Wednesday, August 26, 2026

*‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात*

 *‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात*

‘शास्त्र असतं ते...’ हे वाक्य ऐकलं की आपल्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आठवते ती अनी आणि जुईची आई. आपल्या घरातलीच एक आई वाटावी, अशी सहजसुंदर भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांनी आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. ‘दोघी’, ‘बाधा’, ‘वळू’, ‘मन फकिरा’, ‘अनन्या’, ‘जग्गू आणि ज्युलिएट’ यांसारख्या चित्रपटांसह विविध नाटकं आणि चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता रेणुका दफ्तरदार ‘द्विधा’ या आगामी चित्रपटातून एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन आणि संकलन निलेश भास्कर नाईक यांचे असून, निर्मिती विदुला रमेश आजगावकर यांनी केली आहे. ४ सप्टेंबरला ‘द्विधा’ महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार ‘बेबी आत्या’ची व्यक्तिरेखा साकारत आहेत. प्रेमळ, समजूतदार आणि मायेने भरलेली ‘बेबी आत्या’ कुटुंबाचा भावनिक आधारस्तंभ आहे. पतीच्या निधनानंतर एकटं आयुष्य जगणाऱ्या ‘बेबी आत्या’ साठी तिचा भाऊ हाच सर्वात मोठा आधार आहे. भावासोबत खंबीरपणे उभं राहत ती घराची आणि कुटुंबाची मनापासून काळजी घेते. स्वतःच्या दुःखांना मनात दडवूनही ती कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी कायम खंबीरपणे उभी राहते. चित्रपटात त्यांच्यासोबत सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रेणुका दफ्तरदार सांगतात, ‘आजवर साकारलेल्या विविध भूमिकांपेक्षा ‘द्विधा’मधील ‘बेबी आत्या’ ही व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मायेच्या ऊबेसोबतच आयुष्याने दिलेल्या दुःखांना सामोरं जाणारी, शांतपणे कुटुंबाचा भार पेलणारी आणि नात्यांना जपणारी ही आत्या ‘द्विधा’च्या कथानकातील महत्त्वाची भावनिक कडी ठरणार आहे’.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Paras Healthcare Limited’s Initial Public Offer to open on Wednesday, October 21, 2026

Paras Healthcare Limited’s Initial Public Offer to open on Wednesday, October 21, 2026 Price Band has been fixed at ₹ 660 to ₹ 693 per Equit...