डासांमुळे होणारे आजार रोखण्यासाठी जागरूकता मोहीम
स्वयं-सेवकां मार्फत एक हजार माहिती पत्रके आणि वैयक्तिक रिपेलंट्सचे वाटप
मीरा-भाईंदर, १७ एप्रिल २०१८:- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कीटकांद्वारे होणाऱ्या आजारांतून मृत्यू पावण्याचे प्रमाण २५% आहे. त्यापैकी ७१८ मृत्यू हे केवळ डेंग्यूमुळेच झाले आहेत. राज्य सरकारने नोव्हेंबर २०१७ पर्यंत ६८०० डेंग्यूच्या केसेस आणि ७१०० मलेरियाच्या केसेसची नोंदणी केली आहे. महाराष्ट्र सरकारने डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळे त्याला २०१६ मधील सूचित रोग म्हणून जाहीर केले आहे.
मीरा- भाईंदर परिसरात लहान मुलांचा सामाजिक, बौद्धिक आणि भावनिक विकास व्हावा म्हणून त्यांना घराबाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याची बांधिलकी जपणाऱ्या, घरगुती कीटकनाशक द्रव्य क्षेत्रातील गुडनाइट या आघाडीच्या कंपनीने मीरा- भाईंदर आणि परिसरातील नागरिकांमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम सुरु केली.
मीरा- भाईंदर परिसरात जॉगर्स पार्क, रामदेवपार्क गार्डन, साईबाबा उद्यान, महालक्ष्मीबाई उद्यान, चाचा नेहरू गार्डन, महाराणा प्रताप गार्डन, प्रमोद महाजन गार्डन अशा नऊ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण मोहिमेत नागरिकांना डेंग्यू आणि मलेरिया विषयी माहिती देण्यात आली. हे आजार, दिवसाच्या वेळेस डास चावल्यामुळे होतो लहान मुले शाळा किंवा घराबाहेर खेळत असतानाच त्यांचा प्रादुर्भाव होतो ही माहिती नागरिकांना दिली. कंपनीने डासांना कायम दूर ठेवण्यास मदत करणाऱ्या वैयक्तिक वापराच्या रिपेलंट्सच्या नमुन्यांचे मोफत वाटप केले व लहान मुलांची काळजी घेण्याचे आव्हान पालकांना करण्यात आले.