Wednesday, February 13, 2019


 मै भी अर्धांगिनी'

"मै भी अर्धांगिनीमालिकेत माधव ठाकूर साकारणारे अविनाश सचदेव
''तुमच्या आवडत्या माणसासाठी केवळ एकच दिवस राखून ठेवलेला असणे ही कल्पनाच मला पटत नाही, कारण तुम्ही जर खरंच कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर ते प्रेम दर्शवण्‍यासाठी हा एकच दिवस म्हणजे खूप कमी आहे. हेच कारण आहे, की मी कधीही व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही आणि यावर्षीही साजरा करण्याचा माझा विचार नाही. मी सध्या माझ्या “मै भी अर्धांगिनी” मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सध्या माझे लक्ष त्यातच आहे, मला प्रेमाच्या या मार्गावर हळूहळू चालायला आवडेल.

'डायन' मालिकेत जान्हवी मौर्या साकारणारी टीना दत्ता
''माझ्यासाठी प्रेमाची भावना शाश्वत आणि बिनशर्त आहे, त्यासाठी केवळ एक दिवस समर्पित असणे हे योग्य नाही. सध्या मी सिंगल आहे आणि माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर आहे. त्यामुळे यावर्षी माझे काम हेच माझे व्हॅलेंटाईन आहे (हसते). मी असे म्हणतेय कारण माझा विश्वास आहे की, प्रेम म्हणजे केवळकाहीतरी रोमँटिक असते असे नाही. ते त्‍यापेक्षाही अधिक काहीतरी आहे. या व्हॅलेंटाईन डे ला मी कदाचित 'डायन' मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असेन आणि त्यानंतर माझ्या जिवलग मित्रमंडळींसोबत डिनर व धमाल करेन.''

'मै भी अर्धांगिनी' मालिकेत निलांबरी साकारणारी दीपशिखा नागपाल
''मला व्हॅलेंटाईन डेबद्दल इतकी आस्था कधीच नव्हती, त्यामुळे मी माझ्या कुटुंबासोबत लहानशी सहल किंवा जेवणाचा कार्यक्रम ठरवते. सध्या मला 'मै भी अर्धांगिनी' मालिकेसाठी बराच काळ जयपूरमध्ये राहावे लागत असल्याने मी मुलांपासून लांब असते आणि रोजच्या त्यांच्या लहानमोठ्या गमतीजमतीपासून मला वंचित राहावे लागते. यावर्षी मात्र या दिवशी अतिशय विलक्षणरित्यामाझ्या मुलांनी मला मुंबईच्या आमच्या आवडत्या ठिकाणी दुपारच्या जेवणासाठी घेऊन जायचे ठरवले आहे. त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माझा दिवस उजळवून टाकतो. व्हॅलेंटाईन डेला त्यांच्याबरोबर आनंदात वेळ घालवण्याच्‍याप्रतिक्षेत मी आहे.''    







No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...