Monday, May 20, 2024

सन मराठीच्या ‘कॉन्स्टेबल मंजू मालिकेत सगळ्यांची नजर चुकवून सत्या आणि मंजूच्या लग्नात पोहचला सेलिब्रिटी किरण गायकवाड

 सन मराठीच्या ‘कॉन्स्टेबल मंजू  मालिकेत सगळ्यांची नजर चुकवून 

सत्या आणि मंजूच्या लग्नात पोहचला सेलिब्रिटी किरण गायकवाड


सध्या
 अनेकांच्या घराघरांतआवडत्या मालिकांमध्ये लग्नसराई चालू आहेनवरा-नवरी नटून होऊन तयार आहेतआई-वडील आणि इतर नातेवाईक लग्नाची तयारी कुठपर्यंत आली याच्याकडे लक्ष देत आहेत आणि खास मित्र मंडळी ‘मेरे यार की शादी है या मूडमध्ये आहेतहे प्रसंग प्रत्येक घराघरांत दिसत आहेआता लवकरच ‘सन मराठीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू  या मालिकेत पण लग्न समारंभ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेसत्या आणि मंजूच्या लग्नाच्या निमित्ताने या मालिकेत होणार आहे सेलिब्रिटीची एंट्रीज्याला बघता क्षणी लग्नात उपस्थित पाहुणे त्याच्या पाठी पडणार आणि तो मित्र म्हणजे सत्याचा सच्चा मित्र अभिनेता किरण गायकवाड ज्याच्या येण्याने लग्न समारंभ विशेष गाजणार आहे.

 



एकीकडे सत्या आणि मंजूच्या लग्नात पोलिस गुंड गण्या फिरंगीच्या शोध मोहिमेवर असतात तर दुसरीकडे लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड पाहुणे मंडळींची नजर आपल्यावर पडू नये आणि थेट सत्याची भेट होऊन देत या हेतून स्वत:चा चेहरा लपवून सत्याच्या लग्नात येतो आणि सत्याला भेटण्यासाठी निघतोआता पोलिसांच्या तावडीत भेटलेला किरणच्या बाबतीत नेमकं घडणार काय... पाहुण्यांसमोर किरणचा चेहरा सगळ्यांसमोर आल्यावर किरण काय करणार... हे सगळं तुम्हांला जाणून घ्यायचं असेल तर सत्या आणि मंजूच्या लग्नाला तुम्हांला यावंच लागेलही सगळी धमालगोंधळगंमत अनुभवण्यासाठी सामिल व्हा सन मराठी वाहिनीवरील या लग्नसराईत.

 



मित्र
 या नात्याने किरणची सत्यासाठी असलेली मैत्रीची जाणीवआपुलकी प्रेक्षकांना नवीन एपिसोड्समध्ये दिसून येणार आहेकिरण गायकवाडची स्पेशल एंट्रीपोलिसांनी घेरलेल्या किरणची मस्तीगंमतसत्या आणि मंजूचं लग्न मिशन उर्फ लग्नसराई पाहा ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेमध्ये २० मे ते २७ मे रात्री  वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.

बजरंग और अली : मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारा हा चित्रपट ७ जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे

 बजरंग और अली : मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारा हा चित्रपट ७ जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे


येत्या 7 जून रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'बजरंग और अली' हा चित्रपट केवळ चित्रपट नसून मैत्रीचा अनोखा उत्सव आहे, जो प्रत्येकाने सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर अनुभवावा. या चित्रपटात दोन भिन्न समाजातील बजरंग और अली यांची गाढ आणि अनोखी मैत्री रंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या दोन मित्रांची एकमेकांप्रती असलेली निष्ठा आणि निस्वार्थीपणा या चित्रपटात अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आला आहे. बजरंग और अली यांची मैत्री अशी आहे की लोक त्यांच्या मैत्रीची उदाहरणे देतात. बजरंग और अलीच्या मैत्रीच्या माध्यमातून माणूस कोणत्याही धर्माचा असो, जर तुमच्यात एकमेकांबद्दल आदर असेल, तर तुमची पार्श्वभूमी काही फरक पडत नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


उल्लेखनीय आहे की, 'बजरंग और अली' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा रोमांचक कथा असलेला चित्रपट पाहण्याचा लोकांचा उत्साह वाढत आहे. हा एक असा चित्रपट आहे जो लोकांना एकता आणि मैत्रीच्या महत्वाचा संदेश देतो. आपल्या अनोख्या मैत्रीतून 'बजरंग और अली' हा चित्रपट लोकांना मानवी नातेसंबंधांच्या मूल्याची जाणीव करून देतो आणि लोकांना धर्माच्या पलीकडे असलेले मानवी नाते समजून घेण्याची प्रेरणा देतो.

‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ या मालिकेत गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत.

 भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा या मालिकेत गौरव घाटणेकर

 प्रमुख भूमिकेत.

 

                      निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेत्यांतील आगळेवेगळे विषय प्रेक्षकांना  नेहमीच आवडतातमालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतातअशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे.  ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा असे या मालिकेचे नाव असून ही मालिका प्रेक्षकांना १० जूनपासून सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.  मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहेआपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणारहे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा मालिकेची झलक प्रेक्षकांना विशेष आवडली आणि त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे.  मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर  प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेप्रेक्षकांचा लाडका अभिनेता गौरव घाटणेकर  या मालिकेत प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेहर्षवर्धन असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून  गौरव या मालिकेत चक्क दुहेरी भूमिका साकारणार आहेती म्हणजे तो या मालिकेचा निर्मातासुद्धा आहेश्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती केली जात असून १० जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



                    आता हर्षवर्धनची व्यक्तिरेखा कशी असेल आणि त्याचा परिवेष कसा असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहेपण ही व्यक्तिरेखा लवकरच  सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईलमालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहेआपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणारहे या मालिकेतून पाहायला मिळणार आहेलक्ष्मी असे या भूमिकन्येचे नाव असून अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेअभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे हिला प्रेक्षकांनी आजवर विविध व्यक्तिरेखांमधून पाहिले आहेप्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेमदेखील केलं आहेपण आता ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा या मालिकेत भूमिकन्या म्हणजेच लक्ष्मी या व्यक्तिरेखेद्वारे ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहेआता हर्षवर्धन आणि लक्ष्मी यांची जोडी कशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस येईलहे प्रेक्षकांना प्रत्यक्ष मालिकेतूनच पाहायला मिळेलमालिका येत्या १० जूनपासून सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून गौरव घाटणेकर आणि श्रुती मराठे यांची निर्मिती असलेली ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा  ही नवी मालिका पाहायला विसरू नका.

सन मराठीच्या ‘कॉन्स्टेबल मंजू मालिकेत सगळ्यांची नजर चुकवून सत्या आणि मंजूच्या लग्नात पोहचला सेलिब्रिटी किरण गायकवाड

  सन   मराठीच्या  ‘ कॉन्स्टेबल   मंजू    मालिकेत   सगळ्यांची   नजर   चुकवून   सत्या   आणि   मंजूच्या   लग्नात   पोहचला   सेलिब्रिटी   किरण  ...