Liebherr strengthens India operations, opens new
manufacturing unit in Aurangabad, Maharashtra
·
Set up with an investment of Rs. 500 Crore, this
plant will produce high-quality refrigeration appliances tailored to suit the
Indian market
·
The range of refrigerators will bring in
cutting-edge German engineering technology tailored to suit the Indian market
·
Company aims to strengthen its position in the refrigerator
product segment in the coming years
May 08, 2018: Aurangabad (Maharashtra, India): After setting up four factories world-wide (3 in
Europe and 1 in Malaysia) and selling more than 2.2 million appliances in a
year, Liebherr,
refrigerator experts of German origin, today inaugurated its manufacturing unit
in India; at the Shendra Industrial
Park in Aurangabad, Maharashtra. The factory was inaugurated by two of the Liebherr Group’s shareholders
Dr. Isolde Liebherr & Mrs. Stefanie Wohlfarth in
the presence of other
dignitaries and dealers from across the country.
This is Liebherr’s first refrigerator
factory in India. Spread
over 50 acres, this facility is equipped with smart manufacturing features,
processes and assets capable of relaying accurate data and integrated
traceability system for production planning and review. With
production in full swing, the total production capacity is around 500,000 units
a year. The domestic appliances product
division manufactures refrigerators and freezers in five countries for domestic and
commercial use, including India.
Liebherr believes that the demand
for home appliances in India is going to grow significantly in the next few
years, primarily driven by a strong economic outlook. The growing demand,
coupled with government support for the sector has encouraged investments in this
sector. The positive demand variables can be attributed to the growing urban
and semi urban population with rising disposable income and aspirations which
is positively inclined towards adopting newer and more modern technologies.
Talking
about growth potential of the Indian market, Dr. Isolde Liebherr said, “India is
an important growth market for us. We see a huge scope for cooling appliances
in India as the rapid changes in lifestyle have led to rise in demand of those
appliances, which makes life more comfortable and easier. With the establishment of the new factory in India, we
are able to offer our very best high-end technology to the Indian market”.
She further added, “Our first factory was inaugurated in 1954
and the fact that it is still operational in Germany and producing a high
number of premium appliances is a true testimony to the quality standards and
performance levels adhered by us.”
Speaking at the inauguration, Mr. Radhakrishna Somayaji, Chief Sales
Officer, Liebherr Appliances India Private Limited said, "In keeping with Liebherr brand
values; our manufacturing strategy for Aurangabad will be to deliver high
quality appliances, establish global standards, employ the best team and
partner with a world-class local supplier base. As experts in the B2C/B2B segment,
we understood the requirements in India are different from that of other parts
of the world and hence it was advisable to manufacture in India blending our
German technology with an Indian flavour.
For more than 60 years now, refrigeration and freezing
equipment from Liebherr has carried the mark of quality, design and innovation
as its brand philosophy. Thanks to innovative technologies, high quality
materials & processes which we follow during manufacturing which make our
products durable and energy-efficient."
About Liebherr: The Liebherr Group consists of over 130
companies, in more than 50 countries on every continent and employs almost 44,000
people. In 2017, Liebherr achieved a consolidated turnover of more than 9.8 billion
euros. The Domestic Appliances product division manufactures refrigerators and
freezers in four countries for private and commercial use apart from this plant
at Aurangabad which will take this count of manufacturing units to five. The
divisional controlling company is Liebherr-Hausgeräte GmbH in Ochsenhausen
(Germany).
About the Liebherr Group: This decentralised group
of companies is divided into operatively managed and autonomous business units.
The product areas of the Group are spread over eleven divisions: Earthmoving
equipment, Mining, Mobile cranes, Tower cranes, Concrete technology, Maritime
cranes, Aerospace and transportation systems, Machine tools and automation
systems, Domestic appliances, Components and Hotels. The Group's central
holding company is Liebherr-International AG, whose shareholders are
exclusively members of the Liebherr family. Liebherr-International AG is located
in Bulle, Switzerland.
About Liebherr Domestic
Appliances: Engineer Hans Liebherr founded the
Domestic Appliance division in 1954 in Ochsenhausen (Germany). For more than 60
years now, Liebherr has been a premium manufacturer of innovative refrigeration
appliances for both the domestic and commercial sectors. Nowadays more than 2.2 million appliances leave various production
plants every year.
