Press Note-‘रॉयल फॅबल्स’च्या पुण्यातील प्रदर्शनात अवतरणार 'झेलम'च्या शाही कलाकृतींचे वैभव!
‘रॉयल फॅबल्स’च्या पुण्यातील प्रदर्शनात अवतरणार 'झेलम'च्या शाही कलाकृतींचे वैभव!
६ ऑगस्ट २०१९ रोजी झेलम-मल्टी डिझायनर स्टोअरचा शाही प्रदर्शन सोहळा कॉनरॅड हॉटेल पुणे येथे पार पडणार आहे. झेलमआणि रॉयल फॅबल्स एकत्र येऊन हा प्रदर्शन सोहळा सादर करणार आहेत.
रॉयल फॅबल्स हे या वर्षी १०व्या वर्षात पदार्पण करत आहेत आणि हे भारतातील एकमेव असे मंच आहे जे पारंपारिक भारतीयराजेशाही जगाचा देखावा वा त्याची मांडणी करून जगासमोर प्रसिद्ध करतात. लेखक आणि लाईफ स्टाईल पत्रकार अंशू खन्नायांनी रॉयल फॅबल्सची निर्मिती केली. गेल्या ९ वर्षात रॉयल फॅबल्सने अत्यंत सुंदर अशी प्रदर्शने भारतभर आयोजित केली तसेचवेगवेगळ्या शहरात जसे की मार्र्केश, बँकॉक, लॉस अँजेलिस, व्हँकूवर, डॅलस आणि मियामी येथे देखील प्रदर्शने आयोजितकेली.
‘झेलम’चे मुंबईतील आउटलेट हे सांताक्रुझ पश्चिम आणि पेडर रोड येथील अँटिलीया या भारतातल्या सर्वात महागड्यानिवासस्थान असणाऱ्या जागेत आहे. तसेच पुण्यामध्ये बाणेर येथे देखील आहे.
हे प्रदर्शन किशनदास आणि कं देखील सादर करीत असून ते हैदराबादचे प्रतिष्ठित अलंकार ते पुण्यामध्ये प्रदर्शित करणारआहेत. नवाबांचे ज्वेलर्स आणि खास नववधूंसाठी आयकॉनिक ब्रँड असलेले किशनदास, ‘प्लमटिन’ यांच्या सहकार्याने त्यांचेफेस्टिव्ह कलेक्शन देखील सादर करणार आहेत.
रॉयल फॅबल्सच्या सोबतीने झेलमने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ अशी असणार आहे. ३वेगवेगळ्या कलाकृतींच्या निर्मात्यांशी संवाद साधण्यासाठी दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशी वेळ ठेवण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये ३ वेगवेगळ्या पद्धतीचे पेहराव ठेवण्यात येणार आहेत ज्यामध्ये कॉटन क्लासिक्स, वधूसाठी ब्राईडल वेअरआणि हैरलूम यांचा समावेश असेल.
‘कॉटन क्लासिक्स’मध्ये आपल्याला विविध हातकाम केलेली कलाकुसर पाहायला मिळेल तसेच वेल्वेटस, फ्लोरल प्रिंट्स आणिअशा बऱ्याच सुंदर कलाकृती बघायला मिळतील. ‘ब्राईडल वेअर’ हे खास नववधूंसाठी तयार केलेले पेहराव असणार आहेत ज्यातशिफॉन-ओम्बरे, एम्ब्रॉयडरी आणि बॉर्डर्स यांचा सुंदर प्रकारे उपयोग केलेला दिसेल. याचबरोबर ते अत्यंत उत्तम दर्जाचेएम्ब्रॉयडरी केलेले ‘हैरलूम्स’ आणि कोटा सिल्क ओढणी यांचा देखील समावेश असेल.
विविध पारंपरिक कला सादर करण्यासाठी या प्रदर्शनांध्ये विविध प्रांतातील कलाकारांना संधी मिळाली आहे. यामध्ये किशनगढकला शाळेतील पॉप आर्ट कलाकार पारंपारिकतेच्या सन्मानार्थ कविता सादर करणार आहेत. तसेच मध्य प्रदेश मधील गोंड, इस्लामिक आणि आदिवासी कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत. राजा रवी वर्मा यांच्या विविध चित्रांचे देखील प्रदर्शन यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
रॉयल फॅबल्सचे संस्थापक अंशु खन्ना म्हणतात, “रॉयल फॅबल्सला पुण्यात आणण्यास आम्ही फार उत्सुक आहोत आणि खऱ्याअर्थाने रॉयल डिझाइनर्स सोबत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या झेलम दळवी यांच्यासोबत काम करायची संधी मिळाल्याबद्दलआम्ही खूप आनंदी आहोत. २०१० मध्ये स्थापित केलेला हा व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी एक ध्यास आहे. राजवाड्यातीलउच्चं दर्जाचे पेहराव आणि त्याचा शाही बाणा जिवंत ठेवता यावा असे वाटते. अजूनही जे मोठ्या राजमहालात आणिकिल्ल्यामध्ये विणकाम, नक्षिकाम, शिवणकाम करणारे कारागीर आहेत त्यांची कला जिवंत ठेवण्याचे काम माझ्या रॉयलफॅबल्स मार्फत घडते याचा आनंद होतो.''
“आमचे दालन, डिझायनर्स, आमची सेवा आणि ग्राहकांसाठी केलेले गुणवर्धन याद्वारे 'झेलम'च्या माध्यमातून आम्हीपुण्यामध्ये ग्राहकांना उच्च गुणवत्ता आणि दर्जेदार अनुभव देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. मुंबई शाखेसोबतपुण्यातही उत्तमोत्तम डिझाईन्सचे जगभरातील लेटेस्ट ट्रेंड थेट फॅशनच्या रनवे पासून थेट ग्राहकांपर्यंत आम्ही पोचवतो”, असेझेलम दळवी यांनी म्हटले आहे.
या शाही प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नक्की भेट द्या ६ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ ते रात्री ८ या दरम्यान कॉनरॅड हॉटेलपुणे येथे.