जिवोदॉनतर्फे भारतात नवी, अत्याधुनिक फ्लेवर्स उत्पादन सुविधा पुणे येथे सुरू
· आशिया- पॅसिफिक प्रदेशात आक्रमक विस्तार करण्याच्या जिवोदॉनच्या विकास महत्त्वाकांक्षेसाठी ६० दशलक्ष स्विस फ्रँकची गुंतवणूक
· या सुविधेद्वारे कंपनीच्या पर्यावरणसंदर्भातील कार्यवाही योजनेसाठी महत्त्वाचे योगदान
स्वाद आणि सुगंध क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी जिवोदॉनने आज पुणे, भारतात नव्या फ्लेवर्स उत्पादन सुविधेचे अधिकृत उद्घाटन केल्याचे जाहीर केले. या अत्याधुनिक कारखान्यासाठी ६०दशलक्ष स्विस फ्रँकची गुंतवणूक करण्यात आली आहे आणि ते आशिया- पॅसिफिक भागातील विकास क्षमतेचा लाभ घेण्याचे निदर्शक आहे.
स्वाद आणि चवीसंदर्भात उच्च दर्जाची उत्पादने वितरित करण्याच्या हेतूने आराखडा करण्यात आलेली ही उत्पादन सुविधा ४० हजार चौरस फुटांच्या प्रशस्त जागेत वसलेली असून त्यामुळे जिवोदॉनलाखाद्यपदार्थ, पेय आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करणे शक्य होईल. नवी सुविधा कंपनीच्या सध्या दमण येथे कार्यरत असलेल्या कारखान्यासाठी पूरक असून आता द्रवमिश्रण, पावडर मिश्रण, इमल्शन्स, प्रोसेस फ्लेवर्स, स्प्रे ड्राइंगची कंपनीची क्षमता भारत, नेपाळ व बांग्लादेशातील बाजारपेठांसाठी आणखी मजबूती आणणार आहे. जिवोदॉनया च्या नव्या सुविधेच्याठिकाणी सुमारे २०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
जिवोदॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिलस अँड्रीयर म्हणाले, ‘पुण्यात जागतिक दर्जाची स्वाद उत्पादन सुविधा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे व ही सुविधा जिवोदॉनच्या भारताशीअसलेल्या दीघकालीन बांधिलकी आणि वारशाचे तसेच आशिया- पॅसिफिकसारख्या उच्च विकास क्षमता असलेल्या बाजारपेठेवर धोरणात्मकपणे लक्ष केंद्रित करण्याचे ताजे उदाहरण आहे. आमचानवा कारखाना जिवोदॉनला आपल्या ग्राहकांबरोबर आणखी जवळून काम करत विविध प्रकारची उत्पादने आणि वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठेसाठी चवीचे असामान्य अनुभव देणे शक्य करेल.’
नवी उत्पादन सुविधा कंपनीची पहिली शून्य द्रवकचरा तयार करणारी सुविधा असून येथे सर्व सांडपाणी त्यावरील प्रक्रियेनंतर शुद्ध करून त्याचा फेरवापर केला जाईल. यामुळे पर्यायाने जिवोदॉनच्यापर्यावरणविषयक कार्यवाही योजनेसाठी महत्त्वाचे योगदान दिले जाणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी संपूर्ण सुविधेमध्ये प्रभावी एलईडी लायटिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे तसेच सौरपॅनेल्सचा समावेश करण्याचे काम सुरू असून त्यामुळे जिवोदॉनचे १०० टक्के अक्षय उर्जा वापरण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान मिळेल. स्थानिक पर्यावरणाचे जतन करण्यासाठी११०० झाडेही लावण्यात आली आहेत.
जिवोदॉनच्या फ्लेवर्स विभागाच्या आशिया- पॅसिफिक क्षेत्राच्या व्यावसायिक प्रमुख मोनिला कोठारी यांनी भारतीय बाजारपेठेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांतभारतातील खाद्यपदार्थ आणि पेय उद्योगक्षेत्रात प्रचंड मोठी वाढ झाली आहे आणि या बाजारपेठेत आम्ही सातत्यपूर्ण विकास पाहिला आहे. हे वेगवान रुपांतरण लक्षात घेता, आम्हाला याबाजारपेठांच्या गरजा पुरवण्यासाठी चपळ असणे आवश्यक असून भारतातील नवी उत्पादन सुविधा त्या हेतूने आरेखित करण्यात आली आहे.’
रांजणगाव, पुणे, महाराष्ट्र येथे झालेल्या उद्घाटनपर समारंभासाठी जिवोदॉनचे उच्च व्यवस्थापन अधिकारी उपस्थित होते व त्यात मुख्य कार्यकारी अधिकारी जिलस अँड्रीयर आणि अध्यक्ष, फ्लेवर्सविभाग, लुई डीअमिको तसेच इतर मान्यवर आणि प्रादेशिक व्यवस्थापन सदस्यांचा समावेश होता.
जिवोदॉनबद्दल
जिवोदॉनही स्वाद आणि सुगंध क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी आहे. खाद्यपदार्थ, पेय, ग्राहक उत्पादने आणि सुगंध भागिदारांच्या मदतीने जिवोदॉनजगभरातील ग्राहकांना आनंदित करणाऱ्याचवी आणि सुगंध तयार करते. ग्राहकाची पसंत जाणून घेण्याची तळमळ आणि सातत्याने नाविन्यनिर्मितीचा ध्यास यांमुळे जिवोदॉनअसामान्य स्वाद आणि सुगंध तयार करते, जे ग्राहकांना मोहितकरते. कंपनीने २०१८ मध्ये ५.५ अब्ज स्विस फ्रँकची विक्री पूर्ण केली आहे. स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या या कंपनीचे १४५ ठिकाणी स्थानिक अस्तित्व असून जगभरात सुमारे १३,६०० कर्मचारीआहेत. जिवोदॉनबद्दल अधिका माहितीसाठी www.givaudan.com या संकेतस्थळाला भेट द्या.
जिवोदॉन फ्लेवर्सबद्दल
स्थानिक चवींबद्दलचे जिवोदॉनचे सर्वसमावेशक ज्ञान, विस्तृत जागतिक नेटवर्क आणि धोरणात्मक अंतर्गत माहिती यामुळे ग्राहक कुठेही असले, तरी त्यांच्याबरोबर जास्त जवळून काम करता येते.उत्पादन निर्मितीबाबत गरजेनुसार उत्पादन तयार करण्याचा दृष्टीकोन ठेवल्यामुळे फ्लेवर्स विभाग हे ज्ञान, नाविन्य, सर्जनशीलता यांच्यासह ग्राहकांना ताज्या, अभिनव संकल्पना व उत्पादने पुरवते.जिवोदॉनदीर्घकाळ टिकणारे स्वाद आणि चवीचे अनुभव तयार करते, जे पेय, गोड आणि नमकीन पदार्थ व नाश्ता अशा विविध क्षेत्रांत ग्राहकांच्या भावनांना स्पर्श करते. उत्पादनाचा विभाग कोणताहीअसला, तरी जिवोदॉनतितक्याच तळमळीने खाद्यपदार्थ आणि पेय उत्पादने रूचकर बनवण्यासाठी झटत असते. आम्ही तुम्हाला ‘engege your senses’ साठी आमंत्रित करत होत. फ्लेवर्सबद्दलअधिक माहितीसाठी https://www.givaudan.com/ flavours या संकेतस्थळाला भेट द्या.