भारताच्या संगीत क्षेत्रातील ऐतिहासिक दिवस हाच म्हणता येईल, सुपरस्टार
रणवीर सिंह आणि फिल्ममेकर व संगीत रसिक नवझर ईरानी एका महत्वाकांक्षी प्रकल्पाकरिता एकत्र आले
असून त्यांनी स्वतंत्र म्युझिक रेकॉर्ड लेबल IncInk लॉन्च केले. या लेबलच्या माध्यमातून भारतातील
म्युझिक सुपरस्टार्सचा शोध सुरू होणार आहे. ते त्यांची अर्धीकच्ची प्रतिभा जगासमोर घेऊन जातील.
“आम्ही सुरुवातीला अगदीच कच्चे, परंतु अतिशय टॅलेंट असलेले नवीन प्रकारचे रॅप व हिप-हॉप कलाकार
शोधत आहोत जे भविष्यात सुपरस्टार होतील. आजच्या काळात भारतीय संगीतात रॅप व हिप-हॉपचा
जमाना आहे. कविता हे क्रांतीचे काव्य आहे, जे भारतातील वर्णभेद, अन्याय आणि समाजातील अॅट्रोसिटी
विरोधात निषेध करणारे भाष्य करते. हा भारताचा आवाज आहे, भारताच्या रस्त्यावरचा.. ज्याकडे तुम्ही
आणखी दुर्लक्ष करू शकत नाही. हिंदुस्तानी रॅप व हिप-हॉप आपल्या राष्ट्राची कथा व वास्तव सांगते.
आम्हाला IncInkमध्ये आपल्या पिढीतील कवी आणायचे आहेत. IncInkचा शब्दशः अर्थ म्हणजे स्वत:ची
कथा लिहिणे. सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या या पॅशन प्रोजेक्टची सुरुवात करण्यासाठी मी अतिशय
प्रेरीत व उत्सुक आहे. मला आशा वाटते की, आम्ही जगासमोर भारतीय तरुणांचे बुलंद, आक्रमक आवाज
सादर करू,” असे या म्युझिक वेंचरसह जागतिक उद्योजक बनलेला रणवीर म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, “काम भारी, स्लोचिता आणि स्पीटफायर हे पहिले 3 अद्वितीय टॅलेंट लॉन्च करण्यात
आले. मी त्यांच्या संगीताचा मोठा चाहता आहे. आणखी काही कलाकारांसोबत करार करून त्यांचा प्रसार
करण्याचा विचार आहे. संगीतातील वेगळे प्रवाह शोधणारे कलाकार पुढे निवडले जातील, जे जग आणि
भारतासमोर चांगले संगीत मांडतील. मी बॉलीवूडमध्ये आऊटसायडर होतो, आपल्या देशात प्रत्येक
गल्लीच्या तोंडावर कलाकार सापडतात. त्यांच्या अद्वितीय प्रतिभेला मदत करून माझे योगदान देण्याची
मनात इच्छा होती. त्यामुळे जेव्हा मी आणि नवझर IncInk’चा विचार करत होतो, तेव्हा मला मनापासून
ती संकल्पना आवडली. IncInk माझी पॅशन आहे आणि हा मंच देशातील अनेक कलाकारांच्या उपयोगी
आणावा असा माझा मानस आहे. त्यांच्या प्रतिभेने भारताला चमकविण्याची ही संधी आहे.”
रणवीरचा IncInkमधील भागीदार आणि को-कोलॅबरेटर नवझर ईरानी स्वत: फिल्ममेकर आणि संगीतप्रेमी
आहे. भारतातील कलाकारांना शिक्षण देऊन त्यांना लॉन्च करण्याचे, कलाकार घडविण्याचे त्याचे उद्दिष्ट्य
आहे. या कंपनीसह तो देखील उद्योजक बनला आहे, या माध्यमातून आपल्या पिढीतील समकालीन कवींना
साजेसे एक्सपोजर मिळून लोकांपर्यंत पोहोचता येईल.
सह-भागीदार नवझर ईरानी म्हणाला की, “कला अशांततेला सुखावह करते आणि सुखात व्यत्ययही आणू
शकते. संगीत मला कायमच माझ्या मर्यादांपलीकडे विचार व कृती करायला भाग पाडते. कलाकाराला
स्वत:चा असा दृष्टिकोन असतो. आर्थिक स्वारस्य लक्षात ठेवून होणाऱ्या सुरक्षित चर्चा आणि मुत्सद्देगिरीचा
मला कंटाळा आला आहे. मला लोकांसोबत नाळ जोडायची आहे. हा संपर्क सत्य आणि अस्सल
अभिव्यक्तीच्या माध्यमातून साध्य होईल. अर्थात कायमच हा पर्याय स्वीकार्ह नसेल. परंतु, त्यामुळे अधिक
सर्वसमावेशक संवाद निर्माण व्हायला मदत होईल. हाच दृष्टिकोन रणवीरकरिता प्रेरक ठरला. अनुष्का
मनचंदा उर्फ नुका आणि शिखर मनचंदा उर्फ RĀKHIS हे मंचावरील आमचे हेड ऑफ म्युझिक आहेत.
IncInkचे नेमके ध्येय आम्ही सर्वानी मान्य केले आहे. जिथे कलाकार एकत्र येऊन अस्सल स्वातंत्र्य सादर
करतील. माझ्या मते, काय केले पाहिजे आणि काय करू नये हे कला व संगीतासारख्या माध्यमातून स्पष्ट
झाले पाहिजे. इथेच संघर्ष, मतभेद आणि मंजुरी उमटायला पाहिजे. परिवर्तनाकरिता आपले विचार, काम
आणि शब्दांच्या साथीने मंथन आवश्यक ठरते.”
रॅप व हिप-हॉप कलाकारांना लॉन्च करणाऱ्या त्यांच्या स्वतंत्र लेबलविषयी बोलताना नवझर म्हणाला,
“रॅपमध्ये आक्रमक आणि थेट पद्धत असते. आपण खरेपणावर बोलू शकतो, शिकू शकतो, शिक्षित करू
शकतो, इतरांना प्रोत्साहन देऊ शकतो. दडपशाहीला साहसाने आणि कल्पकतेने तोंड दिले पाहिजे.
आपल्याला बऱ्याचदा दरदिवशीच अन्यायाचा सामना करावा लागतो. कलेच्या माध्यमातून असे विषय
प्रकाशात आणता येतात, आपण ते ओळखले पाहिजेत आणि कृती केली पाहिजे. रॅप हे माध्यम सत्याला
वाचा फोडणारे आहे. त्यात तलवारीहून अधिक साहस आहे.”
आज IncInkने त्यांची पहिली सिंगल, जहर असे शीर्षक असलेली, काम भारीने लिहिलेली आणि सादर
केलेली, शिखर युवराज मनचंदा (उर्फ RĀKHIS) निर्मिती कलाकृती आणली आहे. जहर’मधली गाणी
विखारी आहेत. भारतीय संगीताच्या प्रचलित सुसंगतेला धैर्याने आणि फारसा मुलाहिजा न बाळगता
आव्हान देणारी आहेत.

No comments:
Post a Comment
GIVE REVIEW ABOUT OUR UPDATE OR REQUEST