आमदार निवास’ सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते संजीवकुमार राठोड यांनी घेतली राज्यपालांची भेट
‘आमदार निवास’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते संजीवकुमार राठोड यांनी ५ नोव्हेंबर रोजी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारीजी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली आणि त्यांच्यासमोर बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आणि त्या मागणा अशा आहेत की-
१. बंजारा समाजाला आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उडिसा, बिहार या राज्याच्या धरतीवर आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे.
२. बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेवालाल यांचे वंशज धर्मगुरु श्री. रामराव बापु महाराज यांना मरणोप्रांत ‘भारत रत्न’ देण्यात यावे
३. बंजारा समाजाचे धर्मगुरु श्री. रामराव बापु महाराज यांच्या नावे ‘पोस्टल टिकीट’ काढण्यात यावे.
माननीय राज्यपाल महोदयांनी या मागण्या केंद्र शासनाला पाठविण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे. यासोबत मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे धर्मगुरु श्री. रामराव बापु महाराजांना श्रद्धांजली अर्पित करणारे ट्वीट बद्दल माहिती देण्यात आली. दिनांक- ३१/१०/२०२० रोजी केलेले ट्वीट खालील प्रमाणे आहे.-
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST