Showing posts with label कमाल फोटोंची रंगतेय चर्चा. Show all posts
Showing posts with label कमाल फोटोंची रंगतेय चर्चा. Show all posts

Saturday, January 9, 2021

ड न्यु २०२१ मध्ये मोनालिसाच्या ब्रँड न्यू, कमाल फोटोंची रंगतेय चर्चा

ड न्यु २०२१ मध्ये मोनालिसाच्या ब्रँड न्यू, कमाल फोटोंची रंगतेय चर्चा

अखेरीस २०२० संपलं आणि ब्रँड न्यु २०२१ वर्षाला सुरुवात झाली. या वर्षाविषयी कोणालाच फारसं बोलावंसं वाटणार नाही, पण २०२० काही देऊन गेलं आणि काही घेऊन गेलं. काही जणांनी या वर्षाविषयी राग धरला तर काहींनी कृतज्ञता व्यक्त केली... असंच काहीसं घडलं अभिनेत्री मोनालिसा बागलच्या बाबतीत. २०२० मध्ये सिनेमा, मालिका, नाटक यांच्या घडामोडींना कुठेतरी ब्रेक लागला होता. बऱ्याचशा प्रकल्पांचे काम थांबले होते. मात्र, याच वर्षी मोनालिसा तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅक टू बॅक तिचे आगामी प्रोजेक्ट्स जाहीर करत होती.

“सच्चा लव्ह है, तो मुमकीन है… स्वागत तो करो हमारा” असं म्हणत 'भिरकीट'च्या टीझरमध्ये मोनालिसा ‘सैराट’ फेम तानाजी गालगुंडे सोबत झळकली. या टीझरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली. इतकंच नव्हे तर मोनालिसाच्या सिनेमाच्या पुढच्या पोस्टरने तर अनेकांना करंट लागला. 'करंट' सिनेमाच्या पोस्टरच्या निमित्ताने मोनालिसाचा ग्लॅमरस अंदाज पाहून सर्वत्र तिचीच चर्चा रंगली. 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावरून पण मोनालिसा महाराष्ट्रातील जनतेचे मनोरंजन करतच होती.

२०२१ मध्ये दमदार एन्ट्री करण्यासाठी मोनालिसा आता सज्ज झाली आहे. नुकतेच तिने The Elan Style ब्रँडसाठी कमाल फोटोशूट केले आहे आणि तिचे नवीन फोटोज् देखील अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. २०२१ मध्ये पण मोनालिसाचे सिनेमे येणार आहेत पण त्या विषयाची माहिती अजून गुलदस्त्यात आहे.










































Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...