Wednesday, July 3, 2024

एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

 एआयच्या माध्यमातून खुलणार अनोखी प्रेमकहाणी

 

सोनी मराठी वाहिनीवरील 'तू भेटशी नव्याने’ मालिकेची उत्सुकता

 

मालिका  'तू भेटशी नव्याने’ येत्या  जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर सोम ते शुक्र रात्री .००वाआपल्या भेटीला येणार आहे.


 

सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेतप्रेक्षकांनीही या मालिकांवर  भरभरून  प्रेम केलं आहेमात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ‘तू भेटशी नव्याने या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेलयाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहेमालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहेही मालिका येत्या  जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री .००वाआपल्या भेटीला येणार आहे.



यावेळी  बोलताना सोनी मराठी वाहिनीचे  बिझनेस हेड अजय भाळवणकार म्हणाले कीसोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी नेहमीच  नाविन्यपूर्ण  प्रयोग केले आहेतअसाच एआयचा एक वेगळा प्रयोग ‘तू भेटशी नव्याने मालिकेच्या निमित्ताने करत असून  केवळ तंत्रज्ञान वापरायचं म्हणून हा प्रयोग  केलेला नाही तर क्रिएटिव्ह टीमची मेहनत यामध्ये दिसणार आहे.  तंत्रज्ञानाप्रमाणे मालिकेची कथा ही तितकीच दमदार असायला हवी हे आम्ही कटाक्षाने पाळलं आहेवेगळी कथा आणि उत्तम तंत्रज्ञान याचा मिलाफ असलेली ही मालिका  प्रेक्षकांचं  नक्की मनोरंजन करेल असा विश्वास सोनी मराठी वाहिनीच्या फिक्शन हेड सोहा कुळकर्णी यांनी व्यक्त  केलापहिल्यांदा एआयवर आधारित मालिकेत काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी  निश्चितच आनंददायी असल्याचे  सुबोध भावे यांनी सांगितलेसुबोध भावे यांच्यासोबाबत काम करण्याचा आनंद आणि दडपण दोन्ही असल्याचे शिवानी सोनार हिने सांगितले.


 

पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाहीत्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतातयाच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहेप्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलींत दिसणार आहे.मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेतसहनिर्माते  संदीप जाधव आहेत.



या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहेसुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एकचित्रपट  मालिका यांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं पाहायला मिळालं आहेएखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायचीहे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहेत्याची प्रत्येक मालिका खास आहेअभिनेत्री शिवानी सोनार ही मालिकेतला चर्चेतला चेहरा आहे.


वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला हा चेहरा आता 'तू भेटशी नव्याने या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहे ‘तू भेटशी नव्याने ह्या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या प्रयोगासाठी ही जोडी सज्ज झाली आहे.

 

'तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहेमात्रया दोन्ही व्यक्तीरेखांच्या वयामध्ये जवळपास २०-२५ वर्षांचे अंतर असणार आहेया मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहेयात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि  तरुण माहीच्या भूमिकेतही तोच दिसणार आहेशिवानी सोनार गौरी या भूमिकेत दिसणार आहे

   'तू भेटशी नव्यानेमालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळांतल्या भूमिका आणि नव्वदीच्या काळातील आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला  मिळणार आहेत.एआयचा वापर करून ह्या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत.  या नव्या प्रयोगाचा एक भाग म्हणून आणि मालिकेच्या जाहिरातीकरता एक भन्नाट कल्पनाही लढवली होती मे १९९१ रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोज केले होतेअभिनेत्याच्या आयुष्यातल्या या गोड क्षणानिमित्त त्याने  मे २०२४ रोजी एक व्हिडिओ शेअर केलात्याने त्या क्षणी नेमकं काय घडलं होतंहे अत्यंत आगळ्यावेगळ्या शैलीत सांगितलंया व्हिडिओमध्ये ३३ वर्षांपूर्वीचा सुबोध दिसलामात्र त्यासाठी कोणताही जुना फोटो किंवा व्हिडिओ वापरला नव्हतातर एआयचा वापर करून सुबोधने ही किमया साधलीतर मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानीने सुबोध भावे याला त्याच्या मालिकात्रपटांची आठवण करून देणारी एक खास फ्रेम भेट म्हणून दिली.

 

नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाचीकारणजगायला श्वासाची नाही तरप्रेमाची गरज असते!”‘तू भेटशी नव्याने या शीर्षकाप्रमाणेच  नव्या रूपात  नव्या वळणार होणारी ही भेट नेमकी  कशी असेलया प्रेमकथेचे रंग कसे बहरणारहे  सर्व अनुभवण्यासाठी येत्या  जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री .०० वाप्रसारित होणारीतू भेटशी नव्यानेही मालिका नक्की पाहा.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...