Tuesday, June 8, 2021

 शेरनी चित्रपटाचा टिजर आऊट - विद्या बालन च्या वन अधिकारी  लुकवर चाहते फिदा


गेल्या आठवड्यातच चित्रपट निर्मात्यांनी शेरनी चा पोस्टर आऊट केला होता त्यानंतर ह्या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती . जवळजवळ एक वर्षानंतर विद्याला चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक असताना निर्मात्यांनी आज टिजर रिलीज करून २ जून ला ट्रेलर रिलीज ची घोषणा केली .

वर्षानुवर्षे विविध यशस्वी उपक्रमांवर सहकार्य केल्यावर टी-सीरिज आणि अबंडनशिया  एंटरटेनमेंट आणखी एक अपारंपरिक कथेसाठी एकत्र आले आहेत.



न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित  या चित्रपटाचा प्रीमियर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. ,शेरनी ही एक काल्पनिक कथा आहे जी आपल्याला मानव-पशु संघर्षाच्या जगात संतुलनासाठी प्रयत्न करणाऱ्या वन- अधिकाऱ्याच्या प्रवासात घेऊन जाते.

भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मलहोत्रा  आणि अमित मसुरकर  निर्मित या चित्रपटामध्ये शरत सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंद्र कला आणि नीरज कबी यांचा समावेश आहे.  शेरनी विशेषपणे अमॅझॉन प्राइम  व्हिडिओ वर जून 2021 ला  प्रदर्शित  होईल.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...