Showing posts with label #. Show all posts
Showing posts with label #. Show all posts

Friday, December 25, 2020

 ROHIT VERMA’S LATEST COLLECTION IS EVERY FASHIONISTA’S DREAM


Celebrities like Nishant Singh Malkani, Poonam Dhillon, Sheeba, Deepshikha Nagpal and many more set the stage on fire in his beautiful collection

The name Rohit Verma is synonymous with all things fantastical, couture and grand – without compromising on the practicality. The designer presented his latest collection in Mumbai at the Bombay Times Fashion Week.

VRIDDH a celebration of life, feeling of accomplishment and a life well lived. The plethora of human experiences is brought under one fold VRIDDH. It is not the end of life but myriad of life circumstances depicted at one go. It symbolises the epitome of a fulfilled life , time to relax and enjoy the shade and fruits of the tree nurtured by hard work and dedication of youth . VRIDDH as the collection is a peek through a pigeon hole of the expanse and dynamic nature of a human life. Old age is not the end of things as speaculated or undermined not worth investing on in fact, it is that golden period where the young can benefit and draw all that they can benefit from in the challenges of years ahead. Let’s joyously  celebrate every moment that we can with our own VRIDDH and make them feel special , needed and cared for every passing moment. Let’s imbibe the zeal and vigour with which they have lived so far. It is not all about black and grey it is all about pumping  the colours into their lives weaving love, harmony and dedication to their remaining years of a fulfilled life. Rohit Verma gets you the collection celebrated by the VRIDDH and symbolises the eternity of life .


Talking about collection, Rohit Verma says “Support local. I used a lot of luxurious Indian fabrics, color, and texture and handicraft designs in my latest collection. The collection is regal, couture, fresh  & out of the box”

Jewelry of models by - Purv Tyagi

Styling- Rehan Shah
Makeup for celebrities - Aliya Ansari and team
Celebrity jewellery - Pooja Beautifully Yours










Monday, December 14, 2020

 दिव्याज फॉउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले रक्तदान आणि उपस्थित लोकांना दिले प्रोत्साहन. 

सद्या राज्यात रक्त साठा खूप प्रमाणात कमी झाला होता आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी दिव्याज फॉउंडेशन यांनी  आज गामदेवीमुंबई येथे शारदा मंदिर शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होतेया शिबिराचे उदघाटन बँकर,  सामाजिक कार्यकर्ता अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आणि  त्यांनी स्वतः देखील रक्तदान केले.

या शिबिरा बद्दल बोलताना त्यांनी सांगितले, " सद्या राज्यात रक्ताची प्रचंड कमतरता आहे आणि ही कमतरता दूर करण्यासाठी साठी निरोगी लोकांनी पुढे येऊन रक्तादान केले पाहिजे."

या शिबिराला लोकांकडून 

खूप उत्तम प्रतिसाद मिळाला  दिव्याज फॉउंडेशन तर्फे भविष्यात सुद्धा असे अनेक  सामाजिक उपक्रम केले जातील असे सांगण्यात आले.

Thanks & Regards
Ashwin Palkar
Media Buzz PR & Marketing
414/4th floor, B Wing, 
Crystal Paradise, The Mall, 
opp Skoda showroom, 
Dattaji Salve Marg,
Off Veera Desai Road,
Andheri - West.
Mobile : 8424916520/8169674094













Monday, December 7, 2020

 महाकरंडक’ समितीचे अध्यक्ष- सिनेनिर्माते नरेंद्र फिरोदिया आणि स्टार्टअप स्टुडियोचे संस्थापक राहुल नार्वेकर यांची ओटीटी इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री!

 


गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे जास्त वाढू लागलाय. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. पण जर ओटीटी हे आपल्या प्रादेशिक (हक्काच्या) भाषेत असतील तर...? तर, प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं माध्यम मिळेल, जिथे त्यांच्या भाषेतील सिनेमे हे त्यांचं दिलखुलासपणे मनोरंजन करतील. हा मुद्दा अधोरेखित करण्यामागचा उद्देश असा आहे की, मराठी प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या ओटीटीच्या माध्यमातून एक सुंदर, मनोरंजक सरप्राईज मिळणार आहे. 


प्ले स्टोअरवर नऊ लाखांहून अधिक पसंती मिळालेल्या ‘लेटसअप’ या इन्फोटेनमेंट व न्यूज अॅपच्या प्रचंड यशानंतर सुप्रसिद्ध उद्योजक, ‘महाकरंडक’ समितीचे अध्यक्ष, निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि स्टार्टअप स्टुडियो फाऊंडर/ संस्थापक राहुल नार्वेकर त्यांच्या ‘लेट्सफ्लिक्स’ या नव्या मराठी ओटोटीच्या निमित्ताने OTT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच ‘लेटसअप’ या अ‍ॅपला AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge अंतर्गत 'आत्मनिर्भर अ‍ॅप पुरस्कार' मिळाला. ओटीटीसाठी असलेली पसंती लक्षात घेता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी देखील त्यांच्या हक्काचं ओटीटी माध्यम मराठीमध्ये घेऊन येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर आणि सिनेइंडस्ट्री यांचं नातं फार जुनं आहे. नरेंद्र फिरोदिया हे ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ यांसारखे अनेक प्रोजेक्ट्सचे प्रमुख आहेत.‘अहमदनगर महाकरंडक’ या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेचे ते अध्यक्ष आणि प्रायोजक देखील आहेत. ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’ या मराठी सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे.

नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत “लेट्सफ्लिक्स”साठी असोसिएट झालेले राहुल नार्वेकर यांनी ९०च्या दशकाच्या सुरुवातीला अनुराग कश्यप आणि विजय मौर्या यांसारख्या नामांकित सिनेनिर्मात्यांसह पटकखा लेखक म्हणून करियरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी fashionandyou.com आणि indianroots.com या सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सचे त्यांनी सीईओ म्हणून काम सांभाळले आहे. ‘इंडिया नेटवर्क’ आणि 'स्टार्टअप स्टुडिओ'चे ते  फाऊंडर आहेत.

स्वतंत्र ओटीटी सुरु करणे हे चॅलेंजिंग तर आहेच पण या माध्यमातून मराठी टॅलेंटसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असं सांगताना नरेंद्र फिरोदिया यांनी पुढे म्हटले की, “कोणतीही नवीन गोष्ट सुरु केली की चॅलेंजेस तर असतातच, कारण ती तुमची नवीन सुरुवात असते. तसेच ‘लेट्सफ्लिक्स’चं देखील आहे. पण आमच्या ओटीटीला उत्तम टीम लाभली आहे त्यामुळे आम्हांला आशा आहे की आम्ही सर्व चॅलेंजेंस नक्की पूर्ण करु आणि प्रेक्षकांना बेस्ट अनुभव देण्याचा प्रयत्न करु. आपल्या भारतात प्रत्येक राज्याची फिल्म इंडस्ट्री आहे. आम्ही रिजनल कॉन्टेंटवर जास्त भर देणार आहोत आणि सुरुवात मराठीपासून करत आहोत. ज्यांना सिनेमा, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म बनवायची आहे किंवा तयार आहे पण प्रदर्शित कुठे करायची याचा विचार करत आहेत किंवा ज्यांच्याकडे कॉन्टेंट आहे अशा टॅलेंटसाठी ‘लेट्सफ्लिक्स’ हा प्लॅटफॉर्म असेल.”

लेट्सफ्लिक्स हे मराठी ओटीटी चालू करण्यामागील कल्पना नक्की काय, याविषयी सांगताना राहूल नार्वेकर यांनी म्हटले की, “आमचं लेट्सअप नावाचं इंन्फोटेनमेंट ऍप आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्याकडे एकूण ९ लाख युजर्स आहेत आणि विशेष करुन मराठी लोकांची संख्या त्यात जास्त आहे. गेल्या वर्षभरात आमच्या असं लक्षात आलं की लोकं व्हिडीयो फॉरमॅटला जास्त प्राधान्य देतात. मराठीसाठी स्वतंत्र असा ओटीटी प्लॅटफॉर्म नाही आणि ही गॅप आम्हांला भरायची होती. लेट्सअपचे युजर्स हे भारताबाहेरही आहेत, त्यामुळे तिथे राहणारी नवीन मराठी पिढी, ज्यांचा जन्म परदेशात झाला आहे. त्यांच्यामध्ये मराठी सिनेमा, गाणी यांची आवड निर्माण व्हावी. थोडक्यात मराठीपण भारताबाहेर ही जपले जावे हा या मागचा उद्देश.”

नवंकोरं मराठमोळं ‘लेट्सफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.





Tuesday, December 1, 2020

 पूर्ण होतील का सखी च्या माहेरवासाची मोरपंखी स्वप्न -'अस्सं माहेर नको गं बाई' ७ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटील

 



 

सखी च्या  माहेरवासाची अनोखी गोष्ट - 'अस्सं माहेर नको गं बाई डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

 

लग्न झालेल्या मुलीला कोणती गोष्ट सर्वात प्रिय असेल तर ती म्हणजे तिचं माहेरआणि याच माहेरी नवऱ्याबरोबर जाऊन राहण्याची संधी तिला मिळाली तर?

अशीच कथा आहे सोनी मराठी वाहिनीवर नवीन येणाऱ्या 'अस्सं माहेर नको गं बाईमालिकेचीसखी आणि कुणाल हे सुखी दाम्पत्य आपल्या कामानिमित्त सखीच्या माहेरी जाऊन राहत पण माहेरी सगळं आपल्या मनासारखं होईल असं वाटणाऱ्या सखीच्या अपेक्षकांवर तिच्या आईच्या जावयावरील प्रेम आणि श्रद्धेमुळे पाणी पडतसहसा मुलींना सासुरवासाची भीती वाटते पण सखीला मात्र माहेरवास नकोसा झाला आहेअशा आशयाचा एक प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला.

 

या मालिकेत स्वानंदी टिकेकरपुष्कराज चिरपुटकरसुप्रिया पाठारे आणि राजन भिसे हे कलाकार प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

पुष्कराज आणि स्वानंदी ही जोडी या आधीही काही मालिकांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहेआता हीच जोडी पुन्हा नवीन मनोरंजन घेऊन येतेय प्रेक्षकांच्या भेटीला.

ही मालिका म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानीच ठरेलअशी ही विनोदी मालिका आणि सखीच जगावेगळं माहेर एकंदरीत सगळ्यांना आवडेल असं वाटतंय.

 

पाहायला विसरू नका, 'अस्सं माहेर नको गं बाई डिसेंबरपासून सोम.-शनि

Thursday, November 26, 2020

 आमदार निवास’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते संजीवकुमार राठोड यांनी घेतली राज्यपालांची भेट

 

आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते संजीवकुमार राठोड यांनी ५ नोव्हेंबर रोजी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारीजी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली आणि त्यांच्यासमोर बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आणि त्या मागणा अशा आहेत की-

 

१. बंजारा समाजाला आंध्र प्रदेशतेलंगाणाउडिसाबिहार या राज्याच्या धरतीवर आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे.

२. बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेवालाल यांचे  वंशज धर्मगुरु श्री. रामराव बापु महाराज यांना मरणोप्रांत भारत रत्न’ देण्यात यावे

३. बंजारा समाजाचे धर्मगुरु श्री. रामराव बापु महाराज यांच्या नावे पोस्टल टिकीट’ काढण्यात यावे.

 

माननीय राज्यपाल महोदयांनी या मागण्या केंद्र शासनाला पाठविण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे. यासोबत मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे धर्मगुरु श्री. रामराव बापु महाराजांना श्रद्धांजली अर्पित करणारे ट्वीट बद्दल माहिती देण्यात आली. दिनांक- ३१/१०/२०२० रोजी केलेले ट्वीट खालील प्रमाणे आहे.-

 

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...