Tuesday, May 28, 2024

'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हजेरी लावणार ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण.

 'महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात हजेरी लावणार ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण.

 संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा 'सहकुटुंब हसू याम्हणतप्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहेसर्वाधिक लोकप्रिय हास्यमालिकेचा मान पटकावणारी सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! या वर्षीही 'महाराष्ट्राची हास्यजत्राया कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते आहेया कार्यक्रमातून नेहमी नवनवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतातनवे पर्वनवे विषयनवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेचआता कार्यक्रमात येणार आहे ऐका दाजीबा फेम ईशिता अरुणईशिताने चक्क महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रहसन साकारण्याचे धाडस केले आहेसमीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप या दोघांबरोबर ईशिता आपले प्रहसन सादर करणार आहेआजवर तिच्या नृत्यामुळे ईशिताचा सगळीकडे नावलौकिक असल्यामुळे ती फार चर्चेत असतेपण आपली ही आवडती अभिनेत्री आता 'महाराष्ट्राची हास्यजत्राकार्यक्रमात प्रहसन करताना पाहायला मिळेलप्रेक्षक नक्कीच पोट भरून हसण्यासाठी तयार असतील.


            ऐका दाजीबा गाण्यामुळे ईशिता अरुण ही दाजीबा गर्ल म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध झाली आहे२२ वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत आपल्याला ठेका धरण्यास भाग पाडतेपण या वीकएंडला ईशिता अरुण हिच्याबरोबर धमाल हास्यमैफील रंगणार आहेसमीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता हे सादरीकरण  साकारणार आहेअतिशय धमाल असे हे प्रहसन या वीकएंडला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेईशिता अरुण यांचा मराठीतला कॉमेडी  अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेलमराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहेतेव्हा ही धमाल मस्ती आणि विशेष असा हा भाग पाहायला विसरू नका

'महाराष्ट्राची हास्यजत्रा - सहकुटुंब हसू या', येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री  वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...