Thursday, August 25, 2022

                                      डोंबिवली मध्ये लवकरच दाखल होणार 

                                    'कल्याण ज्वेलर्स'

महाराष्ट्रातील कल्याण ज्वेलर्सची दालन संख्या पोहोचली १५ वर डोंबिवली, २५ ऑगस्ट २०२२: कल्याण ज्वेलर्स या भारतातील सर्वात विश्वसनीय व आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडने आज घोषणा केली की. डोंबिवली येथे ब्रँड-अँबेसेडर्स प्रभू गणेशन व पूजा सावंत यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे ज्वेलरी ब्रँडचे महाराष्ट्रातील १५वे शोरूम आणि जगभरातील १६०वे शोरूम असेल.

शोरूम ओपनिंग अद्वितीय स्टाईल मध्ये साजरे करत ज्वेलरी ब्रॅण्डने प्रत्येकी १ लाख रुपये किमतीच्या डायमंड ज्वेलरी खरेदीवर जवळपास १०,००० रू सूटची घोषणा केली आहे. तसेच कल्याण ज्वेलर्स घडणावळवर प्रतिग्रॅम जवळपास ३०० रूपयांची, तसेच गोल्ड एक्सचेंजवर प्रतिग्रॅम ५०रू सूट देणार आहे. कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममध्ये सोन्याच्या किमतीचे मानकीकरण करणारा ‘विशेष कल्याण गोल्ड रेट’ सादर केला आहे. जो बाजारपेठेतील सर्वात कमी रेट आहे. भारतातील कल्याण ज्वेलर्सच्या शोरूममधून ग्राहक आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. या अद्वितीय ऑफर्स ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत सुरु राहतील.

श्री रमेश कल्याणरमन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स, ''महाराष्ट्रामध्ये प्रवेश केल्यापासून कल्याण ज्वेलर्स स्वतःला बाजार पेठेतील सर्वात पसंतीचा आणि सर्वात विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला आहे. आमच्या प्रत्येक शोरूममध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागांतील ग्राहकांच्या पसंतींच्या आधारे उत्पादनाची ऑफर उपलब्ध केली आहे. आमची हायपरलोकल वेडिंग ज्वेलरी लाइन ‘मुहूर्त’ पासून ते महाराष्ट्रीयन पारंपारिक ज्वेलरी कलेक्शन ‘संकल्प’ पर्यंत, आमच्या ज्वेलरी डिझाइन्स या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये वैयक्तिकृत आणि सेवा-समर्थित खरेदीचा अनुभव देऊन आम्ही आमच्या ग्राहकांना सुविधा प्रदान करण्यात मोठी प्रगती केली आहे. आज, आम्ही बाजारपेठेतील ग्राहकांची निष्ठा व ब्रँड उपस्थितीचा आनंद घेतो आणि महाराष्ट्रात आमची ब्रँड उपस्थिती व बाजारपेठेतील हिस्सा वाढवून ते आणखी मजबूत करण्याची आमची इच्छा आहे.”


                       ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ची पहिली वर्षपूर्ती साजरी 

                         वर्षपूर्तीनिमित्त प्रेक्षकांसाठी खास भेट.



‘प्लॅनेट मराठी’ नेहमीच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी आणत असते. जगातील पहिल्या वहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने आपल्या प्रेक्षकांच्या मनात स्थान प्रस्थापित केले आहे. येत्या ३१ ऑगस्ट रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ पहिली वर्षपूर्ती साजरी करत आहे. भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या हस्ते ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे लॉंचिंग करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ हे दर्जेदार आशय देत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

पहिल्या वर्षपूर्तीचे निमित्त साधत संजय जाधव दिग्दर्शित आणि प्लॅनेट मराठी निर्मित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर झळकणार आहे. सांगितीक मैफल घडवणाऱ्या या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे हे कलाकार मुख्य भुमिकेत झळकत आहे. 

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “गेल्या वर्षी लॉंच झालेले जगातील पहिले मराठी ओटीटी म्हणुन ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ नावारूपात आले. ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने गेल्या वर्षभरापासून एका पेक्षा एक दर्जेदार वेबसीरिज, वेबफिल्म तसेच शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची रिघ लावली आहे. ‘जुन’, ‘अनुराधा’, ‘रानबाजार’, ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘प्लॅनेट मराठी’कडून प्रेक्षकांच्या आणखी अपेक्षा वाढल्या आहेत. येत्या आगामी वर्षात भव्य, मनोरंजनात्मक आशय प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ‘तमाशा लाईव्ह’ मधील गाण्यांना प्रेक्षकांकडून खूपच पसंती मिळत आहे. वर्षपुर्तीचे औचित्यसाधत आमचा सिनेमा ‘तमाशा लाईव्ह’ ३१ ऑगस्टपासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर झळकणार आहे.”

             संगीता अहिर यांनी गवळी कुटुंबासोबत 'दगडीचाळ २'

                                        हा सिनेमा पाहिला.... 

 


राजकारण असो किंवा गॅंगवॉर अरुण गवळी हे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. 'दगडीचाळ २' हा चित्रपट मोठ्या दिमाखात अक्ख्या महाराष्ट्रातील  चित्रपटगृहात झळकत असून या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे संगीता अहिर यांनी संपूर्ण गवळी कुटुंबियांसोबत  चित्रपटगृहात जाऊन 'दगडीचाळ २' हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर आशाताई गवळी ह्या भावूक झाल्या होत्या. चित्रपटाचे खूप कौतुकही त्यांनी केले.  तिकिट कॉउंटरवर या चित्रपटाची  हाऊसफुल पाटी लागलेली पाहायला मिळत असून प्रेक्षक ऍडव्हान्स बुकिंग करत आहेत. 

या चित्रपटाबद्दल संगीता अहिर सांगतात, "अरुण गुलाबराव गवळी या वजनदार व्यक्तिमत्वावर सिनेमा करण्याची कल्पना डोक्यात येते आणि तीच कल्पना तितक्याच ताकदीच्या कलाकारांसोबत  पडद्यावर  उतरवणं मोठ आव्हान होता पण ते आव्हान हसत हसत स्वीकारून 'दगडीचाळ २' हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी आणला. लोकांचे हे भरभरून मिळालेले प्रेम पाहून मला खरंच खूप बळ मिळाला आहे. हा चित्रपट गवळी कुटुंबियांसोबत मला पाहायला मिळाला याचा मला आनंद आहे. 'दगडीचाळ २' चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासात आशाताई गवळी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचा खारीचा वाटा आहे.या चित्रपटाला सुपरहिट करणाऱ्या माझ्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद."

Wednesday, August 24, 2022

            'बॉईज ३' चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला..... 


बॉईज सिरीजने सर्वांचच भरपूर मनोरंजन केले आहे.धैर्य, ढुंग्या आणि कबीर ह्या त्रिकूटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. 'बॉईज' आणि 'बॉईज २' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः दंगा घातल्यानंतर  'बॉईज ३' काय नवीन हंगामा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच 'बॉईज ३'च्या  संपूर्ण टीम च्या उपस्तिथीत या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे. 'बॉईज ३' चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे त्रिकूट आणि विदुला करत असलेल्या प्रवासाची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे. लुंगीतलं हे कमाल त्रिकूट दक्षिण दिशेला करत असलेल्या प्रवासाची ही गोष्ट आहे. त्यांच्या या प्रवासात आलेलं विदुला नावाचे वळण कोणत्या ठिकाणी या तिघांना घेऊन जाणार ते चित्रपट पहिल्या नंतरच कळणार. विदुलाचा कमाल अंदाज ,सुमंत शिंदे ,पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांच्या उत्कृष्ट अभिनयाने रंगलेला हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.चित्रपटातील 'लग्नाळू २.o' गाणं प्रेक्षकांना भरपूर आवडले असून विदुलाची वेगळीच छबी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. मैत्रीमध्ये एकमेकांना अडचणीत टाकणं असो किंवा त्याच अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठीची मदत असो मित्र नेहमीच हाजीर असतात. मैत्रीची व्याख्या नव्या अंदाजात ह्या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. धैर्य, ढुंग्या आणि कबीर यांच्यातील मैत्री खरंच खूप धमाल असणार आहे हे ट्रेलर पाहून वाटत आहे. 

  



या ट्रेलर बद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, " 'बॉईज ३' चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटासाठीची  प्रेक्षकांची वाढती उत्सुकता पाहून खूप भारी वाटत आहे. सर्वच 'बॉईज ३' च्या टीमने खूप मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षकांच्या अपेक्चित्रपट खरा उतरेल याची मला खात्री आहे."                                                                             

दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर म्हणतात," 'बॉईज' आणि 'बॉईज २' ला मिळालेल तुफान प्रतिसाद पाहता मनोरंजनात भर म्हणून यंदा 'बॉईज ३' तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे.  १६ सप्टेंबर ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सर्व प्रेक्षक वर्गाचा प्रेम आणि आशीर्वाद राहो अशी आशा आहे." m सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज ३' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १६ सप्टेंबर रोजी ‘बॅाईज ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.


 आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा जिंकल्यानंतर, 2023 च्या उन्हाळ्यात           जिओ स्टुडिओजचा ‘उनाड’ चित्रपट सिनेमागृहात झळकणार


जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहुचर्चित व प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा चित्रपट  ‘उउन्हाळ्यात २०२३ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत ज्योती देशपांडे, अजित अरोरा, चंद्रेश भानुशाली आणि प्रितेश ठक्कर निर्मित ‘उनाड’ चित्रपट तरूणांवर चित्रीत असून आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भराटे, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, “ ‘उनाड’ हा चित्रपट तरूणांवर चित्रीत करण्यात आला असून हा चित्रपट पुढील वर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होत आहे. चित्रपट युवकांना योग्य दिशा दाखवणारा ठरेल अशी मला आशा आहे.” 

चेक रिपब्लिक (Czech Republic) येथे झालेल्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Zlin International Film Festival) युवा विभागातील फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘उनाड’ची  नुकतीच निवड झाली. 

‘उनाड’ही महाराष्ट्रातील एका छोट्या गावातील हर्णे येथील मासेमारी करणाऱ्या तीन युवकांची कथा आहे. शुभ्या, बंड्या व जमील हे तीन कोणतेही ध्येय नसलेले मित्र गावात दिवसभर हुंदडतात. गावातील सर्व स्थानिक त्यांना उनाड समजत असल्याने, तिघेही अडचणीत सापडतात. त्यांच्या आयुष्याच्या टप्प्यातील ही कहाणी आहे जी त्यांना कायमची बदलते.

Would we see Jhalak Dikhhla Jaa Season 10 participant Paras Kalnawat in Bigg Boss Season 16?


Paras Kalnawat, who has recently been in the headlines after his confirmation as one of the first Jhalak Dikhhla Jaa Season 10 contestants, has caused quite a stir in the industry after his exit from the television show 'Anupamaa'.

After his exit, his fans and admirers flocked the internet with love comments mentioning that they miss him and are eager to watch him on screen in Jhalak Dikhhla Jaa Season 10. What is noteworthy is that the Bigg Boss team has been rumored to be in talks with Paras Kalnawat to take him onboard as a contestant.



The makers of Bigg Boss are excited to host its season 16, which will air this year. The producers have already started contacting well-known personalities to appear on the show. According to the sources, actor Paras Kalnawat has been contacted to take part in the Bigg Boss reality show. Although there is no specific confirmation from the maker's end or from the actor’s end.

Paras Kalnawat is a recent favorite among the Indian Television audiences for his impressive performances in the television shows like Anupama, Meri Durga, Mariam Khan- Reporting Live, and the web series ‘Dil Hi Toh Hai’, where we have seen him in various avatars spreading his magic everywhere.

The last successful season of Bigg Boss was telecast in the year 2021. According to recent news, Bigg Boss 16 will go on air from 1st October with Megastar Salman Khan expected to shoot for the promo in September.

Tuesday, August 23, 2022

  "औरंगजेबाच्या स्वप्नांना धुळीस मिळवणारी वीरांगना 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी "

                                                या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न !


 औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या माती कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे. मुंबई मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला मोठ्या दिमाखात सुरूवात झाली असून या चित्रपटासाठी चित्रनगरी मध्ये भव्य सेट उभारला आहे. संपूर्ण सेट, हा इतिहासातील पराक्रमांमध्ये न्हाऊन निघाला आहे. 'प्लॅनेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि 'मंत्रा व्हिजन' निर्मित हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उत्तम कथानकाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विविध विषयांवरचे दर्जेदार चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी 'प्लॅनेट मराठी' कायम अग्रेसर असतं.


हा चित्रपट जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या "मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई" या ग्रंथावर आधारीत असून, "मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी" या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मराठी साम्राज्याचा औरंगजेबाच्या मनात पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. शिवाय चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात, ''छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच ह्या चित्रपटाद्वारे आपला लखलखीत इतिहास आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणीत आहोत. प्रेक्षकांना हा अनोखा चित्रपट नक्की आवडेल अशी माझी खात्री आहे." 

'मोगलमर्दिनी छत्रपती  ताराराणी' या चित्रपटाबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ''जेव्हा पासून हा चित्रपट येतोय अशी घोषणा केली तेव्हा पासूनच तांत्रिक टीम पासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच या चित्रपटासाठी स्वतःला झोकून  दिले आहे. इतक्या दिवसाचं  अभ्यास, वर्कशॉप , प्री वर्क, ही सर्व तयारी केल्यानंतर अखेर हा चित्रपट चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. सेटवर येण्याआधी सगळ्याच टीमने आपापल्या विभागामध्ये प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, हा चित्रपट सर्वोत्तम कसा करता येईल, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण टीम या विषयाला आणि चित्रपटाला योग्य न्याय देतील, यात शंका नाही. मला आनंद आहे की सोनाली सारखी गुणी अभिनेत्री ही मुख्य भूमिका साकारणार आहे. धाडस आणि शौर्य यांचे असामान्य असे मिश्रण असणाऱ्या छत्रपती ताराराणींचा अज्ञात प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा हा आमच्या संपूर्ण टीमचा उद्देश आहे."

“Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”

    “Saaffrons Miss India International & Saaffrons Mrs. India International 2025”   Saaffrons World announces the Beauty & Talent...