Thursday, February 14, 2019

कामना पाठक टेलिव्हिजनची सोनाक्षी सिन्हा
&TVच्या 'हप्पू की उलटन पलटन' या आगामी विनोदी मालिकेत कामनाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा दबंग मधला लुक अवलंबला आहे.

देखणी कामना पाठक &TVच्या 'हप्पू की उलटन पलटनया आगामी विनोदी मालिकेत चक्क ९ वस्ताद मुलांच्या आईची भूमिका साकारण्यास सज्ज झाली आहे.नाट्यवर्तुळात ती प्रसिद्ध आहेलहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याची इच्छा असणाऱ्या कामनाने प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत अनेक नाटकं केली आहेत आणि आता ती सज्ज झालीय टेलिव्हिजनच्या पडद्यासाठी&TVची प्रचंड चाहती असलेली ही अभिनेत्री 'हप्पू की उलटन पलटनया विनोदी मालिकेचा भाग बनवण्यास उत्सुक आहेया मालिकेत योगेश त्रिपाठी हप्पू सिंगची भूमिका साकारणार आहेत आणि ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपूरी कटोरी अम्माची.
एक रंजक बाब म्हणजे कामना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासारखी दिसतेयोगायोग म्हणजे सोनाक्षीच्या पहिल्या सिनेमात म्हणजेच दबंगमध्ये तिचा जो लुक होता तसाच काहीसा लुक कामनाचा 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये आहे. ''हप्पू की उलटन पलटन'मधील माझ्या राजेश या व्यक्तिरेखेतील प्रत्येक बाब मग ते कपडे असोतकेशभूषा असो की मेकअप… बऱ्याच गोष्टी दबंगमधील सोनाक्षी सिन्हाच्या लुकशी मिळत्याजुळत्या आहेतराजेश एक बिनधास्त आणि स्पष्टवक्ती स्त्री आहेसगळं काही मनासारखं व्हावं यासाठी ती नवऱ्याच्या संदर्भातील गोष्टी तशा घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतेती काहीशी खमकी बायको वाटत असली तरी तिच्याशी नीट वागलं तर ती प्रेमळ आहे," असं कामना म्हणाली.
निर्मात्यांना बुंदेलखंडी उच्चारण असणारी अभिनेत्री हवी होती आणि कामना त्यासाठी अगदी योग्य आहेत्यामुळेही भूमिका मिळणेहे आपलं नशीबच आहे,असं तिला वाटतंती म्हणाली, "मी मध्यप्रदेशची आहेमी आणि आई एकमेकींशी बुंदेलखंडी लहेज्यातच बोलतो त्यामुळे ही शैली माझ्यात अगदी स्वाभाविकपणे आहेअर्थाततिच्याशी बोलणं फार सोपं आहे पण हप्पूसाठी संवाद बोलताना ते काहीसं कठीण जातंकारणत्यात मला एक प्रकारचा रॉनेस आणायचा आहे.पणइथेही आईचीच मदत झालीउच्चारण सुधारून अगदी हवे तसे संवाद म्हणता येतीलयासाठी तिने मदत केलीमला वाटतं टीव्हीवर बुंदेलखंडी भाषेचा फारसा वापर झालेला नाहीत्यामुळेही हे काम फार उत्साहजनक झाले आहे."
&TVच्या या नव्या मालिकेचं नाव 'हप्पू की उलटन पलटनअसे आहेयात पोलिस अधिकारी हप्पू सिंगची एक वेगळी बाजू आणि त्याला घरी प्रत्ययाला येणारी असंख्य प्रकारची द्विधा मनस्थिती दाखवण्यात येणार आहेत्याच्या घरी धाडसी बायकोहट्टी आई आणि चक्क ९ मुले आहेतआई आणि बायकोच्या भांडणात त्याचे सँडविच होतेबऱ्याचदा या दोघींचा राग त्याला सहन करावा लागतो आणि त्याचवेळी मुलांच्या सतत चालणाऱ्या खोड्यांनाही सामोरे जावे लागते.
ती पुढे म्हणाली, "हप्पू की उलटन पलटन'मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपूरी यांच्यासोबत काम करायला मिळणे हा खूप मोठा आनंद आहेत्यांनी टेलिव्हिजन आणि सिनेमांमध्ये अत्यंत लक्षणीय भूमिका साकारल्या आहेतत्यांचे काम पाहत मी मोठी झाली आहेत्यांच्यासोबत स्क्रीनवर दिसणे आणि मालिकेसाठी काम करताना त्यांच्याकडून शिकणे यासाठी मी उत्सुक आहेहिमानीजी पॉवरहाऊस आणि प्रतिभेचा खजिना आहेतत्यांच्याकडून मी अभिनयाच्या काही टिप्सही घेणार आहेयोगेशही भन्नाट अभिनेता आहेतो अगदी सहज त्याची व्यक्तिरेखा उभी करतोहे काम मजेशीर असणार आहेहप्पूत्याची आई,बायको आणि नऊ मुलांसोबत या विनोदाच्या सफरीवर प्रेक्षकांनाही खूप मजा येणार आहे."
पहा नवी मालिका 'हप्पू की उलटन पलटन' लवकरच &TVवर



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...