'हप्पू की उलटन पलटन' सज्ज आहे तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर धमाल गाजवायला!
~ घर के नवरसों में पिसा... हप्पू का किस्सा~
~ सुरू होत आहे ४ मार्च २०१९ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त वर~
~ या मालिकेच्या कलाकारांनी &TV वर प्रेम करणारे, प्रेक्षक आणि चाहत्यांना झी फॅमिली पॅक सबस्क्राइब करण्याचे केले आवाहन, त्यामुळे ३१ मार्च २०१९ पासून लागू होणाऱ्या नव्या सरकारी नियमाप्रमाणे त्यांना हा शो पाहता येईल ~
मुंबई, २५ फेब्रुवारी २०१९: चापूनचोपून तेल लावलेले, नीट विंचरलेले केस जरासे कपाळावर रुळतात, पानाच्या लालीने रंगलेलं त्याचं हसू त्याच्या आगळ्यावेगळ्या मिशीकडे लक्ष वेधून घेतं... विनोदी, ढेरपोट्या, भ्रष्ट दरोगा हप्पू सिंग याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना इतकं हसवलं आहे की, हे काम इतर कोणी करूच शकणार नाही. पण, मॉडर्न कॉलनीतला हा वाघ घरात मात्र भिजकं मांजर आहे की काय? या प्रश्नाचे उत्तर घेऊन आणि विनोदात एक नवे पर्व सुरू करत, &TV घेऊन येत आहेहप्पू की उलटन पलटन... सुरू होत आहे ४ मार्च २०१९ पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता.
'न्योछावर कर दो' ही गंमत काहीशी बाजूला सारत हप्पू की उलटन पलटन हप्पूच्या आयुष्याची एक वेगळी बाजू, ड्युटी पलिकडील त्याचे कौटुंबिक आयुष्य दाखवेल. आता प्रेक्षकांना त्याचे विनोदी साहस आणि 'घरेलू' गमतीशीर किस्से पाहता येतील. दरोगा हप्पू सिंग, त्याची 'दबंग दुल्हन' राजेश, हट्टी आई कटोरी अम्मा आणि नऊ मस्तीखोर मुलं असे धमाल किस्से यात असतील. आई, पत्नी आणि दंगेखोर पलटन म्हणजेच त्याची मुलं यांच्यातील चढाओढीत दरोगा फसला आहे. एडिट II प्रोडक्शन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेत योगेश त्रिपाठी, ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी, प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकार शरद व्यास, रंगमंचावरील अभिनेत्री कामना पाठक असे दमदार कलाकार आहेत.
या मालिकेबद्दल &TVचे प्रमुख श्री. विष्णू शंकर म्हणाले, "हप्पू की उलटन पलटन' या मालिकेच्या माध्यमातून देशभरात अत्यंत लोकप्रिय असलेल्या एका व्यक्तिरेखेभोवती फिरणारी नवी कौटुंबिक मालिका देत आठवड्याभराच्या मनोरंजनाला अधिक बळकटी देताना आम्हाला आनंद होतो आहे. 'भाभीजी घर पर है' या मालिकेत हप्पू सिंग या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता लोकांना त्याच्या आयुष्याबद्दल, त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल जाणून घ्यायचं आहे. यातून एक अनोखी कथा सांगण्याची संधी आहे, असं आम्हाला वाटतं. या दरोगावर तुम्ही प्रेम केलं आहेच. आता एक नवरा, मुलगा आणि पिता म्हणून त्यांचा अनोखा अंदाजही पहा. या मालिकेतील विनोदी प्रसंग आणि व्यक्तिरेखा एका सामान्य माणसाचं दैनंदिन आयुष्य आणि त्याला रोज भेडसावणाऱ्या समस्या याची झलक दाखवतील. हप्पू आणि त्याच्या पलटनसोबत या हास्यसफरीवर प्रेक्षकांचे धमाल मनोरंजन नक्कीच होईल."
या मालिकेच्या संकल्पनेबद्दल एडिट II प्रोडक्शन्सचे संजय कोहली म्हणाले, "भाभीजी घर पर है या अत्यंत प्रसिद्ध मालिकेत हप्पू सिंगची व्यक्तिरेखा आल्यापासून प्रेक्षकांमध्ये ती लोकप्रिय झाली. हप्पूच्या चाहत्यांच्या या प्रचंड संख्येनेच आम्हाला त्याच्या कौटुंबिक आयुष्याभोवती फिरणारी मालिका सुरू करण्यास प्रवृत्त केले. ही मालिका नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. बिनधास्त पत्नी, कटकटी आई आणि नऊ दंगेखोर मुलांच्या घरात, या सगळ्या गडबडगोंधळात अडकलेल्या बिचाऱ्या हप्पूसोबत घडणाऱ्या धमाल विनोदी प्रसंगांना 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये दाखवले जाईल. प्रेक्षकांना ही मालिका आवडेल आणि ते धमाल हसतील, असे आम्हला वाटते."
