Saturday, February 9, 2019


सोनू निगम आणि शनमुख प्रियाच्या अकापेला गाण्यातून दिसणार ‘अशी ही आशिकीचा मॅडनेस

तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या रोमँटिक गाण्यानंतर आशिकीचा मॅडनेस अनुभवण्यासाठी ‘अशी ही आशिकी’ घेऊन आलंय एक हटके अकापेला गाणं ‘समझेक्या?’ दिलखुलास आशिकी करणा-या स्वयम आणि अमरजच्या रिलेशनशिपवर एका पेक्षा एक गाणी तयार करण्यात आली आहेतसुरुवातीला हेमलच्या ऐवजीरकम्मा’ गाण्यातून रकम्माला शोधणारा स्वयमत्यानंतर मेड फॉर इच अदर अशी जोडी असलेल्या स्वयम आणि अमरजाचं रोमँटिक गाण्यातला क्युट रोमान्सआणि आता आशिकीची नशा वाढवणारं अकापेला गाणं.

अकापेला हा गाण्याचा प्रकार आहे ज्यामध्ये कोणत्याही संगीत उपकरणांचा वापर केला जात नाहीम्हणजेच कोणत्याही इंस्ट्रुमेंट्सचा उपयोग  करता तोंडाच्यामाध्यमातून गायलेलं गाणं म्हणजे अकापेला गाणंगाण्याच्या शब्दांसह गाण्याला लागणारे म्युझिक हे तोंडानेच दिले जातेअसे या सिनेमातील ‘समझे क्या?’ हेअकापेला डुएट गाणं सोनू निगम आणि शनमुखप्रिया यांनी गायले आहेअकापेला गाण्याला सोनू-शनमुख यांचा आवाज आणि स्वयम आणि अमरजाची आशिकीया भन्नाट कॉम्बिनेशनची नशा आता प्रेक्षकांच्या मनावर होणार कारण हे हटके गाणं आता सोशल मिडीयावर रिलीझ करण्यात आलं आहे.

पाय नाही नशेला यामग ती डोक्यावर चढते काझोपेला पंख नाही नामग तरी झोप उडते कातू सांग ना...” असे या गाण्याचे बोल आहेत जे आपसूक आपलंलक्ष वेधून घेतातसचिन पिळगांवकर यांनी हे गाणं कंपोझ केलं आहे तर अभिषेक खानकर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेतवोक्ट्रोनिका (Voctronica) याअकापेला बँड यांनी हे गाणं अरेंज केलं आहेअर्जुन नायर (Arjun Nair), अविनाश तिवारी (Avinash Tewari), वर्षा इसवर (Warsha Easwar) आणि क्लाईडरॉड्रिग्स (Clyde Rodrigues) हे या बँडचे मेंबर्स आहेत.

गुलशन कुमार प्रस्तुतटी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार निर्मित आणि सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ सिनेमात अभिनय बेर्डेआणि हेमल इंगळे ही नवीन जोडी आशिकी करताना दिसणार आहेतसेच या सिनेमाची निर्मिती मुव्हिंग पिक्चर्स आणि सुश्रिया चित्र यांनी देखील केली असूनवजीर सिंहजो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे ही या सिनेमाचे निर्माते आहेत.

अशी ही आशिकीची जादू प्रेक्षकांना  मार्चला अनुभवयाला मिळणार आहे.




No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch

Zam Zam Perfumers brings 35 years of non-alcoholic fragrance heritage to Mumbai with first store launch Mumbai, June 20, 2026: Zam Zam Perfu...