Friday, March 29, 2019

अवनी आणि पुष्कराजची भेट 'एक होती राजकन्यामध्येभूमिका साकारत आहेत आस्ताद काळे

सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' मधील 'अवनी'ने आता प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहेप्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहेत्यामध्येचएका 'खासनवीन पात्राने मालिकेत एंट्री केली आहेपत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे 'पुष्कराज'अभिनेते आस्ताद काळे ही भूमिका निभावताना दिसतीलपुष्कराजची 'हटकेएंट्री आणिअवनीशी झालेल्या भेटीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच ताणली गेली आहे.

'एक होती राजकन्या' मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेकर्तव्यनिष्ठसाधीहळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनी सगळ्यांनाच भावली आहेआतापर्यंत झालेल्याएपिसोड्स मधून अवनीचा स्वभावतिच्या घरचे वातावरणतिचे पोलीस खात्यात वावरणे प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहेअवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भरपडली आहेमालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहेपुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनीअनवधानाने त्याच्या वाटेत येतेअवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जातेपुष्कराज पोलीसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोतदिसतोत्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेट व्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहेवरवर पाहता साधी वाटणारी हि अचानक झालेली छोटीशी भेट कोणतेवळण घेईल..., का ती एका नव्याच कथानकास सुरुवात करेल.., हे पाहणे मनोरंजक असणार आहे.

 पुष्कराज आणि अवनीची भेट अचानक झाली असली तरी अवनीला पुष्कराजबद्दल आधीपासूनच आदरयुक्त कुतुहूल आहेपण पुष्कराज नक्की कोण आहेत्याचा भूतकाळ काय आहे आणि त्याच्याअचानक येण्याचा हेतू काय असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेतमालिकेचे पदर जसे उलगडत जातील तसा पुष्कराज प्रेक्षकांना कळू लागेलअवनी आणि पुष्कराज मध्ये कशा प्रकारचा संवादहोतोत्यांच्यात कसे नाते निर्माण होते यावर प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेतकदाचित पुष्कराजचा मालिकेतील प्रवेश मालिकेला एकदम कलाटणी देखील देऊ शकेल.

मालिकेतील हि सर्व नवी वळणं पाहणे मनोरंजक असणार आहेराजकन्या अवनीच्या भावविश्वात सामील होण्यासाठी पहा




Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025

  Meesho Limited’s Initial Public Offering to open on Wednesday, December 3, 2025 Price Band fixed at ₹105 per equity share of face value ₹1...