Thursday, November 26, 2020

 बुगी वुगी स्पर्धक ते 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'चे परीक्षक - पूजा सावंत आणि धर्मेश सर यांचा प्रवास!

 

 

बुगी वुगी ते महाराष्ट्राज बेस्ट डान्सरएक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय...  

 

'महाराष्ट्राज बेस्ट डान्सरया कार्यक्रमातून  सोनी मराठी वाहिनी नृत्य कलाकारांसाठी घेऊन आली आहे एक चान्स/एक संधीमहाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून आपली कला सादर  करायला आले आहेत डान्सर्स आणि त्यांतून परीक्षक निवडणार आहेत बेस्ट डान्सर!

या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत धर्मेश सर आणि पूजा सावंत

नृत्यविश्वातलं एक प्रख्यात नाव म्हणजे 'धर्मेश सर'. आपल्या नृत्यानं धर्मेश एका रियालिटी शोमधून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर त्यानं पुन्हा कधी मागं वळून पाहिलं नाहीचित्रपटडान्स शोज करतकरत आज 'धर्मेश सरनृत्यक्षेत्रात यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचला आहे

सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा म्हणजे पूजा सावंत!  पूजा एका रियालिटी शोमधून आपल्या नृत्यानं प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तिनं पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाहीमराठी आणि हिंदी चित्रपट करत पूजा यशाच्या आणि प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोचली आहे

  फार कमी लोकांना माहीत असेल कीसोनी वाहिनीवर झालेल्या बुगी वुगी या कार्यक्रमात २००८ साली पूजा सावंत आणि धर्मेश सर यांनी भाग घेतला  होताधर्मेश सर त्या पर्वाचा विजेताही होतापूजा आणि धर्मेश सर यांनी  आपल्या प्रवासाची सुरुवात एकत्र केली आहेबुगी वुगीच्या टॉप  मध्ये पूजा आणि धर्मेश सर दोघंही होतेआज एका तपानंतर  दोघंही यशाच्या शिखरावर पोचले आहेत.  एका रियॅलिटी शोमधले स्पर्धक  ते 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'  या  कार्यक्रमाचे परीक्षक हा प्रवास या दोघांनी एकत्र केला आहेत्यांनी आपल्या आयुष्यात आलेले चान्स घेतले आणि आज इथपर्यंत पोचलेसोनी मराठी वाहिनी 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सरया कार्यक्रमातून असाच एक चान्स घेऊन आली आहे

पाहा, 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर', 30 नोव्हेंबरपासूनसोम.-मंगळ., रात्री 9 वाफक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO

  Shivangi Sharma Redefines Stardom with Music, Magic & a Million-Watt Presence WITH HER LAST SONG “INDIA KA IPL” WITH DJ BRAVO Riding h...