Sunday, March 10, 2019


‘का रे दुरावा’ नंतर जालिंदर कुंभार
घेऊन येत आहेत ‘साथ दे तू मला’
अनुबंध, अनामिका ,लज्जा, कालाय:तस्मै नम:, का रे दुरावा या लोकप्रिय मालिकांनंतर दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांची
नवी मालिका केव्हा येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. मधल्या काळात हिंदी मालिका, मराठी चित्रपट हे नवे टप्पे
गाठताना वेगळे आणि लौकिकाला साजेसे दर्जेदार प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान त्याच्या समोर होते. हे आव्हान
यशस्वीपणे स्वीकारून स्टार प्रवाहवर ‘साथ दे तू मला’ ही नवी मालिका जालिंदर दिग्दर्शित करत आहे. उत्तम कथा,
उत्तम कलाकार अशी भट्टी या मालिकेत जमून आली आहे. या मालिकेचे शीर्षकगीत, प्रोमो सध्या लोकप्रिय होते आहे.    
‘साथ दे तू मला’ या मालिकेत सविता प्रभुणे, आशुतोष कुलकर्णी, रोहन गुजर, प्रियांका तेंडोलकर, प्रिया मराठे, पियुष
रानडे, अरुण नलावडे, मेघना वैद्य, दीपक करंजीकर, अश्विनी कुलकर्णी, श्रद्धा पोखरणकर, ऋचा आपटे, अनिल रसाळ,रोहन 
पेडणेकर, वैभव राजेंद्र, आसावरी तारे, अंकित म्हात्रे, पूर्वा कौशिक, किरण राजपूत, सोनाली मगर, जय चौबे ही
अभिनयसंपन्न स्टारकास्ट आहे.
घर कि करियर या प्रश्नाचा सध्याचा पैलू मांडतानाच स्त्री-पुरुष नात्यांची आजची गोष्ट मांडण्याचा वेगळा प्रयत्न या मालिकेत केला
असून आतापर्यंत टेलिव्हिजनवर हाताळला गेलेला नाही असा विषय या मालिकेत आहे. हा विषय प्रत्येकाच्या
आयुष्यातला आहे,पण तो टीव्ही चॅनलवर कधी दाखवलाच गेला नाही. स्त्री-पुरुष नात्याचा खूप वेगळा, गोड असा हा
पैलू आहे.
जालिंदरनं आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या सगळ्याच मालिका गाजल्या,लोकप्रिय ठरल्या. ‘साथ दे तू मला’ या
मालिकेच्या निमित्तानं दिग्दर्शक जालिंदर म्हणाला, & #39;एखादी मालिका केल्यानंतर मी लगेच काही करत नाही. मी मला
हवंतसं जगतो, वाचतो, लिहितो. त्यातून काहीतरी वेगळं सापडतं. तसंच काहीसं ‘साथ दे तू मला’च्या बाबतीतही झालं.
कथा लिहून झाली,मालिकेच्या दृष्टीने विचार सुरू केला आणि जवळपास सहा महिने व्यक्तिरेखा लिहिल्या. 
सर्वसाधारणपणे टीव्ही मालिका घाईघाईत होतात. लेखनाला हवा तितका वेळ दिला जात नाही. मात्र, साथ दे तू मला
ही मालिका आम्ही पूर्ण तयारीनिशी केली आहे. कथेत प्रत्येक व्यक्तिरेखेचा वास्तववादी पद्धतीने बारकाईनं विचार
केला असल्यानं लेखनाच्या पातळीवरच ही मालिका नक्कीच सकस आहे, असं जालिंदरनं आवर्जून सांगितलं. . 
‘तिच्या स्वप्नांची’ आणि नात्यांची आजची गोष्ट सांगणाऱ्या.सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता स्टार
प्रवाहवरून प्रसारित होणाऱ असलेल्या ‘साथ दे तू मला’ची त्यामुळेच विशेष उत्सुकता आहे

No comments:

Post a Comment

GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable....

Chhaava Roaring in Theatres. 424.76 Cr Non-Stoppable.... #Chhaava kicks off Week 3 with a bang! Rakes in 13.30 Cr on 3rd Friday, taking its ...