अवनी आणि पुष्कराजची भेट 'एक होती राजकन्या' मध्ये. भूमिका साकारत आहेत आस्ताद काळे
सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' मधील 'अवनी'ने आता प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर केले आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या राजकन्येचा हा प्रवास दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. त्यामध्येचएका 'खास' नवीन पात्राने मालिकेत एंट्री केली आहे. पत्रकार असलेल्या या नव्या पात्राचे नाव आहे 'पुष्कराज'. अभिनेते आस्ताद काळे ही भूमिका निभावताना दिसतील. पुष्कराजची 'हटके' एंट्री आणिअवनीशी झालेल्या भेटीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच ताणली गेली आहे.
'एक होती राजकन्या' मालिका अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कर्तव्यनिष्ठ, साधी, हळवी अशी बाबांची लाडकी राजकन्या अवनी सगळ्यांनाच भावली आहे. आतापर्यंत झालेल्याएपिसोड्स मधून अवनीचा स्वभाव, तिच्या घरचे वातावरण, तिचे पोलीस खात्यात वावरणे इ. प्रेक्षकांच्या चांगलेच ओळखीचे झाले आहे. अवनीच्या या छोट्याश्या जगात आता एका नवीन पात्राची भरपडली आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आस्ताद काळे साकारत असलेल्या पुष्कराजची एंट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी सुखद धक्काच आहे. पुष्कराज पोलीस ठाण्यात बातमी शूट करत असताना अवनीअनवधानाने त्याच्या वाटेत येते. अवनी आणि पुष्कराजची ही प्रोमोत दिसलेली ओझरती भेट बरंच काही सांगून जाते. पुष्कराज पोलीसांशी बोलत असताना अवनीच्या वडिलांचा संदर्भ आलेला प्रोमोतदिसतो. त्यामुळे तो आणि अवनी त्यांची भेट व्हायच्या आधीच एका अदृश्य धाग्याने बांधले गेले आहेत असे प्रेक्षकांना वाटत आहे. वरवर पाहता साधी वाटणारी हि अचानक झालेली छोटीशी भेट कोणतेवळण घेईल..., का ती एका नव्याच कथानकास सुरुवात करेल.., हे पाहणे मनोरंजक असणार आहे.
मालिकेतील हि सर्व नवी वळणं पाहणे मनोरंजक असणार आहे. राजकन्या अवनीच्या भावविश्वात सामील होण्यासाठी पहा,
No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST