Tuesday, June 8, 2021

 शेरनी चित्रपटाचा टिजर आऊट - विद्या बालन च्या वन अधिकारी  लुकवर चाहते फिदा


गेल्या आठवड्यातच चित्रपट निर्मात्यांनी शेरनी चा पोस्टर आऊट केला होता त्यानंतर ह्या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती . जवळजवळ एक वर्षानंतर विद्याला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असताना निर्मात्यांनी आज टिजर रिलीज करून २ जून ला ट्रेलर रिलीज ची घोषणा केली .

वर्षानुवर्षे विविध यशस्वी उपक्रमांवर सहकार्य केल्यावर टी-सीरिज आणि अबंडनशिया  एंटरटेनमेंट आणखी एक अपारंपरिक कथेसाठी एकत्र आले आहेत.



न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित  या चित्रपटाचा प्रीमियर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. ,शेरनी ही एक काल्पनिक कथा आहे जी आपल्याला मानव-पशु संघर्षाच्या जगात संतुलनासाठी प्रयत्न करणाऱ्या वन- अधिकाऱ्याच्या प्रवासात घेऊन जाते.

भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मलहोत्रा  आणि अमित मसुरकर  निर्मित या चित्रपटामध्ये शरत सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज कबी यांचा समावेश आहे.  शेरनी विशेषपणे अमॅझॉन प्राइम  व्हिडिओ वर जून 2021 ला  प्रदर्शित  होईल.

सगळीकडे चर्चा ऐश्वर्याच्या 'लक्ष्मी मंगळसूत्राची'

 

 

तू सौभाग्यवती हो या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहेऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेहा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहेजाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहेआणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र




ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहेम्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे

तू सौभाग्यवती हो मालिकेत हा खास विवाह सप्ताह पाहा  जूनपासूनसोम.-शनि., संध्या वासोनी मराठीवर.


Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...