Thursday, February 14, 2019

विक्रम बेताल की रहस्यगाथामध्ये शिव्या पठानिया प्रथमच दुहेरी भूमिकेत
&TV’ वर विक्रम बेताल की रहस्य गाथा ही मालिका राजा विक्रमादित्य आणि धूर्त पिशाच्च वेताळ यांच्या मनोरंजक कथांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.मालिकेतील पौराणिक कथांचे सध्याचे भाग मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेतआगामी कथानकात भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मीची कथा दाखवली जाईललोकप्रिय दूरदर्शन अभिनेत्री शिव्या  पठानिया ह्यांनी पहिल्यांदाच देवी लक्ष्मीची भूमिका साकारली आहेलोकप्रिय दूरदर्शन अभिनेत्री शिव्यानेह्यापूर्वी लहान पडद्यावर उल्लेखनीय भूमिका केल्या आहेतती प्रथमच पौराणिक मालिकेत काम करते आहे आणि तेही दुहेरी भूमिकेतदेवी लक्ष्मी आणि देवी गायत्री अशा दोन भूमिकेत ह्या प्रतिभावान अभिनेत्रीला बघायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.
शिव्या आपल्या पहिल्या पौराणिक मालिकेत दुहेरी भूमिका साकारण्याच्या आपल्या अनुभवाविषयी सांगताना म्हणतात"मला नेहमीच पौराणिक कथानकअसलेल्या मालिकेत काम करायचे होतेकारण माझा विश्वास आहे की त्यामुळे कलाकाराला नव्या प्रकारच्या चित्रीकरणाचा अनुभव मिळतो आणि आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवण्याची संधी मिळतेआपण सर्वांनी विक्रम आणि वेताळाच्या कल्पित कथांबद्दल ऐकले आहे जे विक्रम बेताल की रहस्यगाथाद्वारे उत्तमरीत्या सादर केले जाते आहेपरंतु मला हे देखील आवडते की इतर पौराणिक कथा सुद्धा प्रेक्षकांना तितक्याच आवडतातपौराणिक कथा कंटेंटवर आधारित असतात आणि वेगळी शैली असून ती सहजसोप्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडणे दाखवणे आवश्यक आहेह्या मालिकेत दोन दैवीय व्यक्तिरेखासाकारल्यानेअभिनेत्री म्हणून माझ्या क्षमतेत नक्कीच मोलाची भर पडली आहेही कथा मालिकेचा मुख्य भाग आहे आणि अपूर्णता हेच खरे सौंदर्य असल्याचेह्यात दाखवले गेले आहेमी ह्या कथेपासून हाच बोध घेतला आहे.
या मालिकेत भगवान विष्णु देवी गायत्रींना हयग्रीवच्या (असुरांपैकी एक जो भगवान विष्णुचा वध करु इच्छितो पण देवी आदी शक्तीने त्याला वरदान दिले आहे की केवळ तो स्वतःच स्वतला मारू शकतोहातून हरवलेल्या ज्ञानावर कब्जा करणाऱ्या वेदांची रचना करण्याची विनंती करीत आहेतहे ज्ञान केवळ देवी गायत्री यांनी लिहिलेल्या वेदांमुळेच परत येऊ शकतेदुसरीकडे हयग्रीव देवी गायत्रीच्या सर्व वेदांची चोरी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नात यशस्वी होतो.भगवान विष्णु देवी लक्ष्मीला आवाहन करतात की त्यांनी आपल्या सौंदर्याने हयग्रीवला मंत्रमुग्ध करावे आणि वेद परत मिळवावेत.
देवी लक्ष्मी हयग्रीवकडूनवेद परत मिळवण्यात यशस्वी होतील का?
पहा विक्रम आणि बेताल की रहस्यगाथा मध्येप्रत्येक सोमवार-शुक्रवारी रात्री ८ वाजता फक्त &TV वर.



No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...