Thursday, February 14, 2019

रेहान रॉय गुड्‌डनच्या व्हॅलेन्टाईन्स डे स्पेशलमध्ये शाहरूख खानच्या डर लूकमध्ये  दिसणार

दर आठवड्‌याला झी टीव्हीवरील ‘गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा’मधील प्लॉटमध्ये अनेक वळणे येतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे औत्सुक्य वाढतच जाते. ह्या शोमधील कलाकार आपल्या लूकसोबत अनेक प्रयोग करण्यासाठी मानले जातात, इन्स्पेक्टर पर्वच्या रूपातील अभिनेता रेहान रॉय खास व्हॅलेन्टाईन्स डे महा एपिसोडसाठी आपला लूक पूर्णपणे बदलेल. रेहान आपल्या लूकसाठी बॉलीवूड किंग ऑफ रोमांस शाहरूख खानच्या लूकवरून प्रेरणा घेणार आहे.

शोमध्ये जिंदाल हाऊसमध्ये व्हॅलेन्टाईन्स डे - बॉलीवूड थीम पार्टी आयोजित करण्यात येईल. यात पर्व शाहरूखच्या डर चित्रपटातील राहुलच्या व्यक्तिरेखेप्रमाणे लूक घेईल. रेहानने मल्टिकलर शर्ट आणि ब्लॅक पॅंट परिधान केले. असाच वेश शाहरूखने डर चित्रपटात तू मेरे सामने ह्या गाण्यामध्ये परिधान केला होता. रेहान म्हणाला, “शाहरूख खान हा बॉलीवूड किंग असून त्याने आपल्या विभिन्न व्यक्तिरेखांमधून प्रणयाचा खरा अर्थ आपल्याला समजावला. त्याचा चित्रपट डरमधील त्याचा लूक मला घेता आला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. मी ह्या लूकला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि आशा करतो की प्रेक्षकांना हा नवीन टि्‌वस्ट आवडेल.”

ह्या शो च्या आगामी भागामध्ये प्रेक्षकांना खूप सारी क्शन, भावना आणि नाट्‌य पाहायला मिळेल. खलनायक पर्व गुड्‌डन कनिका मान च्या आयुष्यात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करेल.

पहा गुड्‌डन… तुमसे ना हो पायेगा झी टीव्हीवर दर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता!







No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री

  'इलू इलू' म्हणत एलीची मराठी चित्रपटात एंट्री एकीकडे मराठी चित्रपट देशविदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारत आहेत, तर दुसरीकडे ...