राहता येईल यावर प्रबोधन होईल; म्हणूनच गुन्हेगारी
विश्वातील रंजक केसेस सोनी मराठी वाहिनी पुन्हा दाखवणार आहे क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची मालिकेतून
प्रेक्षकांनी सावध राहणं का गरजेचं आहे हे समजण्यासाठी मालिकेचे पुनः प्रक्षेपण सोनी मराठी वाहिनी करत आहे.
अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले आहे. अभिजित खांडकेकर हा एक उत्तम
सूत्रसंचालक असून आजवर त्याच्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्याची उत्तम संवाद फेक आणि
भाषेवरची पकड यामुळे तो प्रेक्षकांना अजून आपलासा वाटतो. क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची या कार्यक्रमाच्या
माध्यमातून प्रेक्षकांना गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा या याबद्दल बरीच माहिती मिळणार आहे. अभिजित
एका जबाबदार निवेदकाच्या भूमिकेत दिसणार आहे जो मनोरंजनाच्या माध्यमातून सतर्कतेचा संदेश देखील देणार
आहे. क्राईम शोज ना प्रेक्षकांची विशेष पसंती असते. या आधी देखील बऱ्याच क्राईम शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले
आहेत. सर्वसामान्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान देणाऱ्या, प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आणि अशक्य
वाटणाऱ्या गुन्ह्यांच्या कथा मालिकांमधून पाहायला मिळतात. आणि अशाच धाटणीचा कार्यक्रम मराठीत सोनी
मराठी वाहिनी पुन्हा घेऊन आली आहे.
पाहा, क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची, गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.