हिमानी शिवपुरी साकारत असलेली आई तुम्हाला बधाई हो मधल्या दादीची आठवण करूनदेणार / हिमानी शिवपुरी साकारणार हप्पूच्या आईची म्हणजे `कटोरी अम्मा’ची नवी भूमिका.
सिनेमा आणि टीव्हीवरील कार्यक्रमांतून उत्तम कामगिरी करणाऱ्या अनुभवी अभिनेत्री हिमानी शिवपुरी आता अँड टीव्ही च्या 'हप्पू की उलटन पलटन' या नव्यामालिकेत विनोदी भूमिका साकारणार आहेत. हिमानी यांनी चंदेरी पडद्यावर आणि टीव्हीवर अनेकानेक भूमिका साकारून, प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत.हिमानी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या पदवीधर आहेत. त्या हप्पूच्या आईची म्हणजे `कटोरी अम्मा’ची नवी भूमिका साकारणार आहेत. सुरेखा सिकरी यांनी`बधाई हो’ सिनेमात दादीचं कमालीचं पात्रं उभं केलं होतं. या पात्रावरून प्रेरित असलेली नवी भूमिका हिमानी साकारतील. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे.योगेश त्रिपाठी यांनी भाभीजी घर पर है या मालिकेतला भ्रष्ट ढेरपोट्या पोलीस अधिकारी दरोगा हप्पू सिंग साकारला आहे. लोकांनीही या भूमिकेला मनापासूनपसंती दिली आहे. हप्पू सिंग या भूमिकेला इतका भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर अँड टीव्हीने हप्पूची भूमिका मध्यवर्ती घेऊन, हप्पूच्या आयुष्यातील इतरबाजू नव्या 'हप्पू की उलटन पलटन' मालिकेतून दाखवायचं ठरवलं आहे. मॉडर्न कॉलनीमध्ये वाघोबा बनून फिरत असलेला हप्पू घरात भिजकं मांजर होतो का?घरात सतत टोमणे मारणारी बायको आणि हट्टी आई आणि नऊ मुलं यांच्यात हप्पूची काय वाट लागते ते या मालिकेत पाहायला मिळणार आहे. पण हा कार्यक्रमपाहताना प्रेक्षकांची हसून हसून मुरकुंडी वळेल हे ऩिश्चित.
आपल्या भूमिकेविषयी हिमानी बोलत आहेत, ``या मालिकेचा भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे, ही भूमिका प्रेक्षकांसाठी यापूर्वीच हास्य आणिकरमणूक घेऊन आलेली आहे. भारतीयांना विनोद आवडतोच आणि आपल्या ताणतणावाच्या आयुष्यात तोच एक आधार असतो आपला. या मालिकेला प्रेक्षकांचाआणखी भरभरून प्रतिसाद लाभेल आणि माझ्या कटोरी अम्मा या हट्टी आईच्या भूमिकेलाही प्रेक्षक स्वीकारतील अशी मला आशा वाटते. ही भूमिका हट्टी बाईचीअसली तरी तिला तिच्यात तिच्या काळचा एक चार्म आहे. तिचे तिच्या सुनेबरोबर असलेले नाते, तिचं वाढतं वय सासू-सुनेच्या नात्यातली गंमत जमंतआपल्यासमोर मांडते आहे. माझी भूमिका बधाई हो मधल्या दादीशी मिळतीजुळती आहे आणि हप्पूच्या आयुष्यात ती कशी पंचाईत करते याची झलकआपल्याला पाहायला मिळणार आहे.’’
त्या पुढे म्हणाल्या की, ``मी खूप काळापासून संजय आणि बेनाफेर कोहलीला ओळखते, त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणजे मला घरी परतल्यासारखं वाटतंआहे. सगळ्याच टीमबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.’’
हिमानी शिवपुरी प्रेक्षकांना खळखळून हसवायला अगदी सज्ज झाल्या आहेत! तुम्ही झाला आहात ना तयार?
अँड टीव्ही वर हप्पू सिंगची नवी मालिका लवकरच पहा!