Friday, November 13, 2020

 आई माझी काळुबाई'च्या सेटवर भक्तिमय वातावरण - 'आई माझी काळुबाई' मालिकेचे पन्नास भाग पूर्ण

आई माझी काळुबाई'च्या सेटवर भक्तिमय वातावरण - 'आई माझी काळुबाईमालिकेचे पन्नास भाग पूर्ण!

 

दिवाळीला सर्वत्र सुरुवात झाली आहेअंधारावर मात करून सगळीकडे दिव्यांची रोशणाई पसरू लागलीयेयाच दरम्यान 'आई माझी काळुबाईमालिकेचा पन्नासावा भाग प्रदर्शित झाला.

या निमित्तानी सेटवर श्रीसत्यनारायणाची पूजा  देवी काळुबाईची पूजा केली होतीसर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी या पूजेमध्ये भक्तिभावानी सहभाग घेतलामालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहेआत्तापर्यंत आलेल्या सर्व संकटांवर मात करून 'आई माझी काळुबाईया मालिकेची यशस्वी घोडदौड सुरू आहेया पूजेदरम्यान सेटवर अतिशय मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण होतंसर्व टीमनी या पूजेचा आनंद घेतला आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन मालिकेच्या चित्रीकरणाला नव्या जोमानं सुरुवात केली




 

शरद पोंक्षेअलका कुबल आठल्येविवेक सांगळेवीणा जगतापसंग्राम साळवीप्रसन्न केतकर अशी सर्व कलाकार मंडळी या पूजेसाठी आवर्जून उपस्थित  होती.  

 

वीणा जगताप साकारत असलेल्या आर्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहेमालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली असून आर्याच्या आयुष्यात पुढे काय घडतंहे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.  

 

पाहत राहा, 'आई माझी काळुबाई', सोम.-शनि., संध्या वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Hairdresser Aalim Hakim gives Virat Kohli a edgy and grungy look

  Hairdresser Aalim Hakim gives Virat Kohli a edgy and grungy look ahead of the crucial match today and King Kohli looks irresistible  Famou...