कल्याणने सादर केले आईसाठी 'मदर्स डे' स्पेशल भेटवस्तू
आईविषयी वाटणारे प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘मदर्स डे’ स्पेशल दागिने
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सर्वात महत्त्वाची स्त्री असते आई आणि आपल्या आईविषयी वाटणारे प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे. म्हणूनच या दिवसासाठीच्या भेटवस्तू खूप विचारपूर्वक निवडल्या जातात, मदर्स डेची भेट म्हणजे फक्त वस्तू नसते तर त्यातून प्रेम व आदर व्यक्त होत असतो, ही भेट आयुष्यभर जपून ठेवली जाते. स्वतःच्या आईसाठी असो किंवा अशा एखाद्या मैत्रिणीसाठी जी नुकतीच आई बनली आहे, आमची इच्छा आहे की तुम्ही अशी भेट निवडावी जी त्यांच्या अनोख्या स्टाईल व व्यक्तिमत्वाला साजेशी असेल, तुमच्या मनात त्यांचे जे अत्त्युच्च स्थान आहे त्याची त्यांना कायम आठवण करून देत राहील. चला तर मग, यंदा मदर्स डेची खरेदी कल्याण ज्वेलर्समध्ये करा आणि अशी भेट निवडा जी अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आली आहे व अनोखी स्टाईल व शान देखील दर्शवते.
मदर्स डेचा आनंद सोनेरी बनवण्यासाठी कल्याण ज्वेलर्सने आकर्षक ऑफर्सची देखील घोषणा केली आहे. सर्व दागिन्यांच्या घडणावळीवर २५% पर्यंतची सूट दिली जात आहे आणि याठिकाणी घडणावळ ५% पासून सुरु होते. त्याशिवाय तुम्ही कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेटचा देखील लाभ घेऊ शकता, जे मार्केटमध्ये सर्वात कमी आहेत आणि सर्व कंपनी शोरूम्समध्ये स्टँडर्डाइज्ड आहेत.
आईसाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या खास दिवसासाठी कल्याण ज्वेलर्समध्ये सादर आहे कमी वजनाच्या दागिन्यांची विशाल श्रेणी, यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्याने आईची अनोखी स्टाईल व व्यक्तिमत्व यांना अनुरूप सर्वात चांगली भेट तुम्ही निवडू शकाल.
१) मिनिमल आईसाठी - कल्याण ज्वेलर्सच्या या इयररिंग्सचे सिल्हट्स मिनिमल आहेत, भौमितिक आकारामध्ये लेयर्ड आहेत, इतकेच नव्हे तर २२ कॅरेट सोन्याच्या या इयररिंग्समध्ये हिरे जडवण्यात आले आहेत. आत्मविश्वास आणि सामर्थ्य हे जिचे बळ आहे अशा आईसाठी मदर्स डेची ही अप्रतिम भेट ठरू शकते.
२) द बॉस लेडीसाठी - पाहताक्षणी मन जिंकून घेईल अशा, रोज गोल्डमध्ये घडवण्यात आलेल्या या बांगडीचे लिंक्ड डिझाईन आई व तिच्या मुलांमधील कधीही वेगळे करता येणार नाही असे प्रेम अतिशय शानदार पद्धतीने दर्शवते. याचे क्लासी व मिनिमल डिझाईन आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.
३) बीएफएफ मॉमसाठी - विश्वास आणि स्थिरता यांचे प्रतीक असलेल्या नेव्ही ब्ल्यू रंगाचे सुंदर पॉप, नाजूक, नक्षीदार डिझाईन अशा आईसाठी परफेक्ट गिफ्ट आहे जी तिच्या मुलांची बेस्ट फ्रेंड आहे. या नेकलेस व इयररिंग्समध्ये निळ्या रंगाच्या कॉन्ट्रास्टमध्ये हिरे जडवण्यात आले असून त्यामुळे याचे सौंदर्य विशेष खुलून आले आहे.
४) ऑल-राउंडर आईसाठी - फुलांचे आकार, गुलाबी रंग कोमलता, स्त्रीत्व आणि प्रेम दर्शवतात, आई व तिचे प्रेम यांचे यापेक्षा चांगले प्रतीक दुसरे असूच शकत नाही. गुलाबी मौल्यवान जेम्सपासून साकारलेली फुले व त्यांच्या मधोमध हिऱ्यांचे क्लस्टर यामुळे या दागिन्यांना अप्रतिम शान व सौंदर्य प्राप्त झाले आहे. मदर्स डेसाठी ही सर्वोत्तम भेट आहे.