Monday, May 6, 2024

"जय जय शनिदेव" मालिकेच्या कलाकारांनी घेतले शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन.

 "जय जय शनिदेवमालिकेच्या  कलाकारांनी घेतले शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन.

 नवी मालिका, 'जय जय शनिदेव मे पासून रात्री .३० वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर!


 

 सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असतेआजवर पौराणिकऐतिहासिकथरारक

इत्यादी मालिका सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळाल्या आहेतत्यातच आता सोनी मराठी वाहिनीने नवी मालिका घोषित केली आहे

'जय जय शनिदेवअसे या मालिकेचे नाव आहेजीवनात सुखशांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेवयांच्यावर आधारित ही नवी मालिका असणार आहेमालिकेच्या प्रदर्शनापूर्वी मालिकेच्या कलाकारांनी आणि निर्मात्यांनी शनी शिंगणापूर येथे जाऊन दर्शन घेतलेनिर्माते आणि लेखक संतोष अयाचित आणि शनिदेवांच्या भूमिकेत असलेले संकेत खेडकर हे सहभागी झालेयांनी शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतले आणि मालिकेनिमित्त  छोटेसे हवन देखील केलेत्या नंतर कलाकारांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आलीया वेळी श्री शनेश्वर देवस्थान शनि शिंगणापूर यांचा मोठा हातभार लाभलात्याशिवाय अध्यक्ष भागवत सोपान बानकरउपाध्यक्ष विकास नानासाहेब बानकरसरचिटणीस बाळासाहेब बोर्डेचिटणीस आबासाहेब शेटे माशंकरराव गडाखनितीन शेटे हे देखील उपस्थित होतेयांचे मालिकेच्या टीमने विशेष आभार व्यक्त केले.


                       अभिनता संकेत खेडकर हा शनिदेवांची भूमिका साकारतो आहेयाआधी विविध मालिकांमधून काही भूमिका त्याने साकारल्या आहेतपण प्रमुख भूमिका म्हणून 'शनिदेवही संकेतची पहिलीच भूमिका आहेविशेष म्हणजे संकेत हा मूळचा अहमदनगरचा असून 'जय जय शनिदेवमालिकेत शनिदेवांची भूमिका साकारणं हे त्याचं भाग्यच म्हणावं लागेलकाही दिवसांपूर्वी  'जय जय शनिदेवमालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  शनिदेवांची भूमिका कोण साकारणार आणि त्यांची वेशभूषा कशी असेल याची चर्चा तेव्हापासूनच रंगली होतीपण आता शनिदेवांची वेशभूषा प्रेक्षकांसमोर आली आहेत्यावर मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून शनिदेव हा विषय प्रेक्षकांच्या किती जवळचा आहेहे कळतं आहे.


                         शनदेव यांच्यावर आधारित मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहेसोनी मराठी वाहिनीने पहिलं पाऊल उचललं आहेप्रेक्षकांची आतुरता आता शिगेला पोहोचली आहेशनिदेव ही न्यायाची देवता आपल्या भक्तांच्या जीवनात सुखशांतता आणि समाधान मिळवून देण्यासाठी मदत करतेशनिदेवांचा हा इतिहास अजून कोणीही प्रेक्षकांसमोर आणलेला नाहीसूर्यपुत्रन्यायदातेआणि अवघ्या जगाचे कर्मदाते शनिदेव यांची महागाथा  मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेपहिल्याच दिवशी  तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहेशनिदेवांचे निरनिराळे अध्याय या मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडले जातीलविक्रमादित्य यांची गोष्ट आपल्याला मालिकेच्या सुरुवातीच्या भागांत पाहायला मिळणार आहेशनिदेवांच्या भूमिकेत अभिनेता संकेत खेडकर दिसणार आहे तर महादेवांच्या भूमिकेत अभिनेता त्रिशुल मराठे आपले पदार्पण करत आहेसंतोष अयाचित यांच्या लेखणीच्या पेटार्‍यातून आणखीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत्यांच्या लेखणीतून 'जय जय शनिदेवमालिकेचे लेखन होणार आहेसंतोष अयाचित हे मालिकेचे निर्मातेदेखील आहेत.

 

जीवनात सुखशांतता आणि समाधान देणारी न्यायाची देवता 'शनिदेवयांचा जीवनप्रवास या मालिकेतून  मे पासून सोनी मराठी वाहिनीवर उलगडणार आहेसंकेत खेडकर हा अभिनेता शनिदेवाची भूमिका कशा प्रकारे साकारतोते आपल्याला पाहायला मिळेलत्यामुळे पाहायला विसरू नका,  'जय जय शनिदेव',  मे पासून रात्री .३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.

 

 

"जय जय शनिदेवमालिकेच्या  कलाकारांनी म्हणजेच संतोष अयाचीत आणि संकेत खेडकर यांनी घेतले शनी शिंगणापूर येथे शनिदेवांचे दर्शन. Download Link - https://we.tl/t-N9SIflxDw7

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...