Friday, February 15, 2019

गोव्यातील पर्यटकांच्या संख्येत घट होण्यामागच्या कारणांचा सरकारतर्फे शोध,
तज्ज्ञ आणि भागधारकांबरोबर कामलवकरच उपाययोजना - आजगांवकर

माननीय पर्यटन मंत्री श्रीमनोहर आजगांवकर यांनी आज गोव्यातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राची चिंता दूर करत राज्यातील पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी विशिष्टयंत्रणा लवकरच लागू करणार असल्याचे सांगितलेयावेळेस त्यांनी सर्व भागधारकांना यासंदर्भात गोवा सरकारला सहाकार्य करण्याचे आवाहन केले.

श्रीमनोहर आजगांवकर म्हणाले, ‘आज पर्यटन क्षेत्रातील भागधारकांबरोबर फलदायी चर्चा झाली आणि मी गोव्यातील पर्यटन सुधारण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या सुचनांचे स्वागतकरतोगोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे आणि त्यामागच्या कारणांचा शोध घेत सर्व पर्यटन संघटनाआणि भागधारकांना विश्वासातघेऊन एकत्रितपणे त्यावर काम केले जाईलगोवा सरकार पर्यटन क्षेत्रातील भागधारकांबरोबर तसेच तज्ज्ञांबरोबर यासंदर्भातील समस्यांचा वेध घेत असून येत्या काही दिवसांत पर्यटकांच्या संख्येतघट होण्यामागची कारणे शोधली जातील  त्यावर लवकरात लवकर उपाययोजना केली जाईल.’

श्रीआजगांवकर म्हणालेकी ते गरजेप्रमाणे सरकारच्या इतर विभागांबरोबर म्हणजेच पोलिस  स्थानिक अधिकाऱ्यांबरोबर काम करून गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षितवातावरण राखले जाईल याची खात्री करतील.
त्यांनी भागधारकांना गोवा पर्यटनबरोबर काम करून गोव्याचा राष्ट्रीय  आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्यासाठी विपणन धोरण आखण्यास मदत करावी असेही सांगितले.
पोर्वोरिम येथे आज झालेल्या बैठकीत ते अध्यक्षस्थानी होतेतर या बैठकीसाठी विविध पर्यटन संघटनाहॉटेलचालक आणि भागधारक उपस्थित होतेश्रीआजगांवकर यांनी या बैठकीत मांडल्यागेलेल्या सर्व समस्या तसेच व्यापारी संघटना आणि हॉटेलचालकांनी सुचवलेल्या उपाययोजना ऐकून घेतल्याया उपाययोजनांमध्ये पायाभूत सुविधास्वच्छता सुधारणेविमानवाहतूकीचे प्रमाणवाढवणेसार्वजनिक बससेवा सुधारणेराज्य जलवाहिन्यांचा वापर करणेपर्यटनाशी संबंधित आणखी उपक्रमसवलती सुरू करणे यांचा समावेश होता.

पर्यटन भागधारकांनी श्रीआजगांवकर यांना पर्यटकांना विविध पातळ्यांवर दिला जाणारा त्रास तसेच छळवणुकीवर मार्ग काढण्याची विनंती केलीछळवणुकीच्या या प्रकारांमध्ये पर्यटन स्थळीभिकाऱ्यांनी संघटितपणे पर्यटकांना त्रास देणेस्थानिक कंपन्यांद्वारे अवास्तव टॅक्सी शुल्क आकारले जाणारेजास्त जीएसटीपर्यटन स्थळी पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी  त्यांची दुरवस्थादाबोलिम येतथे उशीराच्या विमानांसाठी दीर्घकालीन पार्किंग समस्याव्हिसाचे अवास्तव शुल्कव्हिसा शुल्कावर पेबॅक सवलतींची गरजहॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी सवलती सुरू करण्याची गरजइत्यादींचा समावेश होता.

ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाने (टीटीएजीश्रीसॅव्हिओ मेसियास यांच्या नेतृत्वाखाली श्रीआजगांवकर यांना गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांवर आधारित अहवाललवकरात लवकर दाखल करण्याचे आश्वासन दिलेया अहवालामुळे सरकारला समस्या हाताळण्यासाठी मदत होणार असून श्रीआजगांवकर यांनी यावेळेस पर्यटन भागधारकांना सरकारबरोबरएकत्रितपणे काम करून गोव्यातील पर्यटन उंचावण्याचे आश्वासन दिले.

गोवा सरकारच्या पर्यटन विभागाचे सचिव श्रीसंजीव गडकरश्रीराजेश काळेउपसंचालकपर्यटन  विभागश्रीगॅव्हिन डायसव्यवस्थापक – जीटीडीसी आणि राज्य स्तरीय विपणन आणि प्रसारसमितीचे सदस्यश्रीनंदन कुडचडकर आणि श्रीअभिजित वाळके यावेळेस उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..

‘जर्नी’तील आत्मशोधावर आधारित शीर्षक गीत प्रदर्शित..  सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत ‘जर्नी’ या आगामी चित्रपटाचे शीर्षक गीत नुकतेच प्रदर्शित झा...