Tuesday, November 24, 2020

 झोंबिवलीचे शूट पूर्ण दिग्दर्शक आदित्यसरपोतदार यांनी सांगितला शूटिंगचा अनुभव

झोंबिवलीचे शूट पूर्णदिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितला शूटिंगचा अनुभव

हॉरर-कॉमेडी जॉनरचा झोंबिवली हा मराठी सिनेमा पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. अर्थात मराठीमध्ये झोंबीज् पाहायला मिळणार तर चर्चा तर होणारच ना. तसेच ऍक्शन-ससपेन्स पडद्यावर उत्तम प्रकारे मांडणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांसारखी तगडी स्टारकास्ट यांची साथ या सिनेमाला लाभली आहे तर सिनेमा कधी प्रदर्शित होतोय असं अनेकांना नक्कीच वाटत असणार. सध्याच्या परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती महत्त्वाची काळजी घेऊन झोंबिवलीचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. नवीन वर्ष आता लवकरच येतंय आणि नवीन वर्षात हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता फक्त काही क्षणांची प्रतिक्षा करावी लागेल.

 

या सिनेमाच्या चित्रिकरणाबाबतीत सांगताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितले की, “२६ जुलैला झोंबिवलीचं शूट सुरु झालं होतं जेव्हा अनलॉकडाऊन नुकताच सुरु झालेला आणि शूटिंगला परवानगी मिळाली होती. नुकतंच १२ नोव्हेंबरला शूट संपलं. संपूर्ण युनिटने एकत्र येऊन सिनेमाचं शूटिंग सुरु केलं होतं आणि आता शूट संपलंय तर आजूबाजूची परिस्थिती ब-यापैकी कंट्रोलमध्ये आली आहे. दोन-तीन महिन्यांच्या काळामध्ये शूट करताना बरेच चॅलेंजेस आले होतेमुळात COVID Pandemic हा मोठा चॅलेंज होता. अशा वेळी शूट सुरु केले ज्यावेळी पावसाळा होतासिनेमाचं शूट दरवेळी इनडोअर होऊ शकत नाही. पाऊस आणि COVID Pandemic या दोन्ही गोष्टींवर मात करायची असेल तर अशा ठिकाणी जायला लागेल जिथे आपल्याला पाऊस पण कमी लागेल आणि COVID केसेस पण बऱ्याच कमी असतील असा विचार करुन आम्ही लातूर शहर निवडलं. शूटची सुरुवात मुंबईतून केली आणि नंतर लातूरला रवाना झालो. सिनेमाचं अर्ध्या अधिक शूट हे लातूर मध्ये झालं आहे. भर पावसाळ्यात आम्हाला वातावरणाने खूप साथ दिली. तसेच तेथील स्थानिक लोकांनी सुध्दा खूप साथ दिली.

 

५०% क्षमतेने चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे आणि सिनेसृष्टीचा एक भाग म्हणून या सध्याच्या परिस्थितीवर मत मांडताना आदित्य म्हणाले की, "थिएटर्स सुरु झाले ही ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे. माझ्यामते,  डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुस-या आठवड्यापासून थिएटर्स जरा चांगल्या पध्दतीने सुरु होतील. सध्या या काळात आपला प्रेक्षक वर्ग आपल्याला कशी साथ देतोयहे कुठेतरी आपल्याला बघायला लागेल. कारण आम्ही आता दोन्ही बाजूने बघतोय की एक प्रेक्षक म्हणून मी थिएटरला कितपत जाईन आणि फिल्म मेकर म्हणून लोकांकडून थिएटरला येण्याची कितपत अपेक्षा ठेवेन. या दोन्ही गोष्टी बघितल्या तर एकत्रच आहेत. आपण सिनेमा थिएटरमध्ये बघायला जाण्याची मानसिक तयारी करु.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO

  Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO Riding h...