या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेविषयी हप्पू सिंग साकारणारे योगेश त्रिपाठी म्हणाले, "हप्पू की उलटन पलटन म्हणजे एक प्रकारे माझी स्वप्नपूर्तीच आहे. मी हप्पू सिंग साकारण्यास सुरुवात केली तेव्हा कल्पनाही केली नव्हती की प्रेक्षकांच्या मनात माझ्यासाठी खास स्थान निर्माण होईल. एक संपूर्ण मालिका हप्पू सिंग या व्यक्तिरेखेवर आधारित असावी, हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. अशी अप्रतिम संधी मिळाल्याबद्दल आभार मानण्यास शब्दही अपुरे पडतील. मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचा आभारी आहे आणि हप्पू सिंग की पलटनवर ही ते असेच भरभरून प्रेम करतील, अशी आशा आहे. हप्पू आणि त्याच्या कुटुंबातील अनोख्या गोष्टींनी प्रेक्षकांना आम्ही हसवू शकू, अशी आशा आहे."
"नव्या ट्राय नियमांनुसार प्रेक्षकांनी झी बुके सबस्क्राइब करून 'हप्पू की उलटन पलटन' ही मालिका पहावी, असे आवाहन मी माझ्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना करतो. खरे तर, झी हे कौटुंबिक मनोरंजनातील अव्वल नेटवर्क आहे. कारण, इथे कटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचे काही-ना-काही आहे. &TVवर आमच्या या नव्या मालिकेची मजा घेण्यासाठी कृपया आजच झी एचएसएम बुके निवडा आणि झी फॅमिली पॅक-हिंदी एसडी/एचडी विकत घ्या."
या मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी हिमानी शिवपुरी म्हणाल्या, "हप्पू की उलटन पलटन'मध्ये मी हप्पूची आई म्हणजेच कटोरी अम्माची भूमिका साकारतेय. मला या भूमिकेविषयी विचारण्यात आलं तेव्हाच मला माहीत होतं की व्यक्तिरेखा बाजी मारणार. त्यामुळे, होकार देताना मी फारसा विचार केला नाही. प्रेक्षकांना आनंद देणे,त्यांना हसायला लावणे, हा फार मोठा सन्मान असतो. शिवाय, अशा छान टीमसोबत काम करताना आनंदात भरच पडते. कटोरी अम्मा ही कुटुंबप्रमुख आहे. ती काहीशी हटवादीही आहे. आपल्या नऊ नातवंडांसाठी ती प्रेमळ आजी आहे. मात्र, सुनेसोबत तिचे सतत खटके उडत असतात. आनंददायी कथानक, विनोदी पटकथा आणि कटोरी अम्मा व इतर व्यक्तीरेखांमधील गमतीशीर नातं यामुळे प्रेक्षकांना धमाला मनोरंजन मिळणार आहे, हे नक्की. विनोद आणि नाट्याने भरलेल्या या आनंदसफरीचा भाग होण्यासाठी झी फॅमिली पॅक घेण्याचे आवाहन मी &TVच्या चाहत्यांना करत आहे."
विनोदाच्या जगात पाऊल ठेवतानाच्या अनुभवाबद्दल हप्पूच्या पत्नीची भूमिका साकरणाऱ्या कामना पाठक म्हणाल्या, "मला फार काळापासून विनोदी भूमिका साकारायची होती. हा प्रवास सुरू करण्यासाठी हप्पू की पलटनपेक्षा चांगली मालिका दुसरी असू शकत नाही. नावाप्रमाणे आगळीवेगळी असलेली राजेश म्हणजे हप्पू सिंगची दबंग बायको आहे. ती तशी मृदू स्वभावाची वाटत असली तरी ती कुठेही भांडू शकणारी एक धाडसी स्त्री आहे. मला वाटतं राजेशला स्वत:चं असं एक व्यक्तीमत्त्व आहे. यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहेच. शिवाय, प्रत्येक हाऊस वाइफ स्वत:ला तिच्याशी जोडून पाहू शकेल. आमची टीमही फार छान आहे. आशा आहे की,प्रेक्षकांना आमचं काम आवडेल.''
हप्पू सिंग आणि त्याच्या उलटन पलटन सोबत विनोद आणि प्रेमाचा सुयोग्य डोस मिळवण्यासाठी पाहत रहा ही मालिका ४ मार्चपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त &TVवर."
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST