Friday, February 10, 2023

‘वाळवी’च्या सक्सेस पार्टीत ‘वाळवी २’ची घोषणा

 ‘वाळवी’च्या सक्सेस पार्टीत ‘वाळवी २’ची घोषणा 


परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा मराठीतील पहिली थ्रिलकॅाम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आणण्यात यश आले आहे. हेच यश साजरे करण्यासाठी आणि परेश मोकाशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते आणि हेच औचित्य यावेळी ‘वाळवी २’ची घोषणाही करण्यात आली. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांनी लवकरच ‘वाळवी २’ घेऊन येत असल्याचे जाहीर केले. 

दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखक, निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणतात, ‘’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. त्यांच्याकडून चित्रपटाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच आम्हाला ‘वाळवी २’ची प्रेरणा मिळाली. ‘वाळवी’मध्ये ज्याप्रमाणे अनेक गोष्टी अनपेक्षित होत्या, त्यापेक्षाही जास्त सस्पेन्स आणि थ्रील ‘वाळवी २’मध्ये असणार आहेत. सध्या तरी हे सगळं गुपित आहे.’’ 



झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी म्हणतात, या यशात दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील संपूर्ण टीम यांच्यासोबतच मीडियाचाही तितकाच सहभाग आहे. मीडियाने वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत ‘वाळवी’ला पोहोचवले. लवकरच आता ‘वाळवी २’ हा थ्रीलकॅाम घेऊन तुमच्या भेटीला येऊ.’’

या सिनेमात कोण कलाकार असणार इथूनच हा सस्पेन्स सुरू होत असून दिसतं तसं नसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘वाळवी २’मध्येही असेच गुपित दडलेले असून, जे लवकरच उलगडेल.’

'मन कस्तुरी रे' आता अॅमोझॅान प्राईमवर

 'मन कस्तुरी रे' आता अॅमोझॅान प्राईमवर



नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'मन कस्तुरी रे' या चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धतही निराळी असते. मात्र या सगळ्यात संवाद महत्वाचा असतो. जर एकमेकांसोबत संवादच झाला नाही की त्याचे रूपांतर गैरसमजात होते आणि त्यानंतर काय होते हे आपल्याला संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे'  या चित्रपटात पाहायला मिळते. अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. 

चित्रपटामध्ये भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट पाहायला मिळत असून एकमेकांसाठीचा द्वेष, सूड भावनाही आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली, मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या इमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत.

'गोष्ट एका पैठणीची' आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर

 'गोष्ट एका पैठणीची' आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर 

२०२२ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात 'सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटा'चा बहुमान मिळवला. समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली. प्रेक्षकांनीही 'गोष्ट एका पैठणीची'वर भरभरून प्रेम केले. पैठणीचे एक सामान्य स्वप्न पाहणाऱ्या एका असामान्य गृहिणीची ही कहाणी आहे. ही सुंदर कहाणी प्रेक्षकांना ४ फेब्रुवारीपासून प्लॅनेट मराठीच्या ओटीटी पाहता येणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पूर्ण सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नसेल. काही ठराविक पैसे भरून हा चित्रपट पाहता येणार आहे. प्लॅनेट मराठी व्हि.ओ. डी. म्हणजे व्हिडिओ ऑन डिमांड घेऊन आले आहे. व्हि. ओ. डी. असा प्रकार मराठी ओटीटीमध्ये पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे आवडते चित्रपट, वेबसीरिज, नाटक इ. पाहण्यासाठी पूर्ण सब्सक्रिप्शन घेण्याची आवश्यकता नसेल. 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवल्यामुळेच थिएटर बाहेर 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकले होते. 'गोष्ट एका पैठणीची'मधील इंद्रायणी महिला प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटली. घराघरातील ही कहाणी अनेकांना भावली. ज्यांचे इंद्रायणीला भेटायचे राहून गेले त्यांना आता 'गोष्ट एका पैठणीची’ प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.'' 

अभिनेत्री सायली संजीव म्हणते, "चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मला अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या. माझ्या व्यक्तिरेखेत स्वतःला शोधल्याचे अनेकींनी सांगितले. माझ्यासाठी हा क्षण खूप मौल्यवान होता. आता 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही सर्वात सुंदर भेट आहे. ज्यांना हा चित्रपट पाहता आला नाही त्यांना आता ओटीटीवर पाहता येणार आहे."

मंत्रा व्हिजन प्रस्तुत, गोल्डन रेशो फिल्म्स, प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन निर्मित 'गोष्ट एका पैठणीची'चे अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता निर्माते असून अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती-विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे आहे. ययाती सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक- गोडबोले, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज ?

 सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज ? 


लॉकडाऊनमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मागील वर्षी सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. आता नुकतीच सोनाली कुलकर्णीने 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये एक गुडन्यूज दिली आहे. सोनाली कोणालातरी फोन करून 'आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे' असं सांगत आहे. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. आता ही गुडन्यूज काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना येत्या शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागेल. यावेळी सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले. सोनाली कुलकर्णी आणि तिच्यामध्ये लोकांचा कसा गोंधळ व्हायचा, याचाही धमाल किस्सा तिने यावेळी सांगितला. तिच्या आवाजावरून तिला अनेकदा नाकारण्यात आले, हेसुद्धा तिने यावेळी सांगितले. हा एपिसोड प्रेक्षकांना शुक्रवारी प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर' टीझरचे अनावरण

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 'ललिता शिवाजी बाबर' टीझरचे अनावरण


प्रसिद्ध धावपटू, आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच 'ललिता शिवाजी बाबर' यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे पोस्टर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आले होते. आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने  'ललिता शिवाजी बाबर' या चित्रपटाचे टिझरही झळकले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टिझरचे अनावरण करण्यात आले. यावेळी ललिता शिवाजी बाबर, अमृता खानविलकर, प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर, एंडेमॉल शाईन इंडियाचे गौरव गोखले उपस्थित होते. 

भारताच्या राष्ट्रीय विक्रमकारक अशी ओळख असणाऱ्या ललिता शिवाजी बाबर या सोहळ्यात बोलताना भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, '' कठीण प्रसंगांचा सामना करून मी आज इथे पोहोचले आहे. आज माझा इथे सन्मान झाला, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. मी अमृता खानविलकर यांच्यासह सगळ्यांचेच खूप आभार मानते.''

 

तर 'ललिता शिवाजी बाबर' यांची भूमिका साकारण्याचा मान मिळाल्याबद्दल अमृता खानविलकर म्हणते, '' आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'ललिता शिवाजी बाबर' यांची छोटीशी झलक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवायला मिळाली. याचा आनंद आहे. ललिता शिवाजी बाबर यांना समजून घेण्यासाठी, मागील एक दीड वर्षांपासून मी जे काही करत होते, हे सगळं आज मार्गी लागले. ललिताताई बोलताना खूप भावनिक झाल्या. ताईंचे साधेपण, बोलणे मनाला भिडले. माझ्यासाठी हा खास क्षण आहे. आता कुठे प्रवास सुरु झाला आहे. अजून खूप पळायचे आहे.'' 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' ललिता शिवाजी बाबर याच्या आयुष्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाच्या टिझरचे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण झाले आणि या सोहळ्याला ललिता शिवाजी बाबर यांची उपस्थिती लाभली. याहून चांगला योग असूच शकत नाही. रिअलमधील ललिता बाबर यांची मेहनत पडद्यावर दाखवण्यासाठी रीलमधील ललिता बाबरनेही बरीच मेहनत घेतली आहे आणि ती तुम्हाला पुढील वर्षी पाहायला मिळेल.'' 

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि एंडेमॉल शाईन इंडिया प्रस्तुत अक्षय विलास बर्दापूरकर, ऋषी नेगी, गौरव गोखले, रोनिता मित्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. 'ललिता शिवाजी बाबर' चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच' ५ मे रोजी होणार प्रदर्शित

 मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच' ५ मे रोजी होणार प्रदर्शित



सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शित 'बलोच' या चित्रपटाचे नवीन पोस्टर झळकले असून सोबतच 'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. येत्या ५ मे रोजी 'बलोच' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. 

आजवर देशांसाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई आपण पडद्यावर पाहिली. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची.  पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे. 'बलोच'च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार, सहनिर्माते आहेत.

Thursday, February 9, 2023

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी यांची होणार मालिकेत एन्ट्री!

 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते  सचिन गोस्वामी यांची होणार मालिकेत एन्ट्री!

पाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

 

सोनी मराठी वाहिनीवरील 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' ही मालिका आता रंजक वळणावर पोहोचली आहेपारगावच्या पोस्ट ऑफीसमध्ये आता कॉम्प्युटर  आल्याने धम्माल उडाली आहेत्यातच आता मालिकेत झोनल ऑफिसर येणार आहेतमहत्त्वाची बाब म्हणजे झोनल ऑफिसरची भूमिका 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेत.

 

'पोस्ट ऑफीस उघडं आहे...'  ही मालिका पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधली गोष्ट आहेमकरंद अनासपुरे साकारत असलेले गुळस्कर आणि समीर चौघुले यांनी साकारलेले निरगुडकर यांच्यातील या मालिकेतील चढाओढ प्रेक्षकांना आवडते आहेगुळस्कर हे नवीन पोस्ट मास्तर झाल्याने त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र सुरू आहेआणि अशातच आता पोस्ट ऑफीसमध्ये कॉम्प्युटर येऊन दाखल झाले आहेतपोस्ट ऑफीसमधील कर्मचाऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाशीकॉम्प्युटरशी जुळवून घेता येईल काहे पाहणं आता मजेशीर असणार आहेपोस्ट ऑफीसचं कामकाज सुरळीत चालू आहे की नाहीहे बघण्यासाठी झोनल ऑफिसर येणार आहेतमकरंद महाजनी असे या झोनल ऑफिसरचे नाव असून ही व्यक्तिरेखा  'पोस्ट ऑफीस उघडं आहे..' या मालिकेचे निर्माते सचिन गोस्वामी साकारणार आहेतझोनल ऑफिसर पोस्टात आल्यानंतर पोस्ट कर्मचाऱ्यांचा काय गोंधळ उडणार आहेहे पाहणंही उत्कंठावर्धक ठरणार आहे.

 

पाहायला विसरू नकानवी मालिका - 'पोस्ट ऑफीस उघडं आहे...', गुरुवार ते शनिवार रात्री 9 वासोनी मराठी वाहिनीवर.

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...