Showing posts with label स्पाईस मनी’तर्फे ग्रामीण उद्योजकांसाठी शून्य गुंतवणूक व्यवसायाच्या संधी. Show all posts
Showing posts with label स्पाईस मनी’तर्फे ग्रामीण उद्योजकांसाठी शून्य गुंतवणूक व्यवसायाच्या संधी. Show all posts

Friday, February 26, 2021

स्पाईस मनी’तर्फे ग्रामीण उद्योजकांसाठी शून्य गुंतवणूक व्यवसायाच्या संधी

  

 

 

 

स्पाईस मनीतर्फे ग्रामीण उद्योजकांसाठी
शून्य गुंतवणूक व्यवसायाच्या संधी

·         1 कोटी ग्रामीण उद्योजकांना सक्षम बनविण्याच्या धोरणाचा भाग म्हणून दुप्पट वेगाने प्रगती करण्याचे लक्ष्य

·         डिजिटल पेमेंट्स लोकांपर्यंत नेण्याच्या सरकारच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन

मुंबई11 फेब्रुवारी2021 : ग्रामीण भागातील उद्योजकांना स्पाईस मनी अधिकारी नेटवर्कचा भाग बनता यावे, यासाठी त्यांच्याकरीता शून्य-गुंतवणूकीचा एकमेवाद्वितीय असा प्रवेश कार्यक्रम पूर्णपणे विनाशुल्क सुरू करीत असल्याचे, स्पास मनी या भारतातील आघाडीच्या ग्रामीण फिन्टेक कंपनीने आज जाहीर केलेमर्यादीत कालावधीसाठी आखण्यात आलेल्या या शून्य-गुंतवणूक प्रवेश कार्यक्रमामुळे देशभरातील 1 कोटी ग्रामीण उद्योजकांना डिजिटल व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठीच्या स्पास मनीच्या धोरणास आकार येईल आणि निम-शहरी  ग्रामीण भागात कंपनीच्या डिजिटल पेमेंट्स परिसंस्थेला बळकटी मिळेल.

नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात, डिजिटल पेमेंटवर लक्ष केंद्रित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. या उद्दिष्टानुसारच स्पाईस मनीचे काम सुरू असून निम-शहरी  ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट्सवर अधिक भर देऊन त्यास ती प्रोत्साहित करीत असते.

या शून्य-गुंतवणूक प्रवेश कार्यक्रमातून स्थलांतरित कामगारकिराणा दुकानदारनोकरी शोधणारेनवीन पदवीधरगृहिणी आणि इतरांना स्पाईस मनी अधिकारी नेटवर्कमध्ये सामील होता येईल. तसेच आपापल्या गावी त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होईल. स्पाईस मनीच्या नेटवर्कमधील सध्याच्या 5 लाखांपैकी 65 टक्क्यांहून अधिक अधिकारी 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तसेच त्यांतील बहुसंख्य आपल्या हक्काच्या व्यवसायाचे मालक आहेत.

स्पाईस मनीचे संस्थापक दिलीप मोदी म्हणाले, “शून्य-गुंतवणूकीचा प्रवेश कार्यक्रम निम-शहरी व ग्रामीण भागातील भारतीय तरुणांना स्पाइस मनी अधिकारी बनण्यास प्रोत्साहित करेल. त्यासाठी त्यांना कोणतेही मूल्य द्यावे लागणार नाही. या कार्यक्रमामुळे स्पाईस मनी नेटवर्कचा विस्तार होईलतसेच विशेषत: देशातील दुर्गम भागातीलबॅंकिंगची सुविधा नसलेल्या आणि अल्पविकसित लोकांकरिता अत्यावश्यक अशा डिजिटल आर्थिक आणि ई-रिटेल सेवा प्रदान करता येतील. तरुण उद्योजकांना त्यांच्या स्वतःच्या डिजिटल दुकानाच्या माध्यमातून स्वत:चे उत्पन्न मिळविण्यास मदत करूनभारताचे डिजिटल व आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्येहा कार्यक्रम हे पुढचे पाऊल आहे.

