Showing posts with label मोनालिसा दिसणार झी टाॅकिज प्रस्तुत ‘गस्त’ या सिनेमात. Show all posts
Showing posts with label मोनालिसा दिसणार झी टाॅकिज प्रस्तुत ‘गस्त’ या सिनेमात. Show all posts

Tuesday, February 23, 2021

मोनालिसा दिसणार झी टाॅकिज प्रस्तुत ‘गस्त’ या सिनेमात


 

मोनालिसा दिसणार झी टाॅकिज प्रस्तुत गस्तया सिनेमात

 

नवीन गोष्ट, नवा सिनेमा आणि अर्थात स्वतःचे मनोरंजन होईल अशा सिनेमांची निवड प्रेक्षक वर्ग करत असतो आणि म्हणूनच प्रत्येक कलाकार, वाहिनी, ओटिटी प्लॅटफॉर्म्स आदी प्रेक्षकांचे जास्तीत जास्त मनोरंजन कसे होईल याकडे जास्त लक्ष देतो. आणि आता लवकरच प्रेक्षकांना या फेब्रुवारी महिन्यात घरबसल्या एका नव्या सिनेमाचा आस्वाद घेता येणार आहे आणि तो सिनेमा आहे  झी टाॅकिजची प्रस्तुती असलेला 'गस्त'.

 

झी टाॅकिज प्रस्तुत गस्तया सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये मोनालिसाने  सुजातानावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत अभिनेता तानाजी गालगुंडे देखील सिनेमात दिसणार आहे. मोनालिसाचा नवा सिनेमा, या सिनेमाची नवीन जोडी, नवी गोष्ट यामुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देखील कळवल्या आहेत.

 

तर नवीन मनोरंजक गोष्ट अनुभवण्यासाठी नक्की पहा 'गस्त' येत्या २८ फेब्रुवारीला दु. १२ आणि संध्या. ६ वाजता  फक्त झी टॉकीज वर.


Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...