Monday, May 13, 2024

कोकण कट्टा, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि निरामय डायबिटीज संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर यशस्वी संपन्न झाले.

 कोकण कट्टा,  देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि निरामय डायबिटीज संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर यशस्वी संपन्न झाले. 


विलेपार्ले विभागातील सुमारे 70हुन अधिक नागरिकांनी यां शिबिराचा लाभ घेतला नामवंत डॉक्टर सतिश नाईक यांनी मधुमेह रुग्णांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पायाच्या संवेदना तपासुन ताबडतोब सल्ला हीं दिला तसेच शिबिरात रक्त तपासणी हीं करण्यात आली सराफ डायग्नोस्टिक सेंटर च्या मार्फत हीं रक्त तपासणी करण्यात आली कार्यक्रमासाठी श्री सदानंद घोटीकर व  देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले डॉक्टर सराफ रक्त तपासणी केली तर डॉक्टर नाईक याणीव यांच्या टीमनेही रुग्णाच्या पायाची तपासणी केली.





आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रभाकर फणसेकर, रवी तांबे व प्राईड कॉम्पुटर संस्था यांनी सहकार्य केले कार्यक्रम प्रसंगी ऍड. मनमोहन चोणकर, निरामय संस्थेचे डॉक्टर सतिश नाईक, दे.ऋ ब्रा. संघाचे कार्यवाह श्री सादानंद घोटीकर, सचिव श्री विनय केकतपुरे व कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे उपस्थित होते. शिबिराचे शिस्तबद्ध नियोजन विवेक वैद्य, सुजीत कदम, सुनिल वनकुंद्रे, मंगेश राणे, हर्षल धराधर, शशिकांत पवार,प्रथमेश पवार मकरंद खाँडेकर यांनी केले मधुकर हेगडे यांनी डॉक्टर सतिश नाईक यांनी असे शिबीर पारल्यातील सर्व सोसायटी मध्ये घेऊन यां मधूमेह रुग्णतपासणी करण्याचा मनोदय पूर्ण करण्याचा मनोदय बोलून दाखविला. कोकण कट्टा व निरामय आता पार्ले पूर्व ठिकाणी सर्व वसाहतीत सोसायटी मध्ये जाऊन संपर्क करून डॉक्टर आपल्या दारी हीं अनोखी योजना राबवणार आहे.. पार्लेकर नागरिकांना व सोसायटी पदाधिकार्याना नम्र विनंती आहे की आपण यां उपक्रमात सहभागी  व्हावे 





No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...