स्पाईस मनीमध्ये नुकतेच सहभागी झालेले अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते सोनू सूद म्हणाले, “स्पाईस मनीकडील तांत्रिक कौशल्ये व डिजिटल पायाभूत सुविधा यांच्यामुळेमला सर्व भारतीयांसाठीविशेषत: कमी विकसित प्रदेशात राहणाऱ्यांसाठीसामाजिक-आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे माझे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होत आहे. टाळेबंदीदरम्यान हजारो स्थलांतरित कामगारांच्या संघर्षांचा मी साक्षीदार होतो. ज्या शहरांमध्ये व गावांमध्ये हे वंचित अवस्थेतील मजूर राहतातत्या ठिकाणीच रोजगार मिळवून देण्यासाठी पुढे येण्याची वेळ आली आहे. हमें हर गांव को डिजिटली सक्षम बनाना है’. ‘स्पाईस मनीच्या नाविन्यपूर्णविनामूल्य व्यवसाय प्रस्तावाद्वारे निम-शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत यशस्वीरित्या पोहोचू शकूअसा मला विश्वास वाटतो. स्वावलंबी रितीने स्वत:च्या नशिबाचे मालक होण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यास आम्ही मदत करू शकतो.

कोविडची साथ व त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेली टाळेबंदी या काळातमोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार आणि इतर ग्रामीण लोक अडचणीत आलेबेरोजगार झाले आणि कोणतेही आर्थिक उत्पन्न त्यांना मिळू शकले नाही. या लोकांचे दुःख दूर करण्यास स्पाईस मनी व अभिनेते-सामाजिक कार्यकर्ते सोनू सूद एकत्र आले. त्यांनी स्पाईस मनीतो लाइफ बनी’ या घोषवाक्याद्वारे उद्योजकीय संधी निर्माण केल्या व लोकांना डिजिटल व वित्तीय सेवा देण्यासाठी उद्योजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे लक्ष्य गाठण्यासाठी शून्य-गुंतवणूक प्रवेश कार्यक्रम ही एक मोठी झेप आहे.

शून्य-गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करण्याव्यतिरिक्तसर्व विद्यमान व नवीन अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणारे भाड्याचे शुल्क स्पाईस मनीने माफ केले आहे. उद्योजकतेचा आणि स्वावलंबनाचा त्यांचा प्रवास सुरू राहण्यासाठी यातून प्रोत्साहित देण्यात येणार आहे. आर्थिक समावेशाबद्दलच्या आपल्या धोरणास अधिक गती देण्यासाठीया कंपनीने एक उपक्रम सुरू केला आहेज्यामध्ये अधिकाऱ्यांना (उद्योजक) कंपनीची मायक्रो-एटीएम किंवा 'मिनी मॅजिकडिव्हाइस ही उपकरणे सुमारे शून्य खर्चात मिळवता येतील. या उपक्रमामुळे देशातीलविशेषत: ग्रामीण भागातील एटीएमची पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होईल.

संपूर्ण देशभरात 18 हजारांहून अधिक पिन कोड्सवर700 हून अधिक जिल्ह्यांत व 5 हजारांहून अधिक ब्लॉक्समध्ये आर्थिक समावेशकतेचा विस्तार करण्यासाठी स्पाईस मनी युद्धपातळीवर काम करीत आहे.

स्पाईस मनीविषयी :

स्पाईस मनी ही भारतातील आघाडीची ग्रामीण फिनटेक कंपनी आहे. तिच्या अधिपत्याखाली सुमारे 5 लाख अधिकारी (नवउद्योजक) काम करतात. त्यांच्या माध्यमातून ही कंपनी ग्राहकएजंट व बॅंकाबॅंकेतर वित्तसंस्थेचे प्रतिनिधी यांना विविध सेवा पुरविते. या सेवांमध्ये रोख रक्कम जमा करणेरोकड काढण्यासाठी आधारशी संलग्न यंत्रणा वापरणेमिनी एटीएम चालविणेविमाकर्जेबिलांचे पेमेंटरोकड संकलन केंद्र उभारणे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणेएअरटाईम रिचार्ज करणेप्रवास तिकिटे काढणेऑनलाईन शॉपिंगपॅन कार्ड काढणे व एमपीओएस सेवा ही कामेही कंपनी करून देते. कंपनीच्या नेटवर्कमधील 90 टक्क्यांहून अधिक व्यक्ती निम-शहरी व ग्रामीण भागांत राहतात. स्पाईस मनी अॅप’ (अधिकारी अॅप) आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून स्पाईस मनीच्या सेवा उपलब्ध आहेत. या यूजर-फ्रेंडली इंटरफेस व उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या प्लॅटफॉर्मने गगल प्ले स्टोअरवर 4.4 स्टार असे मानांकन मिळवले आहे. या उद्योगातील ते सर्वात उत्कृष्ट असल्याचे मानण्यात येते. भारताच्या सर्व भागातील सर्वसामान्यांसाठी आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि स्पाइस मनी अधिकाऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे विविध वित्तीय सेवांमधील दरी भरून काढण्याचे काम स्पाईस मनी करीत आहे. अधिक माहितीसाठी https://spicemoney.com/  ही वेबसाईट पाहा.


Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...