सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कलाकारांनी आपल्या सर्वात प्रिय मित्रांविषयी भावना व्यक्त करत केले सेलिब्रेशन!
मैत्री हा असा वारू आहे जो कधीच भरकटत नाही. हे असे प्रेमाचे बंधन आहे जे कधीही सुटत नाही. जो आपल्याला जाणतो, जो आपण निवडक मित्रपरिवाराचा भाग बनतो, आपल्या कठीण दिवसात आपल्याला पाठबळ देतो अन् मागचा-पुढचा विचार न करता जो आपली खोडीही काढू शकतो, असा मित्र लाभणे हे खासच असते. लवकरच फ्रेंडशिप डे येतोय. या निमित्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कलाकारांनी आपल्या या मैत्रीच्या प्रेमळ अलिखित कराराची मुक्तकंठाने स्तुती केली. तसेच आपले मित्र अन् सुख-दु:खाच्या भागीदारांच्या सन्मानाप्रित्यर्थ चषकही उंचावले!
अपनापन... बदलते रिश्तों का बंधन या मालिकेत मन्नाची भूमिका साकारणारी अभिनेत्री महक घई म्हणाली, “मला वाटतं की या वर्षी फ्रेंडशिप या शब्दाला नवा अर्थ प्राप्त झाला आहे. अपनापन... मालिकेत काम करताना मला आयुष्याची नवी शिदोरी मिळाली आहे. इतकेच नव्हे तर चिरकाल जतन करता येतील, असे मैत्रही मला इथे मिळाले आहेत. अर्थात, मला माझे या व्यावसायिक जीवनाच्या बाहेरचेही बरेच मित्र आहेत. त्यांनी मला जपलं आहे, निर्व्याज प्रेम देत मैत्रीचे सिंचन केले आहे. कुठलेही संकट असो, ते मला पाठबळ देतील, याचा मला विश्वास आहे. जेव्हा मी चुकत असेल तेव्हा माझी कानउघाडणीही करतील. अपनापन... च्या सेट्सवर आमचे मैत्रीविश्व चांगलेच बहरत चालले आहे. आताच कुठे आम्ही एकमेकांना जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. मला हर्ष, श्रद्धा, गौतम आणि अनमोल हे खूप आवडतात. आम्ही सेटवर खूप मस्ती करत असतो. आमची बऱ्याच काळापासून ओळख असल्यासारखे वाटते. मैत्री हे असे पवित्र नाते आहे, जे स्वार्थी गरजांपासून अस्पर्शित असते. यामुळे येत्या फ्रेंडशिप डे ला मी कामना करते की, ज्यांनी त्यांची गुपिते आपल्याला विश्वासाने सांगितली, मनातील अंतस्थ इच्छा बोलून दाखवल्या, त्यांचे खरे रूप आपल्याला दाखवले, अशा मित्रांना आपण सर्वांनी जपून ठेवायला हवे. नुसत्या फ्रेंडशिप ब्रेसलेटपेक्षा आपल्या मैत्रीच्या घट्ट धाग्यांनी त्यांना बांधून ठेवायला हवे.”
बड़े अच्छे लगते हैं - 2 मालिकेत आदित्यची व्यक्तिरेखा चितारणारा अभिनेता अजय नागरथ म्हणाला, “मला खूपसारे मित्र आहेत. पण जर आपण या दूरचित्रवाणी सृष्टीतील मित्रांबाबत बोलत असू तर त्यात नकुल, अभिनव, उत्कर्ष आणि आंचल हे अग्रक्रमाने येतील. एकमेकांशी आमचं वेगळ्याच पातळीवरचं कनेक्शन आहे! आम्ही सर्व 'बड़े अच्छे लगते हैं - 2’ च्या सेट्सवर भेटलो होतो. तेव्हापासून प्रत्येक दिवशी आमच्यातील मैत्रीची नाते आणखीच घट्ट होत गेले आहेत. जेव्हा आम्ही सेट्सवर पोहोचतो, तेव्हा आम्ही अविभाज्य होऊन जातो. अगदी एकमेकांसोबत जेवण-खाण्यापासून ते पटकथेचे वाचन करण्यापर्यंत, सेट्सवरील वातावरण हलके-फुलके ठेवण्यापर्यंत अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक संस्मरणीय आठवणींची गुंफण करण्यापर्यंत आम्ही सर्व सोबतच असतो. इतक्या कमी वेळेत आमची अशी गट्टी जुळेल, असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. हे मैत्र पुढेही कायम राहोत, अशी कामना करतो.”
अपनापन... बदलते रिश्तों का बंधन या मालिकेत निखिलची भूमिका साकारणारा अभिनेता सेझान खान म्हणाला, “मला वाटतं की, माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे नाते कोणते असेल, तर ते मित्रांसोबतचे. त्यांच्यासोबत माझ्या खूप गोड व संस्मरणीय आठवणी आहेत. मित्रांसोबतच्या माझ्या प्रेमळ आठवणी इतक्या जास्त आहेत की, मला वाटतं मी पुढे चालून यावर एक अख्खी कादंबरीच लिहू शकेन. मैत्री हे माझ्यासाठी असे एक नाते आहे, जे माझे भरणपोषण करते, जे मला समृद्ध करते, मी कोण आहे, याबद्दल माझे सक्षमीकरण करते आणि मला वैयक्तिकरीत्या सर्वोत्कृष्ट बनायला प्रेरित करते. त्यामुळे मित्रांसोबत असताना मी बिनदिक्कतपणे, नि:संकोचपणे जसा आहे जसा राहू शकतो. जणू काही त्यातील प्रत्येकाकडे माझ्या हृदयात शिरण्याची एक वेगळी किल्लीच असावी. एक किल्ली लावली की हास्यविनोदाचा दरवाजा उघडेल, दुसरी लावली की सक्षमीकरणाचा मार्ग उघडेल, इतर चावी फिरवली की माझ्या भल्याबु्ऱ्या गोष्टी उघडल्या जातील. म्हणजेच, माझ्या प्रत्येक आणि सर्वच मित्रांकडे माझ्या हृदयाचे दरवाजे उघडण्याच्या वेगवेगळ्या किल्ल्या आहेत!”
सुपरस्टार सिंगर – 2 या गायन रिअॅलिटी शोमधील कॅप्टन पवनदीप राजन म्हणाला, “सुपरस्टार सिंगर – 2 शोने मला खूप लोकप्रियता, ओळख आणि प्रेम मिळवून दिले आहे. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, या शोने मला काही अत्यंत जवळचे मित्र मिळवून दिले आहेत. हे मित्र असे आहेत, की दिवसातील कोणत्याही क्षणी मी त्यांच्यावर बिनधास्तपणे विसंबून राहू शकतो. जेव्हा मी अपयशी ठरलो होते, तेव्हा या सर्व मित्रांनी मला खूप पाठबळ दिले. त्यांनी कायम खंबीर पाठिंबा देत पुन्हा भरारी घेण्यासाठी मला खूप मदत केली. आम्ही सर्व एकत्रपणे रियाज करतो, एकत्रपणे खातो-पितो आणि एकत्रितरीत्या मौजमस्तीही करतो. माझ्या स्वभावामुळे माझे मोजकेच मित्र आहेत. मात्र, ते आता माझ्या परिवाराचा एक भागच बनले आहेत.“
सुपरस्टार सिंगर शोमधील कॅप्टन अरुणिता कांजीलाल म्हणाली,”खरे मित्र हे आपण जसे आहोत, तसेच आपल्याला स्वीकारतात, असे मी नेहमीच ऐकत आलेले आहे. ते आपल्यातील लहरीपणा, वेडेपणा, असुरक्षितता अन् जवळपास सर्वच गोष्टींसकट आपला स्वीकार करतात. सुपरस्टार सिंगर – 2 मध्ये मला असंच काहीसे बघायला मिळाले आहे. मी बऱ्याच काळापासून त्यांच्यासोबत आहे. यामुळे त्यांनी मला मी जशी आहे तशीच स्वीकारले आहे. ते आता मी निवडलेल्या परिवाराचे सदस्य आहेत. आज फ्रेंडशिप डेला प्रत्येकाला असेच मैत्र लाभोत, अशी मी प्रार्थना करते.“
सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन के कलाकारों ने अपनी सबसे खास दोस्ती को किया सलाम!
दोस्ती एक ऐसा जहाज है, जो कभी नहीं डूबता और ये सबसे खास रिश्ता है, जो हमेशा के लिए रहता है। एक ऐसा दोस्त होना बहुत खास बात है, जो आपको जानता है, जो आपका चुना हुआ परिवार बन जाता है, सबसे मुश्किल घड़ी में आपके साथ खड़ा रहता है और आप के साथ शरारत करने से पहले दोबारा नहीं सोचता! जहां फ्रेंडशिप डे नजदीक आ रहा है, वहीं सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन के एक्टर्स दोस्ती के अपने प्यारे रिश्ते को याद कर रहे हैं और अपने खास दोस्तों के बारे में बता रहे हैं,