लीभेरने भारतातील व्यवसाय केला अधिक सक्षम, महाराष्ट्रातील
औरंगाबाद येथे नवा उत्पादन प्रकल्प सुरू
·
500 कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेल्या या
प्रकल्पात भारतीय ग्राहकांना साजेशा व अतिशय दर्जेदार रिफ्रेजरेशन उपकरणांची
निर्मिती केली जाणार
·
विविध रेफ्रिजरेट्समुळे भारतीय ग्राहकांच्या
गरजांनुसार अत्याधुनिक जर्मन इंजिनीअरिंग तंत्रज्ञान भारतात आणले जाणार
·
आगामी वर्षांत रेफ्रिजरेटर उत्पादनांच्या श्रेणीमध्ये
स्थान सक्षम करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट
मे
08, 2018: औरंगाबाद (महाराष्ट्र, भारत): जगभर चार कारखाने
(युरोपमध्ये 3 व मलेशियामध्ये 1) उभारणाऱ्या व वर्षभरात 2.2 दशलक्षहून अधिक
उपकरणांची विक्री केलेल्या लीभेर या जर्मनीतील रेफ्रिजेटरमधील तज्ज्ञ कंपनीने
भारतात, महाराष्ट्रातील औरंगाबादमधील शेंद्रा इंडस्ट्रीअल पार्कमध्ये आज उत्पादन
प्रकल्पाचे उद्घाटन केले. कारखान्याचे उद्घाटन डॉ. आयसोल लीभेर व सौ.
स्टेफानी वोलफर्थ या लीभेर समूहाच्या दोन भागधारकांच्या हस्ते व देशभरातील
डीलर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लीभेरचा हा भारतातील पहिला रेफ्रिजरेटर कारखाना आहे. 50
एकरांमध्ये विस्तारलेल्या या प्रकल्पात उत्पादन, नियोजन व आढावा याविषयी अचूक माहिती व एकात्मिक ट्रेसेबिलिटी सिस्टीम
ही क्षमता असलेली स्मार्ट उत्पादन वैशिष्ट्ये,
प्रक्रिया व मालमत्ता यांचा समावेश आहे. पूर्ण क्षमतेने उत्पादन करत असताना,
वर्षभरात एकूण अंदाजे 500,000 युनिटची उत्पादनक्षमता आहे. डोमेस्टिक अप्लायन्सेस या उत्पादन विभागात भारतासह
पाच देशांमध्ये घरगुती व व्यावसायिक वापरासाठी रेफ्रिजरेटर्स व फ्रीझर्स यांचे
उत्पादन केले जाते.
येत्या काही वर्षांत, प्रामुख्याने
सक्षम आर्थिक स्थितीमुळे, भारतातील होम अप्लायन्सेससाठीची मागणी मोठ्या प्रमाणात
वाढणार आहे. वाढती मागणी व या क्षेत्राला असलेला सरकारचा पाठिंबा यामुळे या
क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. वाढते विनियोग्य उत्पन्न, तसेच नव्या व
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे झुकलेली आकांक्षा असलेल्या वाढत्या शहरी
व निम-शहरी लोकसंख्येमुळे विशेषतः मागणी वाढते आहे.
व्यवसाय वाढीसाठी भारतात असलेल्या क्षमतेविषी
बोलताना, डॉ. आयसोल लीभेर यांनी सांगितले, “प्रगतीच्या दृष्टीने भारत ही महत्त्वाची बाजारपेठ
आहे. जीवनशैलीमध्ये झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे, जीवन अधिक आरामदायी व सुलभ
करणाऱ्या अप्लायन्सना मागणी वाढत असल्याने भारतात कूलिंग अप्लायन्ससेससाठी प्रचंड
संधी आहे, असे आम्हाला वाटते. भारतात नवा कारखाना सुरू केल्याने आम्हाला भारतात
अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करता येणार आहे”.
त्या पुढे म्हणाल्या, “आमच्या
पहिल्या कारखान्याचे उद्घाटन 1954 मध्ये झाले आणि हा कारखाना आजही जर्मनीमध्ये
उत्पादन करत आहे व मोठ्या संख्येने प्रीमिअम उत्पादनांची निर्मिती करत आहे, यातून
आम्ही ज्या गुणवत्ता मापदंडांचे व कामगिरीच्या स्तराचे पालन करतो ते खऱ्या अर्थी
दिसून येते.”
