‘लिटिल चॅम्प’ सुगंधा दातेला माधुरी दीक्षितने बहाल केला ‘लिटिल श्रेया घोषाल’चा किताब!
‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ चा आगामी भाग हा प्रेक्षकांची संपूर्ण धमाल घेऊन येणार आहे; कारण त्यात आपल्या ‘टोटल धमाल’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी अनिल कपूर, माधुरीदीक्षित - नेने, रितेश देशमुख, अजय देवगण हे सर्व प्रमुख कलाकार तसेच दिग्दर्शक इंदरकुमार हे सहभागी होणार आहेत. यातील सर्व बालस्पर्धक हे आपल्या पूर्ण क्षमतेने प्रेक्षक आणि परीक्षकांचे मनोरंजन करीत असले, तरी त्यातील एक लिटिल चॅम्प सुगंधा दाते हिने अप्रतिम सादर केलेल्या हम दिल दे चुके सनम या गाण्याने सर्वांना भारावून टाकले. त्यातही या कार्यक्रमात सहभागी झालेली ‘धक - धक गर्ल’ माधुरी दीक्षित तर तिच्या आवाजाने इतकी भारून गेली की तिने तिला ‘लिटिल श्रेया घोषाल’ किताबच जाहीर केला. सुगंधाने न केवळ टोटल धमालच्या कलाकारांचीच मने जिंकली असेनव्हे , तर परीक्षक अमाल मलिक यांचे मनही जिंकले. तिचे गाणे संपल्यावर परीक्षक अमालने सुगंधाला वचन दिले की हा कार्यक्रम संपल्यावर आपण तुझ्याकडून एक गीत नक्कीच गाऊन घेऊ.
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST