माधुरीच्या मराठी पदार्पणाने
सुखावला महाराष्ट्र - बॉक्स ऑफिस वर बकेट लिस्ट झाला हिट !
एखादा चित्रपट निर्माण
करताना निर्माता-दिग्दर्शकांची इच्छा असते, ती म्हणजे आपल्या सिनेमाशी प्रेक्षकांनी साधर्म्य साधावं, प्रेक्षकांचं मनोरंजन करावं आणि आपली कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी.
हेच सुख सध्या बकेट लिस्ट चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सादरकर्ते अनुभवत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला माधुरी
दिक्षितच्या पदार्पणातला चित्रपट बकेट लिस्ट भारत आणि भारताबाहेरील प्रेक्षकांच्या
पसंतीस उतरला असून आजही हा सिनेमा प्रेक्षागृहांमध्ये प्रेक्षक पाहू शकत आहेत.
आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या व्यक्ती मधुरा च्या रुपात आपल्यासमोर आल्याचं
प्रेक्षकांचं म्हणणं आहे. मधुराच्या आयुष्य जगण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून
माधुरीचे कित्येक चाहते प्रेरित झाले आहेत.
प्रेक्षकांना आपलासा
वाटणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला
व समीक्षकांची दाद मिळवण्यात ही तो यशस्वी
झाला. डार्क हॉर्स सिनेमा, दार मोशन पिक्चर्स, ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित आणि ए. ए. फिल्म्स आणि करण जोहर प्रस्तुत, बकेट लिस्ट सिनेमाचं दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केलं आहे.
बकेट लिस्टच्या निमित्ताने माधुरी बरोबरच धर्मा प्रोडक्शन चा मराठी
सिनेविश्वातील प्रवेश वाखाणण्याजोगा असून यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टी अजून एका
सुंदर कलाकृती ने संपन्न झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.