Saturday, May 11, 2024

'नाच गं घुमा'च्या टीमने केली 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमाल

 'नाच गं घुमा'च्या टीमने केली 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमाल 

डॅा. निलेश साबळे त्यांचा 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवीन शो कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीला घेऊन आले. या नव्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकवर्ग नवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहात असतात.

आता नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो रिलीझ झाला असून या प्रोमोत निलेश साबळे व ओंकार भोजने यांच्या विनोदावर 'नाच गं घुमा' चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे. सुपर्णा शाम, भाऊ कदम अन् ओंकार भोजने यांच्या विनोदांवर स्वप्नील जोशी, सारंग साठे , सुकन्या मोने , सुप्रिया पाठारे , शर्मिष्ठा राऊत , मधुगंधा कुलकर्णी आणि मायरा वायकुळ सगळेच लोटपोट हसताना दिसत आहेत. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलाच हास्यकल्लोळ केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.ओंकारच्या विनोदांवर चित्रपटाच्या संपूर्ण टीम सोबत मुंबई पोलीस लेडीज कॉन्स्टेबल देखील एन्जॉय करताना दिसत असून एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे व्हिडिओतून दिसून येतेय.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत भरभरून प्रतिसाद दिला. रसिकवर्ग आता  या संपूर्ण एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा नवीन शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसत आहे. 

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत.  तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे. कलर्स मराठीवर शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम पाहायला विसरू नका.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...