मित्सुई अॅण्ड कं. इंडिया प्रा. लि. भारतात आणणार जपानमधील आघाडीचा बेबी डायपर ब्रॅण्ड
जपानची प्रमुख एफएमसीजी कंपनी असलेल्या काओ कॉर्पोरेशनचे उत्पादन असलेल्या मेरिसचे लॉन्चिंग
३० जुलै २०१८ : जपानमधील आघाडीचा `मेरिस` हा बेबी डायपर ब्रॅण्ड भारतात अधिकृतपणे लॉन्च करीत असल्याची घोषणा मित्सुई अॅण्ड कं. इंडिया प्रा. लि.ने केली. जपानच्या एफएमसीजीमधील मोठी कंपनी असलेल्याकाओ कॉर्पोरेशनच्या तीन प्रमुख ब्रॅण्डपैकी एक ब्रॅण्ड मेरिस आहे. या कंपनीला विक्रीतून वर्षाला १५०० अब्ज येन एवढे उत्पन्न मिळते. टेप आणि पॅण्ट्स डायपरच्या विक्रीमूल्याच्या हिस्सेदारीबाबत जपानच्या बेबी डायपरमार्केटमधील आघाडीचा प्रीमियम ब्रॅण्ड म्हणून या कंपनीने सलग ११ वर्षे आपले स्थान अबाधित राखले आहे. भारतात बेबी डायपर मार्केटच्या वाढीला पोषक वातावरण असल्याने मेरिसच्या माध्यमातून मित्सुई अॅण्ड कं.इंडिया प्रा. लि.नेही बाजारपेठेत उतरण्याचे ठरविले असून देशात तो प्रीमिय बेबी डायपर ब्रॅण्ड म्हणून अव्वल ठरेल.
मेरिसच्या उत्पादनांमध्ये टेप आणि पॅण्ट डायपर तसेच त्वचाची निगा राखणाऱ्या उत्पादनांचा समावेश आहे. मित्सुई अॅण्ड कं. इंडिया प्रा. लि. या कंपनीने भारतात टेप आणि पॅण्ट डायपर्स उपलब्ध केले असून त्यांची विक्रीकेवळ अॅमेझॉनवर (https://www.amazon.in/b?node= 15329486031) करण्यात येत आहे. मेरिस टेप आणि पॅण्ट डायपर हे लहान बाळांच्या त्वचेच्या दृष्टीने अतिशय मुलायम असून तेच या ब्रॅण्डचे प्रमुखवैशिष्ट्य आहे. टेप डायपरमध्ये त्रिस्तरीय एअर-थ्रू सिस्टीम आहे. पहिला स्तर काहीसा हवेशीर असून त्यातील विशिष्ट प्रकारची जाळी बाळाच्या त्वचेला डायपरचा थेट स्पर्श होऊ देत नाही. डायपर आणि त्वचा यातील याअंतराद्वारे ओलावा आणि कोंदटपणा रहात नाही. दुसरा स्तर द्रवशोषक असून जो द्रव शोषून घेतो आणि ओलावा होऊ देत नाही. तिसरा स्तर हा ओलाव आणि द्रावापासून निर्माण होणारी उष्णाता पूर्णपणे काढूनटाकण्यासाठी सहाय्यभूत आहे. तर दुसरीकडे पॅण्ट डायपरमध्ये कंबरेजवळील भाग वैशिष्ट्यपूर्णरीत्या हवेशीर ठेवण्यात आला आहे. कंबरेभोवती असलेला डायपरचा भाग आणि त्वचा यामध्ये ठेवण्यात आलेल्यापोकळीद्वारे उष्णता आणि ओलावा थेट बाहेर निघून जातो. ओलावा आणि उष्णता निर्माण होऊन डायपरमुळे पुरळ तयार होते; परंतु मेरिसच्या या तंत्रज्ञानामुळे बेबीच्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते.याव्यतिरिक्त स्मॉल आणि मीडियम आकाराचे मेरिस पॅण्ट डायपर हे उत्पादनाच्या तुलनेत अडीचपट अधिक ताणले जातात. त्यामुळे ते बाळाचे उदर आवळले जाणार नाही, अशा प्रकारे योग्यरीतीने हे डायपर बाळांनाघालता येतात.
भारतीय डायपर उद्योग हा सध्या सुमारे ४.६ अब्ज नगांवर किंवा ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. सन २०२२पर्यंत हा उद्योग सुमारे १० अब्ज नगांवर किंवा १४०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचण्याचीशक्यता आहे. वाढता जन्मदर, उच्च उत्पन्न, आरोग्याबाबतची जागरूकता आणि नोकरदार महिलांच्या संख्यत होणारी वाढ हे सर्व घटक बाजारपेठेच्या वाढीस चालना देणारे आहेत. गेल्या काही वर्षांत डायपरच्याखरेदीबाबतची ग्राहकांची मानसिकता देखील बदलली आहे. सुरुवातीला डायपरच्या शोषणाची क्षमता पाहिली जायची, पण आता हवेशीरपणा आणि कापडाचा मुलायमपणा यांना देखील महत्त्व दिले जात आहे.
भारतात मेरिस लॉन्च करीत असल्याच्या निमित्ताने मित्सुई अॅण्ड कं. इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. हिरोमिची यागी म्हणाले, `अत्यंत दर्जेदार बेबी डायपरच्या उत्पादनामध्ये काओकार्पोरेशन ही आशियात अव्वल असून तिच्या एकूण उत्पादनांमध्ये मेरिस हे जास्त मागणी असलेले उत्पादन आहे. आमच्या दृष्टीने वाढीसाठी भारतात अतिशय पूरक वातावरण आहे आणि दरवर्षी अंदाजे २५ दशलक्षबाळांचा जन्म होत असतानाही बेबी डायपर वापरण्याचे प्रमाण हे अद्याप ६ टक्क्यांहून कमी आहे. ८० अब्ज डायपरच्या वापराची क्षमता असताना देखील देशात सध्या ४.६ अब्ज नगांचा वापर होत आहे. आता मेरिस लॉन्चकेल्यानंतर ही संख्या वाढेल, अशी आम्ही आशा करतो.`
भारतातील वितरण व्यवस्था आणि मार्केटिंगच्या धोरणाबाबत श्री. यागी पुढे म्हणाले, `सध्या आम्ही जपानमधून भारतात मेरिसची आयात करीत आहोत. आमच्या वेअरहाऊसमध्ये ते साठवून ठेवत असून ते केवळअॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आमच्या मार्केटिंगचा भाग म्हणून आम्ही मेरिसच्या दर्जाबाबत ग्राहकांचे काम मत आहे, हे जाणून घेणार आहोत.`
भारताव्यतिरिक्त मेरिसची जपान, चीन, इंडोनेशिया आणि रशियात विक्री केली जाते.
नवजात अर्