Saturday, July 4, 2026

सांताक्रूझ च्या स्वामींच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिमाखात पार पडले पाट पूजन.

सांताक्रूझ च्या स्वामींच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या मंडळाने सर केले शिवरायांचे 50 किल्ले याच 50 किल्ल्यांच्या मातीतून साकारणार या वर्षीचा सांताक्रूझ चा स्वामी 

एकीकडे मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना सांताक्रूझ मधील प्रसिद्ध अश्या सांताक्रूझ च्या स्वामीचा पाट पूजन उत्सव अतिशय थाटामाटात पार पडला. 

संकष्टी च्या मुहूर्तवर होत असलेल्या या कार्यक्रमाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी विवेकानंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 

1977 साली सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला भागात 32 चाळी आणि कमीट्या एकत्र येऊन सुरु केलेला हा गणेशोत्सव आज ही तितक्याच परंपरिक उत्साहात साजरा केला जातो विशेष म्हणजे आज ही या संपूर्ण भागात एकच गणपती मंडळ असून दिवसेंदिवस सांताक्रूझ च्या स्वामींची प्रसिद्धी वाढतच जात आहे.

50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांचे 50 किल्ले सर करून तेथील पवित्र माती आणली असून या वर्षी मूर्तीच्या मातीत ही पवित्र माती सुद्धा मिश्रित केली जाणार आहे. 

आज पार पडलेल्या पाट पुजानाचे वैशिष्ट्य म्हणजे साई श्रद्धा नाशिक ढोल ताशा पथक, सांताक्रूझ आर्टिस्ट बेंजो आणि गिरगांवचा लाडका वादक मिलिंद. 

या सुवर्ण महोत्सवी वर्षात वाजवत असताना वादक मिलिंद त्यांना मिळालेल्या सन्मानाने भावुक झाले. 

शेवटी सर्व गणेश भक्ताने आणि कार्यकर्त्यांनी नाचत गाजत हा सुवर्ण पाट पूजन सोहळा पार पाडला.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

82% of Indians Have Damaged Their Smartphone. Only 1 in 15 Protects It.

  82% of Indians Have Damaged Their Smartphone. Only 1 in 15 Protects It. OneAssist–Hansa Research Study – The Great Indian Smartphone Prote...