Saturday, March 2, 2019


‘ती अँड ती’ची यंग आणि फ्रेश टीम; जवळपास अनेकजण हे सुभष घई  यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स’चे स्टुडंट्स

दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी आणि इतर सिनेमाशी निगडीत गोष्टींचे प्रशिक्षण देणारी इंस्टिट्युट म्हणजे सुभाष घई यांचे ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’. केवळ पुस्तकी अभ्यास नसून प्रॅक्टिकलला देखील महत्त्व देणा-या या इंस्टिट्युटमधून अनेक क्रिएटिव्ह माईंड्स या इंडस्ट्रीत आले आहेत आणि नुकताच घडलेला योगायोग म्हणजे मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अँड ती’ या सिनेमाची संपूर्ण टीम ही यंग तर आहेच पण सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे या टीममध्ये व्हिसलिंग वूड्सच्या मेंबर्सची संख्या ही जास्त आहे.

अर्बन रोमँटिक कॉमेडी जॉनर असलेल्या या सिनेमाची कथा मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी याने लिहिली आहे. विराजस हा व्हिसलिंग वूड्सचा विद्यार्थी आहे. सिनेमाच्या लोकेशन्सवर जेव्हा टेक्निकल टीमशी संवाद साधण्यात आला तेव्हा विराजसला कळले की टेक्निकल टिममधले तब्बल ११ मेंबर्स हे व्हिसलिंग व्हूड्सचे होते. ‘सिनेमासाठी फक्त व्हिसलिंग वूड्सचीच मुलं घ्यायची असा आमचा कोणताही प्लॅन नव्हता हा निव्वळ योगायोग होता’, असे विराजसने म्हटले.

विराजस कुलकर्णी आणि मर्मबंधा गाव्हणे यांनी सिनेमाचं लिखाण केलं आहे. तसेच विराजस कुलकर्णी आणि जीत अशोक हे असोशिएट डिरेक्टर आहेत. हर्षवर्धन पाटील सिनेमॅटोग्राफर आहे तर असिसटंट सिनेमॅटोग्राफर्स सुनित वत्स, सुमित दहिया, असाद अली आहेत. अर्जुन मोग्रे हा एडिटर तर श्रुष्टी पाथ्रे असिटंट एडिटर आहे. अशी ही टेक्निकलची यंग टीम आहे.

व्हिसलिंग वूड्सच्या एका पेक्षा एक टॅलेंटेड मुलांचा सिनेमात सहभाग पाहता एक गोष्ट इथे नक्की अधोरेखित केली गेली आहे आणि ती म्हणजे, इंस्टिट्युटचं स्थान आणि क्वालिटी पुन्हा एकदा हायलाईट झाली आहे. या इंस्टिट्युटमध्ये येणारे विद्यार्थी विशिष्ट असा अभ्यास केल्यावर आपसूकपणे ते प्रोजेक्ट्सचा पार्ट होऊन जातात. व्हिसलिंग वूड्सची मुलं खूप मोठी प्रोग्रेस करताना दिसत आहेत.

व्हिसलिंग वूड्सचा विद्यार्थी या नात्याने आणि सिनेमाचा लेखक या जबाबदारीने काम करण्याचा अनुभवविषयी विचारले असता विराजसने म्हटले की, “व्हिसलिंग वूड्सच्या मुलांसोबत काम करताना आम्हांला पण मजा यायची. त्यांच्यासोबत काम करणं सोपं होऊन जायचं कारण सर्वांची काम करण्याची पध्दत सारखीच होती. सगळ्यांना त्याच प्रोफेसर्सने शिकवलं होतं. यापूर्वी जरी एकमेकांसोबत काम केलं नसलं तरी एकाच इंस्टिट्युशनचे स्टुडंट्स म्हणून आमचे वर्क पॅटर्न आणि वर्क फ्लो सारखा असायचा, त्यामुळे एकत्र काम करताना खूपच मजा आली.”

या सिनेमात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पडद्यावरील कलाकारांचा अभिनय आणि पडद्यामागील कलाकारांच्या कामामुळे सिनेमाला मिळालेला एक युनिक टच पाहण्यासाठी नक्की पाहा ‘ती अँड ती’ ८ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.


No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

94% of Indian Workforce Believe AI Skills will Skyrocket Careers:

Emeritus Global Workplace Skills Study 2025 Highlights Record AI Adoption and Career Growth Potential National, February 3, 2025: India is e...