परीक्षक अमाल मलिक उघड केले आपल्या ‘बोल दो ना जरा’ या लोकप्रिय गाण्यामागचे गुपित!
नव्या पिढीचा संगीतकार असलेल्या अमाल मलिकने शॉवर घेताना या गाण्याचे संगीत दिले!
‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या सातव्या आवृत्तीने 9 फेब्रुवारी रोजी रात्री 9.00 वाजता केलेल्या धमाकेदार पुनरागमनाने अत्यंत गोड आणि सुरेल गळा लाभलेल्या लहान मुलांनी आपल्या बहारदार आवाजात सादर केलेल्या अप्रतिम गीतांनी मोहून जाण्यास पुन्हा एकदा सिध्द व्हा! आपल्या सुरेल आवाजातील धमाकेदार कामगिरीने मेगा ऑडिशन्सची फेरी पार पाडल्यावर स्पर्धेत उरणार अंतिम 16 बालस्पर्धक.
या मेगा ऑडिशन्स फेरीतील सर्वच बालस्पर्धकांनी आपापल्या कुवतीनुसार उत्तम गाणी सादर केली, तरी अनुषा पात्राने सादर केलेले ‘बोल दो ना जरा’ हे गाणे ऐकून सर्वजण थक्क झाले. या कार्यक्रमातील एक परीक्षक अमाल मलिक यांनीच या गाण्याला संगीत दिले असले, तरी त्यामागे एक कथा आहे. अनुषाचे गाऊन झाल्यावर अमाल मलिकने या गाण्याशी संबंधित एक मजेदार किस्सा ऐकविला. अमाल मलिक म्हणाला, “‘बोल दो ना जरा’ हे तसं एक अवघड गाणं असून अनुषाने ते ज्या प्रकारे गायलं, त्यामुळे मी भावूक बनलो आहे. माझ्या मते नृत्यावरील गाण्यांना दिलेल्या चालींपेक्षा प्रेमगीतांना दिलेल्या चालींमुळे तुम्हाला चटकन ओळख मिळते. हे गाणं ऐकल्यावर मलाही चांगलं संगीत देता येतं, यावर लोकांचा विश्वास बसला आहे आणि माझ्यावर प्रशंसेचा वर्षावही झाला. या गाण्याचा अंतरा निश्चित करण्यापूर्वी मी तब्बल 12 अंतरे तयार केले होते; पण माझ्या गीतकाराला त्या चालीवर योग्य ते शब्दच सापडले नाहीत आणि त्यामुळे ते सर्व अंतरे फेटाळले गेले. मला चांगलं आठवतंय की मी तेव्हा बाथरूममध्ये शॉवर घेत होतो, तेव्हा मला या गाण्याची चाल सुचली. तेव्हा मी ताबडतोब बाहेर आलो, माझ्या गीतकाराला तात्काळ फोन लावला आणि त्याला ही धुन ऐकविली. ती ऐकल्यावर त्याने त्यात स्वत:ची एक ओळ जोडली, ती अशी- ‘हमारी कमी तुमको मेहसूस होगी, भिगा देगी जब बारीशें’. तेव्हाच मी ओळखलं की आम्हाला हे गाणं चांगलंच जमलं आहे.”
तो म्हणाला, “प्रयत्न करणं कधीही थांबवू नका. सर्व तरूण संगीतकारांना माझा सल्ला आहे की त्यांनी आपल्या गीतकारांना कमी लेखू नये आणि त्यांच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात कारण त्यांना खूप अनुभव असतो. आता नुषाचं गाणं ऐकल्यावर या गाण्याचं स्त्रीच्या आवाजातील एक गीतही मी करायला हवं होतं, असं आता मला वाटतं.” अमाल मलिकसारख्या संगीतकाराकडून तुमच्या गाण्याला अशी दाद मिळत असेल, तर तुम्ही ढगांवर तरंगत असलात, तरी ती चूक तुम्हाला माफ असेल.
या आगामी भागात आपला ‘शान्टॅस्टिक’ परीक्षक शान आणि सुरेल गाण्यांमुळे ‘रिच’ झालेली परीक्षक रिचा शर्मा हे मंचावर आपली लोकप्रिय गीते सादर करताना दिसतील. तसेच तरूण संगीतकार आपले ‘बोल दो ना जरा’ हे गाणे पियानोवर वाजवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना दिसेल. तसेच सर्वच बालस्पर्धकांना केवळ एकाच वाद्याची साथ घेऊन गाणे गाण्यास सांगितल्यावर त्यांच्या गायनकलेची कसोटी लागेल. अंतिम 16 स्पर्धकांमध्ये स्थान मिळविण्यासाठी हे कष्ट घेणे गरजेचे आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी पाहा ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ शनिवार-रविवारी रात्री 9.00 वाजता फक्त ‘झी टीव्ही’वर!
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST