फॅट शेमिंगबद्दल अभिनेत्री खुशबू श्रॉफचे धाडसी विधान
&TV वरील लाल इश्क़ ही मालिका सध्या यशस्वीपणे प्राइम टाइमवर राज्य करते आहे. ही मालिका अनेक सृजनशील निर्मात्यांनी एकत्र येऊन बनवली आहे ज्यात त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून एका नव्या प्रेमकथेला अलौकिक वळण दिले आहे. प्रत्येक आठवड्यात नव्या नावाजलेल्या चेहऱ्यांना घेऊन नव्या कथा प्रेक्षकांना दाखवणे ह्यामुळे लाल इश्क़ ही मालिका इतरांपेक्षा वेगळी ठरते. आगामी भागात फॅट शेमिंग म्हणजे लठ्ठपणाची लाज वाटणे हा एक संवेदनशील विषय मालिकेत दाखवला जाणार आहे ज्यात खुशबू श्रॉफ, उमंग जैन आणि करण शर्मा प्रमुख भूमिकेत दिसतील.
कैक दशकांपासून जास्त वजन असणाऱ्या स्त्री व पुरुष कलाकारांना बहुतेक दुय्यम आणि कधीकधी अपमानास्पद व्यक्तिरेखा दिली गेलेली आहे. उदा. एखादे मूर्ख पात्र किंवा एखादे खादाड पात्र. त्याहीपेक्षा पडद्यावर असो व पडद्यामागे, लठ्ठपणावरून अनेक वर्षांपासून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री जसे विद्या बालन आणि सोनाक्षी सिन्हा ह्यासारख्या कलाकारांना लक्ष्य केले जाते आहे. तरीही उशिरा का होईना परंतु लठ्ठपणा स्वीकारल्या गेल्याच्या चांगल्या घटनाही आहेत.त्यासाठी ह्याविरोधात ज्यांनी आवाज उठवला त्या धाडसी लोकांचे आभार, ज्यांनी लठ्ठपणावर केल्या जाणाऱ्या नकारात्मक विधानांवर आणि टीकेवर आक्षेप घेतला खासकरून अभिनेत्यांबद्दल.
लाल इश्कच्या या भागात नेहा (खुशबू श्रॉफ) नावाच्या एका लठ्ठ तरुणीचे आयुष्य उलगडले जाईल. जिचा तिच्या नवऱ्याने संजयने ती लठ्ठ आहे म्हणून छळ केला आहे. संजयने ह्याआधीही आपल्या वागण्यामुळे आपल्या आयुष्यातील एका मुलीला दूर केले आहे आणि आता त्याला वाटते आहे की तो नेहाबरोबर अडकला आहे जी एक लठ्ठ मुलगी आहे. ही कथा तेव्हा अलौकिक वळण घेते जेव्हा नेहा मरण पावते आणि तिचा आत्मा त्या लोकांना झपाटतो जे तिच्या दुःखाला कारणीभूत होते.
लठ्ठपणाबद्दल आणि ही लठ्ठ मुलीची भूमिका साकारण्याची ऑफर मिळाल्याबद्दल खुशबू श्रॉफ म्हणतात, "ही भूमिका साकारण्यास माझी काहीही हरकत नव्हती.कारण काही प्रमाणात आपले शरीरच आपल्याला मिळणाऱ्या भूमिका ठरवते. लठ्ठ मुलगी कधीही सडपातळ शरीराच्या मुलीची भूमिका करू शकत नाही त्यामुळे मला हे मनापासून मान्य आहे. मला न पटणारी बाब म्हणजे दुय्यम भूमिका, ज्यात लठ्ठ मुलगी विनोद निर्मितीसाठी वापरली जाते. त्यामुळे अशा भूमिका नाकारण्याचा मी सजग प्रयत्न करते ज्यात लठ्ठ मुलगी काहीही न करता फक्त चिप्स खात बसलेली असते. आपण लोकांच्या नजरेसमोर आहोत त्यामुळे आपण विनोदाच्या नावावर मूर्खपणाच्या गोष्टी दाखवण्यापेक्षा अशा विषयांवर काम केले पाहिजे जे वास्तव दर्शवणारे असतील आणि ज्यामुळे संपूर्ण समाजावर सकारात्मक प्रभाव पडेल.
हे सर्व अनुभवण्यासाठी लाल इश्क़चा पुढील भाग पहा.
पहा लाल इश्क प्रत्येक शनिवार व रविवार फक्त १० वाजता &TV वर.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST