Tuesday, January 6, 2026

अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!

 ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!


महिला पत्रकारांच्या हस्ते केले ट्रेलरचे अनावरण!

झीस्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित बहुप्रतिक्षित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा  रंगली आहे. चित्रपटाच्या टीझर व शीर्षक गीताने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता प्रेक्षकांच्या याच उत्सुकतेत भर घालत या चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा नुकताच एका अनोख्या पद्धतीने पार पडला. हा चित्रपट स्त्री सशक्तीकरणावर भाष्य करणारा असल्याने या सोहळ्याला उपस्थित सर्व महिला पत्रकार, चित्रपटाच्या तंत्रज्ञ टीममधील महिला यांच्याद्वारे चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. हा क्षण या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. तसेच यादिवशी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवस असल्याने संपूर्ण टीमने केक कापून तिचा वाढदिवसही साजरा केला. 

सासू सुनेचं नातं हे अनेक कुटुंबात तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना या प्रकारचं असतं.. तर काहींसाठी ‘ असून अडचण, नसून खोळंबा’ अशा स्वरूपाचं असतं.  थोडक्यात, घरोघरी मातीच्या चुली अशी परिस्थिती असते. पण, याहीपलिकडे जाऊन त्यांच्यात एक असाही भावनिक बंध असतो जो या नात्याची वीण कधीच सैल होऊ देत नाही. अशाच काहीशा भावना मांडणारा आणि या नात्याचे नवे पैलू उलगडणारा चित्रपट म्हणजे अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई ? या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. 

ट्रेलरमध्ये सासू -सूनेच्या नात्याचे केवळ आदर्श रूप नाही, तर त्यातील चांगले-वाईट पैलू, संघर्ष आणि भावनिक क्षणही प्रामाणिकपणे मांडण्यात आले असून, हसवत हसवत विचार करायला लावणारी ही कथा आहे. ही केवळ एक सासू-सूनेची गोष्ट नसून स्त्रियांची गोष्ट आहे. स्त्रियांनी एकमेकींना समजून, एकमेकींची साथ दिल्यावर त्या अधिक सक्षम व मजबूत होतील असा प्रभावी विचार या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 

दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, “ ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा एक मनोरंजक व कौटुंबिक चित्रपट आहे. चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे, त्यामुळे हा चित्रपट घरातील प्रत्येकासाठी आहे. यात विनोद आहे, भावना आहेत आणि प्रत्येक घरात दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्याची ओळखीची परिस्थिती आहे. प्रेक्षकांना या नात्यातील गंमतीदार प्रसंग, भावनिक वळणे आणि दोन्ही व्यक्तिरेखांची ताकद अनुभवता येईल.”

या प्रसंगी बोलतांना झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “ 

केदार शिंदे यांनी या चित्रपटाची गोष्ट जेव्हा पहिल्यांदा ऐकवली तेव्हाच आम्ही ठरवलं की हा चित्रपट आपण करुयात. ही गोष्ट केवळ सासू- सून या नात्यांची नाही तर संपूर्ण कुटुंबाची आणि सोबतीनेच स्त्रीयांबद्दलचा एक नवा दृष्टीकोन देणारी आहे. जी सर्वांनाच आवडेल. 

झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. येत्या १६ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026

  India Sets the Global Jewellery Calendar with Grand Opening of IIJS Bharat – Signature 2026 IIJS Bharat – Signature 2026 to expected to ge...