**कोण होणार करोडपती’: ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच माधुरींच्या चाहत्याचा जल्लोष, ब्लेझर काढून केला डान्स!*
टी-शर्टवर माधुरी दीक्षित यांचा फोटो आणि समोर प्रत्यक्ष माधुरी! जळगावच्या शरद राजपूत यांच्यासाठी आपल्या लाडक्या अभिनेत्रीसमोर हॉट सीटवर बसण्याची संधी म्हणजे स्वप्नपूर्तीच. ‘कोण होणार करोडपती’च्या पहिल्या स्पर्धकाची झलक दाखवणाऱ्या या व्हिडिओमध्ये त्यांचा आनंद पाहण्यासारखा आहे. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ जिंकताच शरद यांनी चक्क ब्लेझर काढला आणि सेटवर नाचत जल्लोष केला! त्याच वेळी त्यांच्या टी-शर्टवरचा माधुरींचा फोटोही झळकला!
या भागातील आणखी एक मनोरंजक क्षण म्हणजे जेव्हा माधुरीने शरद यांना त्यांच्या पत्नीबद्दल बोलतं केलं. त्यावर शरद हसून म्हणाले, "ती माझं सगळं ऐकते." हे ऐकून माधुरीने लगेचच फिरकी घेत विचारले, "ती फक्त ऐकते की कधीकधी ऐकवते देखील?" माधुरीचा हा मिश्किल प्रश्न ऐकून संपूर्ण सेटवर एकच हशा पिकला.
कोण होणार करोडपती या शोमधून माधुरी आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत येत असून, प्रेक्षकांना तिच्या चाहत्यांसोबतच्या अशाच दिलखुलास गप्पा, भावूक करणाऱ्या कथा आणि अविस्मरणीय क्षण पाहायला मिळणार आहेत.
माधुरींच्या सूत्रसंचालनात रंगणाऱ्या या नव्या पर्वात प्रेक्षकांना अशाच मनमोकळ्या गप्पा, मनाला भिडणारे अनुभव आणि चाहत्यांसोबतचे अविस्मरणीय क्षण पाहायला मिळणार आहेत.
पाहा ‘कोण होणार करोडपती’, १२ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता, सोनी मराठी आणि Sony LIV वर.
https://www.instagram.com/reel/DeA_YSAjW7Y/?stkn=MTgwOThvdXVkN3FhYw==

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST