Wednesday, February 13, 2019

‘झी टीव्ही’वरील कलाकारांकडून प्रेक्षकांना ‘व्हॅलेंटाईनदिना’च्या शुभेच्छा!

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’मध्ये अक्षत जिंदालची भूमिका साकारणारा निशांतसिंह मलकाणी म्हणतो, “व्हॅलेंटाईनदिन हा माझ्यादृष्टीने प्रेम आणि मैत्रीचा दिवस आहे. हा दिवस तुम्ही कोणाहीबरोबर साजरा करू शकता- तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा तुमची खास व्यक्ती. यंदाच्या वर्षीच व्हॅलेंटाईनदिन मी माझ्या मित्रांबरोबर साजरा करमार आहे. हे माझे मित्र माझ्यजवळ सले की माझं आयुष्य उजळून जातं आणि ते मला सदैव आधार देतात.

‘राजा बेटा’मध्ये पूर्वा मिश्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री संभाबना मोहंती म्हणाली, “माझ्या मते व्हॅलेंटाईनदिन हा अतर सर्वसामान्य दिवसासारखाच एक दिवस आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षातला एकच दिवस का राखीव ठेवायचा? त्यासाठी आपल्याकडे सारं आयुष्य पडलेलं आहे. प्रेमाचा उत्सव दररोज साजरा केला पाहिजे आणि तो फक्त तुमच्या खास आवडत्या व्यक्तीबरोबरच नव्हे, तर आपल्या आसपासच्या सर्वांबरोबर. ज्यांना माझं हे म्हणणं पटलं असेल, त्यांनी हा दिवस जरूर साजरा करावा, पण आपल्या आजुबाजूच्या लोकांना विसरू नये.

‘राजा बेटा’मध्ये वेदांत त्रिपाठीची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल सुधीर म्हणाला, “सर्वांना माझ्याकडून व्हॅलेंटाईवदिनाच्या शुभेच्छा आणि यंदा त्या दिवशी आपले लाड करून घेण्यास विसरू नका! त्या दिवशी जी गोष्ट करताना तुम्हाला सर्वाधिक आनंद होतो, ती करा कारण तुम्ही जर स्वत:वर प्रेम केलं, तरच तुम्ही इतरांवर मनापासून प्रेम करू शकाल, असं मला वाटतं.”

‘गुड्डन… तुमसे ना हो पाएगा’मध्ये गुड्डनची भूमिका साकारणारी कनिका मान म्हणते, “माझ्या दृष्टीने प्रेम ही एक अतिशय शक्तिशाली भावना असून ती केवळ तुमच्या खास व्यक्तीपुरतीच मर्यादित ठेवली जाऊ नये. प्रेम ही एक अतिशय सुंदर भावना असून तिचा अनभव फार उत्तम रीतीने घेता येतो. या दिवसाचं निमित्त साधून माझे सर्व चाहते, मित्र आणि माझ्या कुटुंबियांना मी व्हॅलेंटाईनदिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. प्रेम सर्वांवर करा, जगाला आज त्याचीच गरज आहे.”

‘मनमोहिनी’मध्ये सियाची भूमिका रंगविणारी अभिनेत्री गरिमासिंह राठोड म्हणाली, “यंदाच्या व्हॅलेंटाईनदिनी मी इन्स्टाग्रामवर माझ्या सर्व चाहत्यंना भेटणार असून त्यांच्या सर्व प्रेमळ सूचना आणि शुभेच्छांचा स्वीकार करणार आहे. तसंच व्हॅलेंटाईनदिनी माझ्या आईचाही वाढदिवस असल्याने मी यंदा तिला एक भारी ड्रेस घेणार असून तिला सिध्दिविनायकाचं दर्शनही घडविणार आहे. इतकंच नव्हे, तर मनमोहिनीच्या सर्व कलाकारांबरोबर मी तिला रेस्तराँमध्ये जेवायला घेऊन जाणार आहे.”

‘मनमोहिनी’मध्ये मोहिनीची भूमिका रंगविणारी अभिनेत्री रेहना पंडित म्हणाली, “व्हॅलेंटाईनदिनी सर्वत्र किती प्रेमाचं वातावरण असतं नाही! त्या दिवशी शहरात आपल्याला सर्वत्र लाल रंगाच्या विविध छटा पाहायला मिळतात. जिकडे तिकडे फुगे आणि फुलं दिसतात. पण माझ्या दृष्टीने तो इतर दिवसांसारखाच एक दिवस आहे. मी मला पाहिजे त्या दिवशी व्हॅलेंटाईनदिन साजरा करीन, फक्त विशिष्ट दिवशीच नव्हे. त्या दिवसाची माझी सर्वात आवडती आठवण माझ्या कॉलेजमधल्या दिवसांची आहे. त्या दिवशी माझ्या चार मैत्रिणींनी एकीच्या घरी हा दिन साजरा केला आणि माझ्या दृष्टीने तो सर्वात धमाल व्हॅलेंटाईनदिन होता. यंदा मात्र व्हॅलेंटाईनदिनी मी मनमोहिनीच्या चित्रीकरणात व्यग्र असेन.”

‘मनमोहिनी’मध्ये रामची भूमिका रंगविणारा अभिनेता अंकित सिवच म्हणाला, “माझ्या दृष्टीने व्हॅलेंटाईनदिन हा एक साधा दिवस सून तो 13 फेब्रुवारीनंतर आणि 15 फेब्रुवारीपूर्वी येतो. विनोद बाजूला ठेवा; पण प्रेम आणि प्रेमाचा संदेश सर्वत्र पसरविण्यासाठी आपल्याला केवळ एकच दिवस कशाला पाहिजे? हे काम आपण प्रत्येक दिवशी करू शकतो, हो की नाही? नि:शंक मनाने आणि अमर्यादपणे प्रेम करा. यंदा त्यादिवशी मला मनमोहिनी मालिकेसाठी चित्रीकरण करावं लागणार असलं, तरी माझ्या बरोबरच्या सर्व लोकांसाठी तो एक संस्मरणीय दिवस करण्याचा माझा विचार आहे.”

‘तुझसे है राबता’मध्ये मल्हार राणेची भूमिका साकारणारा अभिनेता सेहबान अझीम म्हणतो, “प्रेमाचा उत्सव मी दररोजच साजरा करीत असतो. ही एक विशुध्द भावना असून आपण आपल्या प्रत्येक नात्याचं मूल्य राखून त्यावर प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे. त्या दिवसानिमित्त माझ्या सर्व चाहत्यांना व्हॅलेंटाईनदिनाच्या शुभेच्छा!”

‘इश्क सुभान अल्ला’मध्ये कबीरची भूमिका साकारणारा अभिनेता अदनान खान म्हणाला, “एका प्रसिध्द व्यक्तीने म्हटलं आहे की आयुष्यात केवळ एकमेव आनंद आहे आणि तो म्हणजे दुसर्‍्यावर प्रेम करणं आणि दुसर्‍्याचं प्रेम स्वीकारणं. माझा या वचनावर गाढ विश्वास आहे. एका दिवसापुरता प्रेमळपणा दाखविण्यापेक्षा तुमच्या जीवनात येणार्‍्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेमाचा वर्षाव करा. शेवटी सर्वांना व्हॅलेंटाईनदिनाच्या प्रेमळ शुभेच्छा!”

‘इश्क सुभान अल्ला’मध्ये झाराची भूमिका रंगविणारी अभिनेत्री ईशा सिंह म्हणाली, “माझ्या दृष्टीने व्हॅलेंटाईनदिनाचा अर्थ एकच- माझ्या आईसोबत काही कळ व्यतीत करणं. मी दरवर्षी हा दिवस तिच्या संगतीत साजरा करते आणि त्या दिवशी आम्ही गाडीत बसून लांब फिरायला जातो आणि खूप गप्पा मारतो. माझी केवळ तीच कायमची व्हॅलेंटाईन आहे. सर्वांना माझ्यातर्फे व्हॅलेंटाईनदिनाच्या शुभेच्छा!”

‘ये तेरी गलियाँ’मध्ये अस्मिताची भूमिका रंगविणारी अभिनेत्री वृशिका मेहता म्हणाली, “या दिवसासंदर्भात माझी एक फार मजेशीर आठवण आहे, जी मी तुम्हाला सांगते. मी तेव्हा कॉलेजात शिकत होते आणि एका मुलाने त्या दिवशी माझ्याकडे त्याचं प्रेम व्यक्त केलं. त्याच्या मित्रांनी त्याला भरीस घातल्यानंतर त्याने बिनधास्तपणे माझ्याकडे त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. पण त्याने एक शब्द बोलण्यापूर्वीच मी त्याला नाकारलं. मला आज जरी त्या गोष्टीचं हसू येत असलं, तरी तेव्हा आम्हा दोघांनाही तो प्रसंग लाजवून टाकणारा होता. पण तो मुलगा आजही माझा मित्र असून आम्ही त्या दिवसाची आठवण काढून मजेत हसतो.”













No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...