'आई माझी काळुबाई' मालिकेत ‘वीणा जगताप’ आर्याच्या भूमिकेत!
सध्या मराठी मालिका विश्वात विशेष चर्चा आहे, ती सोनी मराठीवरच्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेतल्या ‘आर्या’या व्यक्तिरेखेची. या भूमिकेत आता लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे.
सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. स्वप्नात दिसणार्या गोष्टींचा शोध घेताना, त्या प्रत्यक्षात असल्याचा साक्षात्कार आर्याला झाला आणि या शोधमोहिमेत त्या गोष्टींचा तिच्या भूतकाळाशी काहीतरी सबंध आहे, हे कळेपर्यंत तिच्या भावाचं अपहरण झालं आणि त्याच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्या तालेवार पाटील कुटुंबाच्या नजरकैदेत ती सून म्हणून अडकली.
खलनायक विराटच्या कह्यात असलेलं पाटील कुटुंब आणि काळुबाईवरच्या श्रद्धा-भक्तीनी त्यांच्यासमोर उभी ठाकलेली आर्या आणि वेळोवेळी तिला वाचवणारा, पण पाटलांचा वंश असलेला अमोघ; अशा रंजक टप्प्यावर ही मालिका आता आहे. ज्या घरात देवीचं नाव उच्चारायला बंदी आहे, त्या घरात देवीची पूजा होऊ घातली आहे आणि आर्याच्या भूमिकेतली वीणा जगताप सत्य आणि असत्य यांच्यातल्या लढाईची मुहूर्तमेढ पाटील घरात रोवणार आहे. ह्या कथेचा नवा उत्कंठावर्धक टप्पा
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री, मालिका आणि रिएलिटी शो यांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारी वीणा जगताप सादर करणार असल्यानी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोमवार ते शनिवार,संध्याकाळी सात वाजता सोनी मराठीवर सादर होणारा, सातार्याच्या निसर्गरम्य परिसरात उलगडणारा हा पौराणिक कथेचा संदर्भ असलेला कौटुंबिकपट सर्वार्थानी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. वीणाच्या प्रसन्न, ग्लॅमरस प्रवेशानी रंजकतेत भर पडली आहे. पाहायला विसरू नका, आई माझी काळुबाई सोम.-शनि., संध्या. 7 वा