उद्घाटनानिमित्त बोलताना, लीभेर अप्लायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चीफ सेल्स
ऑफिसर राधाकृष्ण सोमयाजी यांनी
सांगितले, " लीभेरच्या
ब्रँड मूल्यांचे पालन करत, दर्जेदार अप्लायन्सेसची निर्मिती करणे, जागतिक मापदंड
निर्माण करणे, सर्वोत्तम टीम नियुक्त करणे व जागतिक दर्जाच्या स्थानिक
पुरवठादारांशी भागीदारी करणे, हे धोरण औरंगाबादमधील उत्पादन प्रकल्पात अवलंबले
जाणार आहे. बी2सी/बी2बी श्रेणीतील तज्ज्ञ म्हणून, भारतातील गरजा जगातील अन्य
भागांपेक्षा वेगळ्या असल्याचे आम्ही जाणतो आणि म्हणून भारतीय संदर्भ व आमच्या
जर्मन तंत्रज्ञानाची सांगड घालून भारतात उत्पादन घेणे योग्य ठरेल.
60 हून अधिक वर्षे, लीभेरच्या रेफ्रिजरेशन व फ्रीझिंग इक्विपमेंटने गुणवत्ता,
डिझाइन व नावीन्य या बाबतीत ठसा निर्माण केला आहे. याचे श्रेय आम्ही उत्पादन
प्रक्रियेदरम्यान अवलंबत असलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, दर्जेदार साहित्य व
प्रक्रिया यांना व टिकाऊ व उर्जाक्षम उत्पादने निर्माण करण्याच्या त्यांच्या
क्षमतेला जाते. "
लीभेरविषयी: लीभेर समूहामध्ये प्रत्येक खंडातील एकूण 50 देशांमध्ये अंदाजे 130 कंपन्या आहेत आणि
44,000 कर्मचारी आहेत. 2017 मध्ये, लीभेरने 9.8 अब्ज युरो इतकी एकूण उलाढाल केली. डोमेस्टिक
अप्लायन्सेस उत्पादन विभागात खासगी व व्यावसायिक वापरासाठी चार देशांत रेफ्रिजरेटर्स व फ्रीझर्स यांचे उत्पादन केले जाते
आणि औरंगाबादमुळे एकूण उत्पादन प्रकल्पांची संख्या पाच होणार आहे. विभागीय नियंत्रक कंपनी ओचसेनहॉसन
(जर्मनी) येथील लीभेर-हॉलगरेट गे एम बे ह असेल.
लीभेर समूहाविषयी: कंपन्यांचा हा विकेंद्रित समूह विविध विभागांद्वारे
व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या व स्वायत्त व्यवसाय युनिटमध्ये विभागला आहे. समूहाची
उत्पादने अकरा विभागांद्वारे उत्पादित केली जातात: अर्थमूव्हिंग
इक्विपमेंट, खाणकाम, मोबाइल क्रेन्स, टॉवर क्रेन्स, काँक्रिट तंत्रज्ञान, मरिटाइम
क्रेन्स, एअरोस्पेस व वाहतूक व्यवस्था, मशीन टूल्स व ऑटोमेशन सिस्टीम्स, डोमेस्टिक
अप्लायन्सेस, कम्पोनंट्स व हॉटेल्स. समूहाची सेंट्रल होल्डिंग कंपनी लीभेर-इंटरनॅशनल एजी असून, तिचे भागधारक
केवळ लीभेर परिवारातील सदस्य आहेत. लीभेर-इंटरनॅशनल एजी स्वित्झर्लंडमधील
बुल्ले येथे आहे.
लीभेर डोमेस्टिक अप्लायन्सेसविषयी: इंजिनीअर हान्स लीभेर यांनी 1954 साली ओचसेनहॉसन (जर्मनी) येथे
डोमेस्टिक अप्लायन्स विभागाची स्थापना केली. 60 वर्षांहून अधिक काळ, लिभेरने
देशांतर्गत व व्यावसायिक क्षेत्रांसाठी नावीन्यपूर्ण रेफ्रिजरेशन अप्लायन्सेसची
प्रीमिअम उत्पादक म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. आता दरवर्षी उत्पादन प्रकल्पात
2.2 दशलक्षहून अधिक अप्लायन्सेस तयार होतात.