'अपनापन... बदलते रिश्तों का बंधन' में मन्ना की भूमिका निभाने वालीं महक घई कहती हैं, "मुझे लगता है कि इस साल मेरे लिए 'दोस्ती' शब्द को एक नया अर्थ मिला है। अपनापन में काम करके मुझे न सिर्फ ज़िंदगी का एक नया नजरिया मिला, बल्कि मुझे खास दोस्त भी मिले हैं, जिन्हें मैं हमेशा संजोकर रखूंगी। बेशक, मेरे काम के दायरे से बाहर भी मेरे दोस्त हैं, जिन्होंने मेरा ख्याल रखा है और मुझे प्यार दिया है और मुझे पता है कि चाहे कुछ भी हो, वो हमेशा मेरा साथ देंगे। यहां तक कि जब मैं गलत होती हूं, तो वो मुझे सही भी करते हैं। अब अपनापन के सेट पर मेरी दोस्ती परवान चढ़ रही है और हम अब एक दूसरे को जानने लगे हैं। मैं हर्ष, श्रद्धा, गौतम और अनमोल को पसंद करती हूं, और हम सेट पर बहुत मस्ती करते हैं। ऐसा लगता है जैसे हम एक-दूसरे को कई सालों से जानते हों। दोस्ती एक ऐसा रिश्ता है जो पवित्र है और स्वार्थ से दूर है। इसलिए इस फ्रेंडशिप डे पर मैं चाहती हूं कि हम सभी उन लोगों को संजोएं, जिन्होंने अपने राज, अपनी गहरी इच्छाएं, अपनी सच्चा रूप हमसे बांटा और दोस्ती का ये बंधन फ्रेंडशिप बैंड से कहीं ज्यादा है।"
बड़े अच्छे लगते हैं 2 के अजय नागरथ उर्फ आदित्य कहते हैं, "मेरे कई दोस्त हैं, लेकिन अगर मैं इंडस्ट्री से अपने सबसे अच्छे दोस्तों की बात कर करूं, तो वो नकुल, अभिनव, उत्कर्ष और आंचल हैं। हम अगले लेवल पर जाकर एक दूसरे से जुड़ते हैं। हम लोग 'बड़े अच्छे लगते हैं 2' के सेट पर मिले थे और तब से हर गुजरते दिन के साथ हमारा रिश्ता बढ़ता ही जा रहा है। जैसे ही हम सेट पर पहुंचते हैं, हम बहुत अच्छी तरह घुल-मिल जाते हैं। लंच करने से लेकर स्क्रिप्ट पढ़ने, सेट पर मस्ती करने और सबसे खास यादें बनाने तक, हम सभी एक साथ रहते हैं। हमने कभी नहीं सोचा था कि इतने कम समय में हम इस तरह जुड़ जाएंगे। उम्मीद करता हूं कि हमारी दोस्ती हमेशा ऐसी ही बनी रहे।"
'अपनापन... बदलते रिश्तों का बंधन' में निखिल का रोल निभा रहे सिज़ैन खान कहते हैं, "मुझे लगता है कि दोस्ती मेरी ज़िंदगी के सबसे खास रिश्तों में से एक है। मेरे पास दोस्तों की सबसे प्यारी यादें हैं। मुझे लगता है कि मैं अपने दोस्तों के साथ गुज़ारी उन सभी यादों के बारे में एक उपन्यास लिखूं। मेरे लिए दोस्ती एक ऐसा रिश्ता है, जो मुझे संवारता है, समृद्ध बनाता है, मुझे वो बनने की ताकत देता है जो मैं हूं और मुझे अपना बेस्ट संस्करण बनाता है। इसलिए अपने दोस्तों के साथ मैं बेझिझक होकर, निडरता से खुद को बनाए रख सकता हूं। यह ऐसा है, जैसे मेरे हर दोस्त के पास मेरे दिल के दरवाजे की एक अलग चाबी हो। जैसे कि एक चाबी हंसी की तिजोरी खोलने वाली, दूसरी हिम्मत के द्वार खोलने वाली और एक अन्य चाबी मेरे कारनामों का पिटारा खोलने वाली! इसलिए, मेरे हर दोस्त के पास मेरे दिल की एक अलग चाबी है।"
सुपरस्टार सिंगर 2 के कैप्टन पवनदीप राजन बताते हैं, "सुपरस्टार सिंगर 2 ने मुझे बहुत प्रसिद्धि, पहचान और प्यार दिया है। लेकिन इससे भी खास बात यह है कि इसने मुझे कुछ बेहतरीन दोस्त दिए हैं। वो दोस्त जिन पर मैं कभी भी भरोसा कर सकता हूं। जब मैं गिरा तो उन्होंने मुझे संभाला और हमेशा मेरा साथ देकर मुझे वापस ऊपर उठाने में भी मदद की। हम सभी एक साथ प्रैक्टिस करते हैं, साथ खाते हैं और साथ में मस्ती करते हैं। मैं जैसा हूं उसकी वजह मेरे कुछ दोस्त हैं लेकिन ये लोग अब मेरा परिवार बन गए हैं।"
सुपरस्टार सिंगर कैप्टन अरुणिता कांजीलाल ने कहा, "मैंने हमेशा सुना है कि सच्चे दोस्त आपको उसी तरह अपनाते हैं जैसे आप हैं। वे आपको आपके पागलपन, आपकी असुरक्षाओं, और लगभग आपकी हर चीज के साथ स्वीकार करते हैं। और यहां 'सुपरस्टार सिंगर 2' में मुझे यही देखने को मिला। उनके साथ लंबे समय तक रहते हुए उन्होंने मुझे मेरे सच्चे रूप में स्वीकार किया है। वे मेरे चुने हुए परिवार हैं और आज फ्रेंडशिप डे पर मेरी यही ख़्वाहिश है कि हर किसी को ऐसा कोई दोस्त जरूर मिले।"