Monday, May 20, 2024

‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा’ या मालिकेत गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत.

 भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा या मालिकेत गौरव घाटणेकर

 प्रमुख भूमिकेत.

 

                      निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतेत्यांतील आगळेवेगळे विषय प्रेक्षकांना  नेहमीच आवडतातमालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतातअशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे.  ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा असे या मालिकेचे नाव असून ही मालिका प्रेक्षकांना १० जूनपासून सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.  मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहेआपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणारहे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा मालिकेची झलक प्रेक्षकांना विशेष आवडली आणि त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे.  मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर  प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेप्रेक्षकांचा लाडका अभिनेता गौरव घाटणेकर  या मालिकेत प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेहर्षवर्धन असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून  गौरव या मालिकेत चक्क दुहेरी भूमिका साकारणार आहेती म्हणजे तो या मालिकेचा निर्मातासुद्धा आहेश्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती केली जात असून १० जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



                    आता हर्षवर्धनची व्यक्तिरेखा कशी असेल आणि त्याचा परिवेष कसा असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहेपण ही व्यक्तिरेखा लवकरच  सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईलमालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहेआपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणारहे या मालिकेतून पाहायला मिळणार आहेलक्ष्मी असे या भूमिकन्येचे नाव असून अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेअभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे हिला प्रेक्षकांनी आजवर विविध व्यक्तिरेखांमधून पाहिले आहेप्रेक्षकांनी तिच्यावर भरभरून प्रेमदेखील केलं आहेपण आता ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा या मालिकेत भूमिकन्या म्हणजेच लक्ष्मी या व्यक्तिरेखेद्वारे ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहेआता हर्षवर्धन आणि लक्ष्मी यांची जोडी कशा प्रकारे प्रेक्षकांच्या भेटीस येईलहे प्रेक्षकांना प्रत्यक्ष मालिकेतूनच पाहायला मिळेलमालिका येत्या १० जूनपासून सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून गौरव घाटणेकर आणि श्रुती मराठे यांची निर्मिती असलेली ‘भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा  ही नवी मालिका पाहायला विसरू नका.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema

Star-Studded Premiere of “Puratawn” Witnessed a Grand Celebration of Cinema Legendary Sharmila Tagore and National Award Winner Rituparna Se...